आजकाल कुर्ती असो एखादा पंजाबी ड्रेस अथवा एखादं शर्ट तुम्ही कशासोबतही लेगिंग्स वापरू शकता. ज्यामुळे लेगिंग्सची फॅशन दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय लहान मुलगी असो वा साठीची आजी कुणासाठीही हे बॉटम विअर अगदी आरामदायक ठरतं. सहाजितच आजकाल प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये निरनिराळ्या रंगाच्या लेगिंग्ज असतातच. एखाद्या दुपट्टासोबत मॅच केल्या तर तुम्ही मिक्स मॅच करून एक छान कुर्तीचे पंजाबी ड्रेसमध्ये रुपांतर करू शकता. मात्र बाजारात विविध ब्रॅंड आणि मटेरिअलच्या लेगिंग्स मिळतात. जर तुम्ही खरेदी केलेली महागडी लेगिंग जास्त काळ टिकावी असं तुम्हाला वाटत असेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या आहेत.
लेगिंग्सची निगा कशी राखावी
लेगिंग्स खरेदी केल्यावर काही दिवसांमध्येच त्या खराब होतात. कधी तिचं कापड लूज होतं तर कधी कलर फिका पडतो. मात्र असं का होतं याचा विचार न करता आपण पुन्हा दुसरी लेगिंग खरेदी करतो. यासाठीच जाणून घ्या लेगिंग्सची निगा कशी राखावी.
लेगिंग्स सतत धुवू नका
कपडे सतत धुण्यामुळे ते लवकर खराब होतात. लेगिंग्स सतत धुण्यामुळे त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या सैल पडतात. यासाठी वारंवार एकच लेगिंग वापरू नका. ज्यामुळे तुम्हाला ती सतत धुवावी लागणार नाही. जर तुम्हाला काळ्या, पांढऱ्या अशा कॉमन रंगाच्या लेगिंग्स सतत वापरायच्या असतील तर त्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन जोड विकत घ्या. ज्यामुळे एकदा वापरल्यावर त्या लगेच वापरल्या जाणार नाहीत आणि सतत धुवाव्या लागणार नाहीत.
हॅंडलूम इकत साडी आणि ओढण्यांची कशी घ्यावी काळजी
धुताना काळजी घ्या
लेगिंग्स धुतानाही योग्य काळजी घेतली तर त्या लवकर खराब होणार नाहीत. लेगिंग्स कापड लवचिक असते. त्यामध्ये नायलॉन, सुती आणि मिक्स असे कापड वापरलेले असते. जर तुम्ही लेगिंग्स थेट वॉशिंग मशीनमध्ये धुण्यास टाकली तर ती लवकर खराब होते शिवाय तिची फिनिशिंग खराब होते. यासाठी हार्श डिटर्जंट न वापरता सौम्य साबणाने आणि हाताने लेगिंग्स धुवा. लेगिंग्स धुताना फॅब्रिक सॉफ्टनर पेक्षा व्हिनेगर वापरा. ज्यामुळे त्याची चमक आणि गुणवत्ता टिकून राहिल.
नेटच्या साडीची अशी राखा निगा (How to Take Care of Net Saree)
लेगिंग्स अशा पद्धतीने सुकवा
कपडे धुण्याप्रमाणेच तुम्ही ते कसे सुकवता यावर ते किती टिकणार हे ठरत असते. जर तुम्ही लेगिंग्स कडक उन्हात वाळत घालती तर ती उष्णतेमुळे फिकी पडेल आणि लवकर खराब होईल. यासाठी घराच्या सावलीत लेगिंग्स सुकत घाला, ज्यामुळे हवेवर ती लवकर सुकेल आणि ती जास्त काळ टिकण्यास मदत होईल.
स्टायलिश दिसायचं आहे मग वापरा या फॅशन अॅक्सेसरिज