ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How to Make Your Old Clothes Look Bright Again

तुमच्या जुन्या कपड्यांना अशी द्या नवी चमक, फॉलो करा या टिप्स

कपडे वापरून जुने झाले की फिक्के पडतात अथवा तुम्हाला व्यवस्थित होत नाहीत. अशा वेळी कपडे टाकून देणे अथवा एखाद्या गरजवंताला देण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र काही कपडे असे असतात ज्यांच्यासोबत तुमच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे असे कपडे फेकणं अथवा कोणाला देणं तुम्हाला नको असतं. अशा वेळी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही जुन्या कपड्यांना पुन्हा नवी चमक देऊ शकता. 

जुने कपडे धुताना काय काळजी घ्यावी –

जुन्या कपडे फार खराब होऊ नयेत अथवा ते आहेत त्या स्थितीत राहावे यासाठी ते धुताना विशेष काळजी घ्या

कपडे नेहमी उल्टे करून धुवा

कपडे धुताना ही युक्ती नेहमी लक्षात ठेवावी. कारण कपडे फिक्के पडण्यासाठी हेच महत्त्वाचे कारण आहे. जर तुम्ही तुमचे कपडे उल्टे करून वॉशिंगमशीनमध्ये टाकले अथवा हाताने धुतले तर ते लवकर फिक्के पडत नाहीत.

सौम्य डिर्टंजट वापरा

जर तुमचे कपडे जुने झाले असतील पण ते लवकर खराब होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ते धुताना नेहमी सौम्य डिर्टंजट वापरा. कारण हार्श डिर्टंजट तुमचे कपडे खराब होण्यासाठी जास्त कारणीभूत ठरतो. अशा वेळी तुमचे जुने कपडे जास्त काळ टिकू शकत नाहीत.

ADVERTISEMENT

फॅब्रिक कंडिशनर वापरा

कपडे धुतल्यावर त्वचा अथवा केसांप्रमाणेच कपड्यांची निगा राखायला हवी. यासाठी त्यांना पोषण देण्यासाठी फॅब्रिक कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या कपड्यांमधील मऊपणा कमी होत नाही.

व्हिनेगरचा वापर

वॉशिंग मशीनमध्ये जुने कपडे धुताना त्यामध्ये थोडं व्हिनेगर टाका. ज्यामुळे तुमच्या कपड्यांचा रंग निघून जाणार नाही. कपड्यांवरील हट्टी डाग मात्र नक्कीच जातील. कपड्याना मऊ ठेवण्यासाठी ही युक्ती तुमच्या नक्कीच कामी येईल. जाणून घ्या कपड्यावरील डाग कसे काढावे, जाणून घ्या सोपे उपाय (How To Remove Stains From Clothes)

जुने कपडे असे करा पुन्हा नवीन

तुमच्याकडे असलेले जुने कपडे कधी कधी फिक्के पडतात, फाटतात अथवा विरतात अशा वेळी त्यांना तुम्ही पुन्हा नव्याने वापरू शकता.

  • एखादी प्लेन साडी असेल तर तिला तुम्ही विरलेल्या साडीचा काठ काढून लावू शकता. ज्यामुळे दोन साड्यांची मिळून एक साडी तयार होईल आणि दोन्ही साड्यांची आठवण जपली जाईल.
  • एखाद्या प्लेन कॉटन टॉप अथवा बॉटमला प्रिंटेड करण्यासाठी तुम्ही फॅब्रिक कलरने पोल्का टॉड काढून सुंदर करू शकता. ज्यामुळे त्यावरील विरलेला रंग निघून जाईल.
  • रंग गेलेले कपडे पुन्हा आकर्षक करण्यासाठी तुम्ही त्यावर कलर करू शकता. बाजारात कपडे डाय करून मिळतात. शिवाय घरातील नैसर्गिक रंगाचा वापर करूनही तुम्ही ते आकर्षक करू शकता. 
  • पांढऱ्या रंगाचे विटलेले कपडे अधिक शुभ्र दिसावे असं वाटत असेल तर ते धुण्यासाठी बोरिक अॅसिडचा वापर करा. ज्यामुळे त्यावरील पिवळसरपणा कमी होईल.
  • टीशर्ट अथवा जुन्या झालेल्या टॉपला नवीन करण्यासाठी तुम्ही त्यावर डिझाईन तयार करू शकता. बाजारात विविध आकाराच्या डिझाईन मिळतात त्या तुम्ही फॅब्रिक टेपने टी शर्टवर जोडू शकता. फॅब्रिक स्टीकरचा वापरही यासाठी करता येईल. 
  • लॉंग जीन्स अथवा बॉटम कापून ती शॉर्ट करून तुम्ही वापरू शकता.
13 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT