ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
liquid lipstick

लिक्विड मॅट लिपस्टिकने ओठ होत असतील कोरडे तर वापरा सोपे हॅक्स

एक लिपस्टिक लावली की बाहेर जाण्यासाठी कोणतीही महिला तयार होते. कोणत्याही महिलेकडे लिपस्टिक नाही असं अजिबात होत नाही. POPxo मेकअप कलेक्शनमध्येही तुम्हाला सध्या अगदी पॉकेट फ्रेंडली लिपस्टिक दिसून येतील. प्रत्येक लिपस्टिक ही प्रत्येक स्किन टोनसाठी नसते. आपल्याकडे सध्या लिक्विड लिपस्टिक सध्या ट्रेंडमध्ये आहे. पण बऱ्याचदा लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर ओठ कोरडे होतात. लिक्विड लिपस्टिक लावणे अतिशय सोपे आहे. तसंच लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर तुमचा लुक अधिक चांगला दिसतो. ही लिपस्टिक तुम्हाला केवळ सौंदर्यच देत नाही तर अधिक काळ टिकून राहण्यासही मदत करते. पण थोड्या वेळानंतर मात्र ओठ सुकायला लागतात. लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर ओठ कोरडे राहू नयेत यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तुम्ही ही लिपस्टिक कशाप्रकारे तुमच्या ओठांवर लावायला हवी आणि ओठ कोरडे होऊ नयेत यासाठी काय करावे याच्या काही सोप्या टिप्स. 

ओठांना करा एक्सफोलिएट (Exfoliate your lips)

exfoliate lips

लिक्विड मॅट लिपस्टिक (Liquid Matte Lipstick) तुम्ही ओठांना लावण्यापूर्वी ओठ एक्सफोलिएट करणे अत्यंत गरजेचे आहे. स्क्रबिंग केवळ तुमच्या त्वचेसाठी अथवा शरीरासाठी फायदेशीर ठरत नाही तर तुमच्या ओठांसाठीही तितकेच महत्त्वपूर्ण ठरते. लिक्विड लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही हे निश्चित करा की,  तुमच्या ओठांवरील डेड स्किन तुम्ही हटविली पाहिजे. आठवड्यातून एक अथवा दोन वेळा किमान ओठांना स्क्रब करायला हवा. यामुळे तुमचे ओठ कोरडे होणार नाही. लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतरही यामुळे ओठांवर मुलायमपणा टिकून राहील. 

ओठांना नीट मॉईस्चराईज करा (Moisturize your lips)

जेव्हा तुम्ही ओठांना लिक्विड लिपस्टिक लावणार असाल तेव्हा त्याआधी तुम्ही ओठांना मॉईस्चराईजर लावायला विसरू नका. यामुळे ओठ कोरडे होणार नाहीत. तुम्हाला लिक्विड लिपस्टिकचा ओठांवर वापर करण्यापूर्वी ओठ व्यवस्थित मॉईस्चराईज करून घेणे आवश्यक आहे. लिक्विड मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी कमीत कमी 20 मिनिट्सपूर्वी तुम्ही ओठांवर लिप बाम लावा. यामुळे ओठ चांगले मॉईस्चराईज होतात. 

लिप प्रायमरचा करा उपयोग (Use Lip Primer)

ज्याप्रमाणे तुम्ही मेकअप करताना चेहऱ्याला प्रायमरचा वापर करता. त्याप्रमाणे लिक्विड मॅट लिपस्टिकचा वापर करण्यापूर्वी ओठांवर लिप प्रायमरचा उपयोग करावा. लिपस्टिकचा रंग यामुळे ओठांच्या बाहेर येत नाही आणि ओठांवरील लिपस्टिकचा टिकण्याचा कालवधीही यामुळे वाढतो. लिक्विड लिपस्टिक ओठांना व्यवस्थित टिकून राहावी आणि ओठ कोरडे होऊ नयेत यासाठी लिप प्रायमरचा चांगला उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

लिक्विड मॅटच्या पहिले करा क्रिमचा फॉर्म्युला अप्लाय 

लिक्विड लिपस्टिक लावण्यापूर्वी तुमचे ओठ कोरडे पडत असतील तर तुम्ही लिपस्टिक लावण्यापूर्वी आपल्या ओठांना क्रिम लिपस्टिकच्या फॉर्म्युल्याने कोट करून घ्या आणि त्यानंतर त्यावर लिक्विड मॅट लिपस्टिकचा वापर करा. क्रिम लिपस्टिक ओठांवर एक सॉफ्ट लेअर बनवते. त्यामुळे त्यावर लिक्विड मॅट लिपस्टिक लावल्यावर ओठ कोरडे पडत नाहीत. 

लिप लायनरचा करा वापर (Use Lip Liner)

मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओठांवर लिप लायनर लावा. लायनर तुमच्या ओठांवर लिक्विड मॅट लिपस्टिकमुळे होणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. मॅट लिपस्टिक तुमच्या ओठांवर पसरविण्यापासून थांबविण्याचे काम लिप लायनर योग्यरित्या करते. तसंच लिप लायनर लिपस्टिक जास्त काळ टिकून ठेवण्यास फायदेशीर ठरते. 

या सर्व सोप्या ट्रिक्समुळे तुम्ही लिक्विड मॅट लिपस्टिकमुळे ओठ कोरडे पडत असतील तर उपाय करून तुमच्या ओठांना अधिक सुंदर आणि आकर्षक लुक देऊ शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT