घरातील किचन हा असा सेक्शन आहे जिकडे महिलांची अधिक मक्तेदारी असते. आपल्या किचनमध्ये सगळे काही असावे असे सगळ्यांना वाटते. पण असे करताना किचनमध्ये कधी अधिकचे सामान भरले जाते हे आपल्यालाही कळत नाही. किचनमध्ये स्टोरेज आहे म्हणजे याचा वापर तुम्ही जास्तीत जास्त सामान भरावे असे होत नाही. उलट किचनमध्ये सगळ्या गोष्टी या अगदी व्यवस्थित सेट केल्या तर ते किचन अधिक चांगले आणि स्वच्छता राखण्यास सोपे जाते. तुम्हीही नव्याने किचन सेट करायचा विचार करत असाल तर तुम्हाला आमच्या टिप्स नक्कीच मदत करु शकतील. जाणून घेऊया अशाच काही सोप्या टिप्स
वाण सामान भरताना
वाण सामान भरताना खूप जण एखादे सामान संपायच्या आधीच बरेच सामान आणून ठेवतात. सामान जास्तीचे आणून ठेवणे चुकीचे नाही. पण ते किती आणि कोणते आणावे हे माहीत असायला हवे. घरात साखर आणि मीठ हे जास्तीचे असेल चालेल. पण उगाचच जास्तीची बिस्कीटं, पीठं हे अधिक आणून ठेवू नका. कारण ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. जास्तीचे आणलेले वाण सामान लगेच जुन्या किंवा उरलेल्या डब्यामध्ये अजिबात भरु नका. तो डबा धुतल्यानंतर आणि चांगला वाळल्यानंतरच ते सामान भरा. खूप जणांना सामान भरण्याची इतकी घाई असते की, ते आहे त्या डब्यातच सगळे सामान ओतून मोकळे होतात पण असे अजिबात करु नका.
तांदळाला कीड लागत असेल तर करा सोपे उपाय
ट्रॉलीज करा स्वच्छ
हल्ली सगळ्यांच्याच किचनमध्ये ट्रॉली असतात. ट्रॉलीजचा ट्रेंड सगळीकडे असल्यामुळे अनेक जण ट्रॉलीज वापरतात. या ट्रॉली स्वच्छ करणे गरजेचे असते.आठवड्यातून किमान एकवेळा तरी तुम्ही ट्रॉली स्वच्छ करायला हवी. ट्रॉलीजमध्ये धुतलेली ओली भांडी मुळीच टाकू नये कारण त्यामुळे त्याला गंज लागण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शक्यतो ट्रॉलीमध्ये कोरडी भांडी ठेवा. त्यातही खूप जणांना भांडी ठेवताना कुठे काय ठेवायचे कळत नाही. ट्रॉलीच्या प्रकारानुसार ट्रॉली ठेवायची असते. त्यामुळे भांडी ठेवताना तिचा आकार आणि उपयोग यानुसार तुम्ही भांडी लावून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल.
पूजेची भांडी कशी ठेवावीत जपून, जाणून घ्या टिप्स
मसाल्याचा डबा
किचनमध्ये जेवण करताना अगदी रोज वापरला जाणारा मसाल्याचा डबा हा देखील स्वच्छ आणि व्यवस्थित असणे हे गरजेचे असते. मसाल्याचा डबा हा नेहमी स्वच्छ असायला हवा. मसाले हे एकमेकांमध्ये अजिबात जाता कामा नये. त्यामुळे योग्य असा मसाल्याचा डबा निवडा. म्हणजे तुम्हाला वापरताना अडचण होणार नाही. खूप जणांचा मसाल्याचा डबा हा बरबटलेला असतो. त्यामधील चमचा ओला झालेला असतो. त्यामुळे होते असे की, मसाल्याचा वास हा हळुहळू कमी होतो. त्याचा परिणाम कमी होऊ लागतो. त्यामुळे शक्यतो मसाल्याच्या डब्यातील मसाले एकत्र होणार नाही याची काळजी घ्या.
भांडी निवडताना
खूप जणांना फॅन्सी भांडी निवडण्याची खूपच जास्त हौस असते. पण जर तुम्ही अशी भांडी निवडत असाल तर त्याची काळजीही तशाच पद्धतीने घेणे गरजेचे असते. जर तुम्ही अशा स्वरुपाची भांडी निवडत असाल तर त्याचा वापर झाल्यानंतर ती नेमकी कशी ठेवावी हे देखील तुम्ही जाणून घ्यायला हवे. काही किचन सेट्स वापरल्यानंतर ते लगेच स्वच्छ करुन पुसून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळ तुम्ही इतकी काळजी घेणार आहात का हा विचार करुन भांड्याची निवड करा.
आता किचन सेट करताना या काही गोष्टी अगदी नक्की लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होण्यास मदत मिळेल.