ADVERTISEMENT
home / आरोग्य
how-to-manage-osteoporosis-patients-at-home-in-marathi

ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांचे घरच्या घरी कसे व्यवस्थापन करावे

ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) बरा होणे शक्य नसला तरीदेखील परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तो तुम्ही निश्चितपणे व्यवस्थापित करू शकता. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या व्यक्तीने संतुलित आहार आणि व्यायामाचा समावेश असलेली निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. तसेच, डॉक्टरांनी शिफारस केलेली औषधे आणि पूरक आहार घेण्यास विसरू नका. या लेखात आम्ही तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतील अशा काही महत्त्वाच्या टिप्सची माहिती या लेखाच्या माध्यमातून दिली आहे. डॉ. बिस्वजीत नायडू, ऑर्थोपेडिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई यांनी ही माहिती दिली असून ही प्रत्येकाला माहीत असायला हवं. 

तज्ज्ञांनी सुचवलेल्या आवश्यक टिप्स 

ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि एखाद्याच्या गतिशीलतेवर मर्यादा घालून फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ही स्थिती सामान्यतः वृद्ध महिलांमध्ये दिसून येते. बसण्याची चुकीची पद्धत (पुढे वाकणे), धाप लागणे, उंची कमी होणे, हाडे फ्रॅक्चर होणे आणि पाठीच्या खालच्या भागात दुखणे ही त्याची लक्षणे आहेत. ही स्थिती तुमच्या दैनंदिन कामांमध्ये बाधा आणू शकते आणि तुम्हाला इतरांवर अवलंबून रहावे लागू शकते. रुग्णांच्या कुटुंबीयांनी अशा रुग्णांची घरी काळजी घेणे आणि त्यांना सक्रीय राहण्यास आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करणे ही काळाची गरज आहे. तज्ज्ञांनी सुचवलेल्या आवश्यक टिप्सचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा.

दररोज व्यायाम करा: 

Do Exercise

जर तुमच्या प्रिय व्यक्तीला ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्येने पिडीत असेल आढळला असेल तर ती व्यक्ती न चुकता व्यायाम करत असल्याची खात्री करा. नियमित शारीरिक हालचालींमुळे स्नायूंची बळकटी आणण्यास मदत होते तसेच शारीरीक समतोल राखण्यास, योग्य शारीरीक रचना राखण्यास, वेदना व्यवस्थापित करण्यास आणि हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यास मदत होते. रुग्णाला फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली ताकद प्रशिक्षण व्यायाम करण्यास मदत करा. तसेच, कोणताही फिटनेस रूटीन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला. ऑस्टियोपोरोसिस असलेल्या व्यक्तीसोबत फिरायला जाण्याचा प्रयत्न करा. अति व्यायाम आणि चुकीच्या पद्धतीने वाकणे टाळा कारण यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता वाढते आणि तुमची परिस्थिती आणखी बिघडू शकते. स्ट्रेचिंग्स आणि सक्रियता वाढवण्यासाठी आवश्यक असल्यास फिजिओथेरपिस्टची मदत घ्या.

आहाराकडे लक्ष द्या: 

ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांनी दररोज ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्याचा आहारात समावेश करावा. दुग्धजन्य पदार्थ, पालक, कोबी, ब्रोकोली, मोड आलेली कडधान्य, टोफू, सोयाबीन, सॅल्मन, ट्यूना आणि अंडी यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे टाळा. तुम्हाला माहीत आहे का? कॅल्शियमने भरलेले अन्न खाल्ल्याने हाडांची घनता टिकून राहते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्या. ऑस्टियोपोरोसिस असलेल्या व्यक्तीला धूम्रपान, अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन कमी करावे लागेल. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की धूम्रपान केल्याने शरीराच्या कॅल्शियम शोषुन घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे हाडांची घनता कमी होते आणि हाडे कमकुवत होतात. धूम्रपानामुळे हाडे आणि शरीराच्या इतर ऊतींना रक्तपुरवठा कमी होतो.

ADVERTISEMENT

कोवळे ऊन घ्या :

तुम्हाला माहिती आहे का? सकाळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यास शरीरात व्हिटॅमिन डी तयार होऊ शकतो. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीला किमान 20 मिनिटे सूर्यप्रकाश घेण्यास प्रोत्साहित करा. असे करणे त्यांच्या हाडांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी देखील चांगले असू शकते.

दुखापतींना प्रतिबंध घाला: 

ऑस्टियोपोरोसिस असलेल्यांना पडणे आणि फ्रॅक्चर होणे टाळण्यासाठी तसेच घरात चालताना आधाराकरिता  हँडल आणि बार लावून घ्या जेणेकरुन पकड धरुन चालणे शक्य होईल. घरात कोणतेही गालिचे कारण या गोष्टींमुळे पाय निसटण्याची शक्यता असते. ओले जिन्यांवरुन चढ-उतर करणे  टाळा कारण त्यामुळे पाय घसरुन फ्रॅक्चरची शक्यता वाढवू शकते. तसेच, सर्व खोल्या प्रकाशित राहतील, हवा खेळती राहील याची खात्री करा.

डॉक्टरांनी दिलेल्या या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि घरच्या घरी तुम्ही व्यवस्थित व्यवस्थापन करून घ्या. या टिप्स तुम्ही लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
20 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT