प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं आपली मुलं हुशार आणि बुद्धिमान व्हावी असं वाटतं. मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मुलांना चांगला आहार आणि योग्य संस्कार करण्याची गरज आहे. बदाम, अक्रोड, च्यवनप्राश खाण्यामुळे बुद्धि तल्लख होते. पण मुलं हुशार असणं आणि त्यांचा बुद्धांक जास्त असणं या दोन वेगवगेळ्या गोष्टी आहेत. मुलांच्या बुद्धांकामुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते. मुलांचा बुद्धांक वाढण्यासाठी या टिप्स नक्कीच तुमच्या फायद्याच्या ठरतील. यासोबतच जाणून घ्या जाणून घ्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Smaranshakti Vadhavnyasathi Upay
मुलांच्या बौद्धिक विकास होण्यासाठी संगीत ही एक बेस्ट थेरपी ठरू शकते. या थेरपीमुळे मुलांचा आय क्यु लेव्हल तर वाढतेच शिवाय त्यांची एकाग्रताही वाढते. यासाठीच मुलांना तबला, गिटार, हार्मोनियम, सितार, व्हायोलिन असं एखादं वाद्य शिकवा. ज्यामुळे मुलांचे मन एकाग्र होण्यास मदत होईल.
खेळ खेळण्यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. यासाठी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी खेळ खेळणं महत्त्वाचं ठरतं. खेळता खेळता मुलं अनेक गोष्टी शिकतात, नवनवीन कौशल्यं त्यांच्यामध्ये विकसित होतात. उत्साह वाढण्यासाठी आणि बुद्धिमत्ता वाढण्यासाठी खेळ खेळणं फायद्याचं ठरेल.
ओमेगा थ्री फॅटी अॅसिड मुलांच्या बौद्धिक विकासासाठी खूप गरजेचं असतं. डीएचए मुलांच्या मेंदूच्या विकासात महत्त्वाचा ठरतो. मुलांच्या शरीरातील डीएचए पातळी कमी असेल तर स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. यासाठी मुलांच्या आहारात ओमेगा थ्री फॅटी असिड असायला हवं.
गणिते सोडवण्यासाठी मुलांच्या बुद्धिचा कस लागतो. म्हणूनच मुलांना पाढे शिकवणे, दहा ते पंधरा मिनीटे एखादं कठीण गणित सोडवण्यास देणं फायद्याचं ठरेल, मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी अॅबेकसच्या लेव्हल मुलांना शिकवा. ज्याचा चांगला परिणाम नक्कीच तिच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होतो.
श्वासाचे व्यायाम मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. दीर्घ श्वासाचा व्यायाम केल्यामुळे मनात सकारात्मक विचार येण्यास मदत होते. मुलांना श्वासावर लक्ष ठेवण्यास शिकवलं तर विचारांवर लक्ष ठेवण्यास मदत होते. यासाठी मुलांना नियमित श्वासाचे व्यायामाचा सराव करण्यास शिकवा.
मनावर नियंत्रण असेल तर मुलांना एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी मुलांना मनावर नियंत्रण ठेवणारे माईंड गेम्स खेळण्यास शिकवा. मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी या स्कीलचा चांगला परिणाम होऊ शकतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक