ADVERTISEMENT
home / Recipes
स्टॉलसारखी पावभाजी घरी करण्याची ही आहे योग्य पद्धत

स्टॉलसारखी पावभाजी घरी करण्याची ही आहे योग्य पद्धत

तुम्ही कधी स्टॉवरील पावभाजी खाल्ली आहे का? हम्म स्टॉलवरची पावभाजी आठवली की, डोळ्यासमोर तो मोठा तवा, त्याचा कडेला रचलेल्या भाज्या… आणि त्या मोठ्या तव्यावर मस्तपैकी बटरटाकून लाल भडक अशी बटरने चळचळून काढलेली भाजी केली जाते. आता स्टॉलवर प्रत्येकवेळी जाऊन सतत पावभाजी खाण्याचा कितीही मोह झाला तरी आपल्यापैकी बरीच जण असे पदार्थ घरी करुनच मग खाण्याचा विचार करतात. पण घरी पावभाजी करताना अनेकांची पावभाजी तशी होत नाही. काहींनी केलेल्या पावभाजीला रंग येत नाही तर काहींच्या पावभाजीला म्हणावा तसा स्टॉलसारखा स्वाद नसतो. घरी पावभाजी करताना तुम्ही नेमक्या काय चुका करता आणि रेसिपीमध्ये काय वापरत नाही.हे तुम्हाला आम्ही शेअर केलेल्या टिप्समुळे नक्कीच लक्षात येईल. चला जाणून घेऊया स्टॉलसारखी पावभाजी घरी करण्याची योग्य पद्धत

उरलेल्या कढीपासून बनवा टेस्टी डिश

बेकरीसारखा लुसलुशीत लादीपाव करा घरीच,परफेक्ट रेसिपी

पावभाजीची पूर्वतयारी

पावभाजीची पूर्वतयारी

ADVERTISEMENT

Instagrram

पावभाजी ही एक प्रकारे मिक्स भाजी आहे. जिला एक फोडणी देऊन एक थपथपीत अशी भाजी तयार केली जाते.  या  मिक्स भाजीमध्ये मटार, बटाटा, फ्लॉवर, ढोबळी मिरची अशा भाज्यांचा समावेश असतो. या सगळ्या भाज्या योग्य प्रमाणात घेणे गरजेचे असते. पावभाजीचा बेस हा तसा पाहायला गेला तर बटाटा आणि टोमॅटोचा असतो. त्यामुळे अर्थात याचे प्रमाण हे योग्य असायला हवे. फ्लॉवरला एक उग्र दर्प असल्यामुळे त्याचा वापर पावभाजीमध्ये कमी असायला हवा. नाहीतर त्याची चव फारच वेगळी लागते. 

भाज्या घ्या उकडून

पावभाजी अशी करा तयार

Instagram

ADVERTISEMENT

तव्यावर भाजी करताना तुम्ही कधी पाहिली असेल तर ते तव्यावर तेल किंवा बटर घालून त्यामध्ये सगळ्या उकडलेल्या भाज्या क्रमाक्रमाने परतायला घेतात. पण घरी इतका मोठा तवा आणि तशी सोय असतेच असे नाही. त्यामुळे घरी असतानाही सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम आहे ते म्हणजे भाज्या उकडून घेणे. बटाटा, मटार,फ्लॉवर, ढोबळी मिरची उकडून घ्या.

  • या सोबत रंग आणण्याचे काम करणारे बीट उकडून त्याची प्युरी करुन घ्या. 
  • कांदा आणि टोमॅटो यामध्ये फारच महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे टोमॅटो आणि कांदा प्युरीही तयार ठेवा. याची प्युरी केली की, कांदा-टोमॅटो भाजीत चांगला मेणला जातो. 

किचनमधली लाकडी भांडी अशी करा स्वच्छ, वापरा या सोप्या टिप्स

सुरु करा फोडणीची तयारी

साहित्य : उकडलेल्या भाज्या, बिटाची प्युरी, पावभाजी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ 

कृती: 

ADVERTISEMENT
  1. सगळ्यात आधी उकडलेल्या सगळ्या भाज्या चांगल्या स्मॅश करुन घ्या. तव्यावर भाजी स्मॅश करणे हे घरी शक्य नसते. त्यामुळे एका भांड्यात तुम्ही ती चांगली स्मॅश करुन घ्या. 
  2. फोडणीसाठी तेल आणि बटर दोन्ही अर्धे अर्धे घ्या. त्यामध्ये कांदा पेस्ट,आलं-लसूण घालून छान परतून घ्या. कांद्याची पेस्ट लाल होईपर्यंत छान परता.त्यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून सगळे मसाले घालून घ्या. 
  3.  मसाल्याला चांगले तेल सुटल्यानंतर  त्यामध्ये स्मॅश केलेली भाजी घाला. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये पाणी थोडे पाणी घाला. सोबत बीटाची प्युरी घाला. त्यामुळे तुमच्या पावभाजीला छान लाल रंग येईल.
  4. पावभाजी ही पटकन तयार होत असली तरी मसाले चांगले एकजीव होण्यासाठी ती चांगली शिजू द्या. ती झाकून किमान 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवा. 

आता बघा तुमची पावभाजी एकदम स्टॉलवर केली जाते तशीच होईल. 

 

 

01 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT