ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
how to make your arms look slimmer

कोणत्याही ड्रेसमध्ये हात व दंड स्लिम दिसण्यासाठी वापरा ही युक्ती

आपल्या सर्वांनाच  मॉडेल्ससारखी परफेक्ट शरीरयष्टी आणि सुंदर फिगर हवी असते. त्यासाठी आपण घाम गाळून , डाएट पाळून प्रयत्न देखील करतो. परंतु वस्तुस्थिती मात्र अशी आहे की आपल्यापैकी अनेकांना मॉडेल्ससारखे आकर्षक आणि परिपूर्ण शरीर मिळत नाही. अर्थात आयुष्यभर त्या ड्रीम फिगरसाठी रडत बसण्याऐवजी, तुम्ही स्वतःला आहे तसे स्वीकारून केवळ फिट व निरोगी राहण्यावर लक्ष केंद्रित केले तर आयुष्य अधिक सुखी होते. जाड किंवा फ्लॅबी हात असणे ही आपल्यापैकी अनेकांसाठी एक समस्या आहे. आपले दंड असे जाड दिसत असले तर आपल्याला कितीही इच्छा असली तरी आपण स्लिव्हलेस किंवा शॉर्ट स्लीव्ज असलेले कपडे घालू शकत नाही. जरी एखाद्या दिवशी आपण स्लिव्हलेस ड्रेस घातला तरी आपण आपल्या हातांकडे बघून सारखे संकोचतो किंवा आपल्याला लाज वाटते. पण जर पुढील काही युक्त्या केल्या तर तुमचे दंड जाड दिसत असले तरी तुम्ही तो ड्रेस अगदी सुंदररित्या कॅरी करू शकता. 

व्ही नेकलाइनचा आधार घ्या 

How to look slim in sleeveless | स्लिव्हलेस ड्रेसमध्ये बारीक कसे दिसायचे
Pinterest

व्ही-नेकचा ड्रेस तुमच्या कॉलरबोनला हायलाईट करेल आणि तुमच्या दंडांकडे लक्ष जाणार नाही. म्हणून, व्ही-नेकचा ड्रेस घाला आणि त्याचे फिटिंग अगदी योग्य असले पाहिजे. त्या ड्रेसचे स्ट्रॅप्स तुमच्या तुमच्या खांद्यामध्ये रुतून बसणार नाहीत याची खात्री करा. तसेच व्ही नेक ड्रेस घालताना योग्य प्रकारची व योग्य फिटिंगची ब्रा घाला. 

बटरफ्लाय स्लीव्हज वापरून पहा

बटरफ्लाय स्लीव्‍ह म्हणजे असे स्लीव्‍ह आहेत जे तुमचे खांदे आणि तुमच्या हाताचा वरचा भाग झाकून ठेवतात तुमचे हात अधिक बारीक दिसण्यास मदत करतात.

खांद्यांकडे लक्ष वेधले जाईल असा ड्रेस निवडा 

How to make your arms look slimmer |स्लिव्हलेस ड्रेसमध्ये बारीक कसे दिसायचे
Pinterest

तुमचा आवडता ऑफ-शोल्डर टॉप किंवा ड्रेस घ्या जो तुमचे दंड व हात हायलाइट करण्याऐवजी तुमच्या खांद्याकडे सर्व लक्ष वेधून घेईल. तसेच फोटोसाठी पोझ देताना, कधीही आपले हात शरीराला चिकटून ठेवू नका. हात शरीरापासून थोडे लांब राहतील अशी पोझ द्या. .

ADVERTISEMENT

स्ट्रॅपी टॉप्स आणि स्पेगेटी टाळा

स्ट्रॅपी टॉप परिधान केल्याने तुमचे दंड व हातांवर सगळे लक्ष केंद्रित होईल आणि तुमचा स्लीव्हलेस घालण्याचा आत्मविश्वास कमी होईल. 

गडद रंगाचे ड्रेस वापरा 

गडद रंगांमध्ये आपण स्लिम दिसू शकतो. काळा किंवा निळा किंवा गडद रंगाचा ड्रेस निवडा ज्याचे फिटिंग चांगले असेल. 

स्लीव्हलेस ब्लाऊजना छोटे फ्रिल्स लावून घ्या 

How to look slim in sleeveless | स्लिव्हलेस ड्रेसमध्ये बारीक कसे दिसायचे
Pinterest

तुम्हाला साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज घालायचे असेल तर त्याला छोटे फ्रिल्स लावून घ्या. फ्रिल्स ही स्टाईल अजूनही ट्रेंडिंग आहे. केवळ स्लीव्हजमध्येच नाही, तर स्कर्ट आणि फ्रिल्स असलेले कपडे देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्हाला जाड हातांमुळे स्लीव्हलेस ब्लाउज घालायला संकोच वाटत असेल तर तुम्ही तुमच्या स्लीव्हजच्या टोकांना फ्रिल्स लावून घेऊ शकता. यामुळे तुमचा ब्लाउज सुंदर आणि ट्रेंडी दिसेल आणि तुमचे हात जास्त लक्ष वेधून घेणार नाहीत. तसेच तुम्हाला फ्रिल्स आवडत नसतील लहान प्लीट्स असलेले डिझाईन केले तर ब्लाउजला एक स्टायलिश लुक मिळेल. 

स्लिव्हलेस ड्रेसबरोबर ऍक्सेसरीज घाला

जर तुम्हाला स्लीव्हलेस ड्रेस किंवा ब्लाउज घालायचा असेल आणि तुम्हाला तुमचे दंड जाड वाटत असतील तर तुम्ही हातात लूज बांगड्या, कडे किंवा ब्रेसलेट घालू शकता. यामुळे तुमच्या दंड हायलाईट न होता तुमचे मनगट हायलाईट होईल. मनगट हा हातांचा सर्वात बारीक भाग असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही मनगटात ऍक्सेसरीज घालता तेव्हा हात बारीक दिसतात. 

ADVERTISEMENT

या युक्त्यांचा वापर करून तुम्ही स्लिव्हलेस व शॉर्ट स्लीव्हचे ड्रेस किंवा ब्लाउज चांगल्याप्रकारे कॅरी करू शकता. 

फोटो क्रेडिट – pinterest, istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

24 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT