ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
how to make venus strong in kundli

वैवाहिक जीवनात असेल तणाव तर शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी हे करा 

ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह वृषभ आणि तुला राशीचा स्वामी मानला जातो. शुक्र हा सुख आणि समृद्धीचा ग्रह मानला जातो. ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शुक्र उच्च स्थानावर आहे त्यांना सहसा शारीरिक आणि मानसिक त्रास होत नाहीत असे मानले जाते. तसंच त्यांना प्रत्येक पावलावर यश मिळतं असंही म्हटलं जातं. दुसरीकडे ज्यांच्या जन्मपत्रिकेत शुक्र कमजोर आहे त्यांना शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घ्या पत्रिकेत शुक्र ग्रह कमजोर असण्याची कोणती चिन्हे आहेत. 

पत्रिकेत शुक्र ग्रह कमकुवत असल्याची लक्षणे

  • चेहऱ्याची चमक सतत कमी होणे
  • दृष्टी दिवसेंदिवस खराब होणे 
  • जोडीदाराविषयी आकर्षण कमी होणे 
  • आर्थिक परिस्थिती बिघडणे 
  • पुरुषांच्या विवाहात अडथळे येणे 
  • कंबर आणि पोटऱ्या जास्त दुखणे
  • गरिबी येणे 
  • रात्री झोपण्यापूर्वी जास्त गोड खावेसे वाटणे 
  • वैवाहिक सुखाची हानी होणे 
  • जेव्हा शुक्राची स्थिती वाईट असते तेव्हा लोकांच्या चारित्र्यावरही परिणाम होतो.

पत्रिकेत शुक्र ग्रह सामर्थ्यवान करण्यासाठी उपाय

आपल्या जन्मपत्रिकेत शुक्र ग्रहाची शक्ती सकारात्मक मानली जाते. यामुळे घरामध्ये आर्थिक समृद्धी आणि सुख-शांती नांदते. याउलट जर पत्रिकेत शुक्र बलवान नसेल तर वैवाहिक जीवन, व्यवसाय, नोकरी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. पण यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.

  • शुक्र ग्रहाला बल देण्यासाठी रोज सकाळी “ओम शुक्राय नमः” चा जप करा. हा अतिशय प्रभावी मंत्र मानला जातो. या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. 
  • शुक्र ग्रहाला बळ देण्यासाठी दक्षिणा दान देखील एक प्रभावी मार्ग आहे. जमेल तेव्हा शुक्रवारी कपडे, तांदूळ आणि साखरेचे दान करा. दानशूरपणाने शुक्र ग्रहाची नकारात्मकता दूर होईल. 
  • शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत करावे. यासोबतच लक्ष्मीमातेची पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवावा. व्रत करताना उपवास केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. 
  • गडद रंग देखील नकारात्मक उर्जेचे लक्षण आहेत. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या पत्रिकेत शुक्र नीचेचा आहे तोपर्यंत गडद निळे आणि काळे कपडे घालणे टाळा. शुक्रवारी शक्यतोवर गुलाबी किंवा पांढरे कपडे घाला.
  • दररोज सकाळी स्वयंपाकघरात काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. या दिशेला तुपाचा दिवा लावल्याने पत्रिकेतील शुक्र ग्रह सामर्थ्यवान होण्यास मदत होईल. 
  • रोज जेवण्यापूर्वी गाईला व श्वानाला पोळी खाऊ घाला.
  • चंदन, तांदूळ, कपडे, फुले, चांदी, तूप, दही, साखर इत्यादी पांढर्‍या वस्तू मुलीला दान करा.
  • हिरा किंवा पुष्कराज हे रत्न शुक्र ग्रहाला बळकट करण्यासाठी परिधान केले जाऊ शकते
  • पांढरा रंग शुक्र ग्रहाला खूप प्रिय आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे फायदेशीर ठरू शकते.. 
  • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असण्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे सौंदर्याचा अभाव. म्हणूनच वैयक्तिक स्वच्छता नियमितपणे राखणे महत्वाचे आहे. एखाद्याने चांगले कपडे घातले पाहिजेत, त्यांची नखे स्वच्छ आणि लहान ठेवावीत, नको असलेल्या केसांपासून मुक्त व्हावे, केशरचना व्यवस्थित ठेवावी आणि दररोज स्वच्छ कपडे घालावेत.
  • भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी भरपूर सुवासिक द्रव्यांचा वापर करावा. तुमच्या आवडीनुसार रोज स्वतःच्या आवडीचे अत्तर किंवा परफ्युम लावावे, 
  • आपल्या सभोवतालचा परिसर शक्य तितका सुगंधित ठेवण्याचा प्रयत्न करा, हे आपल्याला भगवान शुक्राचे आशीर्वाद आकर्षित करण्यास मदत करेल. सुवासिक फुले मिळवा आणि ती तुमच्या घर आणि कार्यालय परिसरात ठेवा.
  • शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी चांगली स्वच्छता राखणे खरोखरच महत्त्वाचे आहे. आंघोळीच्या पाण्यात गुलाबपाणी, केवडा किंवा वेलची घालून आंघोळ करा. हे तुम्हाला दिवसभर सुगंधित ठेवेल आणि भगवान शुक्राला प्रसन्न करण्यात मदत करेल.

तुमच्या पत्रिकेत जर शुक्र बलवान नसेल तर तुम्ही ओम द्राम द्रीम द्रौम सः शुक्राय नमः या शुक्र बीज मंत्राचा जप देखील करू शकता.

***हे काही साधारण उपाय दिले आहेत. तरीही ते करण्यापूर्वी आपली कुंडली ज्योतिषतज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

03 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT