खूप महिलांचे दंड ही खूप जाड असतात. असे जाड दंड कोणालाही अजिबात आवडत नाही. विशेषत: स्लिव्हलेस घातल्यानंतर असे ड्रेस मुळीच चांगले दिसत नाही. शरीर बारीक आणि हात जाड असल्यामुळे तुम्हीही स्लिव्हलेस घालणे सोडून दिले असतील तर तुम्ही तुमच्यासाठी फक्त 10 मिनिटे काढा. कारण रोज 10 मिनिटे काढून तुम्ही काही व्यायामप्रकार केले तर तुमचे दंड कमी होण्यास मदत होईल. हा व्यायामप्रकार हा फारच सोपा आहे. त्यामुळे 10 मिनिटं काढून हे तिन्ही सोपे व्यायाम करा तुम्हाला हा फरक नक्कीच पुढील एका महिन्यात जाणवेल. जाणून घेऊया असे सोपे व्यायामप्रकार
उलटे पुशअप्स
उलटे पुशअप्स हा प्रकार तुम्हाला नक्कीच काहीतरी नवा असेल पण हा प्रकार खूप सोपा आणि फरक दाखवणारा आहे. त्यामुळे हा व्यायामप्रकार तुम्ही नक्की करायला हवा.
असा करा व्यायाम
- यासाठी तुम्हाला दोन पायात अंतर घेऊन बसायचे आहे. दोन पाय दुमडून टाचांवर यायचे आहे.
- त्यानंतर दोन्ही हात मागे घेऊन हात घ्यायचे आहेत असे करताना हातांची बोटे दुसऱ्या हातावर येतील असे बघायचे आहे. साधारणपणे चार बोट ही एकमेंकावर हवीत.
हाताचे तळवे बाहेर ढकलणे
आता एखादी गोष्ट आपल्या दूर न्यायची असेल किंवा नको असेल तर आपण जसे नाही म्हणतो किंवा दूर लोटतो तसे आपल्याला यामध्ये करायचे आहे. हात कोपऱ्यातून वाकवून ते बाहेरच्या दिशेला ठेवायचे आहेत.त्यानंतर हात बाहेर ढकलल्यासारखे करायचे आहेत. ही कृती तुम्हाला किमान 1 मिनिटांसाठी करायची आहे. असे करताना तुम्हाला हाताच्या आतल्या भागाला ताण आलेला नक्कीच जाणवेल. तुम्ही एक मिनिटं सलग हा व्यायाम करणे चांगले त्यामुळे त्याचा परिणाम लगेच दिसून येईल.
रोज केवळ 10 मिनिट्स करा सूर्यनमस्कार आणि मिळवा अद्भुत फायदे
हॅपी मॅनसारखा हात वरखाली करणे
हॅपी मॅन जसा असतो अगदी तसेच तुम्हाला उभे राहायचे आहे. तोच हात तुम्हाला खाली-वर करायचा आहे. असे करताना तुमच्या काखेत तुम्हाला थोडासा ताण येईल पण तसे तुम्हाला मिनिटभरासाठी करायचे आहे. हा व्यायाम जरी सोपा वाटत असला तरी देखील तो तसा ताण आणणारा आहे.
हा व्यायाम केल्यानंतर हात स्ट्रेच करायला अजिबात विसरु नका. म्हणजे तुमच्या नसांना आराम मिळेल.
आता तसाच हात वाकवायचा आहे. असे केल्यामुळे तुमच्या दंडावर ताण येतो. पहिल्या10 रिपिटेशनमध्ये ते मुळीच जाणवत नाही. पण नंतर त्या ठिकाणी ताण जाणवू लागतो. हात दंडातून दुखायला लागतो. ही कृती तुम्हाला किमान 1 मिनिटं तरी करायची आहे. सुरुवातील अगदी कमीक कमी वेळासाठी किंवा जमेल तेवढा वेळ करा.