ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Relieve Stress In Marathi

मानसिक ताण कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय (Relieve Mental Pressure In Marathi)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्य समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. खरंतर पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सुख-सुविधा कमी होत्या मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते. आताच्या आधुनिक जगात सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे. जगाच्या वेगाने धावताना कामाचा ताण, टारगेट पूर्ण करण्याचं टेंशन, ब्रेकअपचं दुःख, मुलांच्या भविष्याची चिंता, आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण येऊ लागला आहे. त्यामुळे ताण-तणाव निर्माण करणाऱ्यासाठीअगदी एखादी छोटीशी गोष्टही कारणीभूत ठरू शकते. शिवाय प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या निराळी असल्यामुळे दुःख, चिंता, काळजीची कारणंही निरनिराळी असू शकतात.

Table Of Contents

मानसिक ताणाची कारणे

मानसिक ताणाची लक्षणे

ADVERTISEMENT

मानसिक ताणापासून दूर कसे रहाल

प्रश्नोत्तरे

Mental Pressure

ताण-तणावाचा थेट परिणाम तुमच्या वागण्या-बोलण्यावर होऊ लागतो. सतत होणारी चिडचिड आणि रागामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. शिवाय आपण ज्यांच्यासाठी धावपळ करत असतो त्या जिवलग माणसांनाच आपण या स्वभावामुळे दुखावू लागतो. या ताण-तणावाला तुम्ही मेंटल प्रेशर अथवा मेंटल स्ट्रेस असंही म्हणतात. मात्र या मेंटल प्रेशरचा तुमच्या ह्रदय आणि मेंदूवर विपरित परिणाम होऊ शकते. यामुळे स्ट्रेसमुळे होणारे आजार मागे लागू शकतात. ह्रदयविकार, मानसिक आजार, नैराश्य हा ताणतणावाचा पुढील टप्पा असू शकतो.

मानसिक ताणाची कारणे (Causes Of Mental Pressure)

करिअरची चिंता (Career Concers)

Career Concers

आजकाल मुलगा असो वा मुलगी दोघांचंही करिअर उत्तम असणं गरजेचं आहे. त्यामुळे नोकरी मिळवणं, नोकरी टिकवणं, प्रमोशन मिळणं अशा अनेक गोष्टींसाठी सतत प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे सतत या गोष्टींचं मेंटल प्रेशर अथवा ताण हा प्रत्येकाला असतो. बऱ्याचदा बेरोजगार तरूण-तरूणी यामुळे डिप्रेशनमध्ये जातात.

ADVERTISEMENT

प्रिय व्यक्ती दूरावणे (Distractions)

Distractions

नातेसंबध आपल्या जीवनात फारच महत्त्वाचे असतात. जिवलग लोकांच्या प्रेमामुळे आपल्या जीवनातील कोणत्याही कठीण प्रंसगांना तोंड देणे सोपे जाते. मात्र कधी कधी आई-वडील अथवा जिवलग मित्र-मैत्रीणीच्या मृत्युमुळे अनेक लोक नैराश्याच्या आहारी जातात. एखाद्या जिवलग व्यक्तीचे परदेशी जाणे, जोडीदारासोबत ब्रेकअप होणे यामुळेही मानसिक ताण वाढू  शकतो. कारण अशा घटनांमुळे तुम्ही इतक्या भावनिक होता की तुम्हाला जीवन जगणे नकोसे वाटू लागते.

आर्थिक जबाबदाऱ्या वाढणे (Financial Obligations)

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्या व्यक्तीला घरातील आर्थिक जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात. कधी कधी फार कमी वयात जबाबदाऱ्यांचे ओझे अनेकजणांच्या खांद्यावर पडते. या जबाबदाऱ्या सुरूवातीला पेलवू न शकल्यामुळे काही जणांना मानसिक ताण सहन करावा लागतो. कुटुंबाच्या अपेक्षा, वाढते खर्च आणि तुमचे उत्पन्न याचं गणित जमवताना अनेकांची तारांबळ उडते.

वैवाहिक जीवनाला सुरूवात झाल्यामुळे (Beginning Of Marriage)

अविवाहित असताना घरातील जबाबदाऱ्या आई-वडील अथवा घरातील मोठी मंडळी निभावत असतात. मात्र लग्नानंतर अचानक तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते. मुलींना तर त्या जिथे लहानाच्या मोठ्या झाल्या ते घर, आई-वडील, माहेरची माणसे सारं काही सोडून पतीच्या घरी जावं लागतं. विवाहानंतर सासरच्या लोकांसोबत काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते. मुलांनाचेही लग्नानंतर बॅचलर लाईफ संपवून वैवाहिक जबाबदाऱ्यांमध्ये मन गुंतवावं लागत. त्यामुळे लग्नानंतर अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्यामुळे मुलगा अथवा मुलगी दोघांनाही मानसिक ताणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं.

नवीन घरी शिफ्ट होणे (Moving To A New Home)

कधी कधी कामानिमित्त तुम्हाला वेगळ्या शहरात जावं लागतं किंवा त्याच शहरात वेगळ्या घरात शिफ्ट व्हावं लागतं. नवीन घरातील बदललेल्या वातावरणामुळेदेखील तुम्हाला मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी राहण्याची तुम्हाला एवढी सवय लागते की दुसऱ्या ठिकाणी पुन्हा घर बसवणे थोडं कठीण जावू शकतं.

ADVERTISEMENT

परीक्षेचा ताण-तणाव (Examination Stress)

विद्यार्थ्यांना परीक्षेमुळे येणारा ताण-तणाव देखील मेंटल प्रेशरचे एक कारण असू शकते. कारण परीक्षेच्या काळात पेपर कसा असेल? अभ्यास केलेले प्रश्न येतील का? चांगले मार्क्स मिळतील का? परीक्षेचं सेंटर कोणतं असेल? अशा अनेक प्रश्नांचा मनात गुंता सुरू असतो. सहाजिकच यामुळे तुमच्या मनावर अतिरिक्त ताण पडू शकतो.

मानसिक ताणाची ही अगदी सामान्य कारणे आहेत वास्तविक यापलीकडे अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे तुमच्या मनावर ताण येऊ शकतो. शिवाय कधी कधी तुम्ही ज्या गोष्टींचा ताण घेता ती गोष्ट इतरांसाठी अगदी सामान्य असू शकते. मात्र तुमची मात्र त्या गोष्टीमुळे झोप देखील उडू शकते.

मानसिक ताणाची लक्षणे (Symptoms Of Mental Pressure)

मानसिक ताणाची कारणे अनेकांना माहित असतातच मात्र त्यासोबतच तुम्हाला मेंटल प्रेशरची लक्षणेदेखील माहित असायला हवी. मानसिक ताणाची शारीरिक आणि भावनिक लक्षणे असू शकतात.

Symptoms Of Mental Pressure
मानसिक ताणाची भावनिक लक्षणे (Emotional Symptoms Of Mental Pressure)

  1. अचानक राग येणे
  2. मूड स्वींग होणे
  3. छोट्या छोट्या गोष्टींना मनाला लावून घेणे
  4. स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण नसणे
  5. मन शांत नसणे
  6. झोप न येणे
  7. नकारात्मक विचार मनात येणे
  8. आत्मविश्वास कमी होणे
  9. एकटेपणाची भावना असणे
  10. लोकांमध्ये मिसळण्याची भिती वाटणे
  11. सतत चिडचिड होणे
  12. घराबाहेर न जाणे

मानसिक ताणाची शारीरिक लक्षणे (Physical Symptoms Of Mental Pressure)

  1. अशक्तपणा जाणवणे
  2. सतत डोकेदुखी ची समस्या होणे
  3. डायरिया,बद्धकोष्टता होणे
  4. पोटात दुखणे
  5. पाठ दुखणे
  6. ह्रदयाची धडधड वाढणे
  7. झोप न येणे
  8. सतत सर्दी, ताप येणे
  9. सेक्सची इच्छा कमी होणे
  10. अंगाला  घाम सुटणे
  11. तोंड कोरडे होणे
  12. घास गिळण्यास त्रास होणे

मानसिक तणाव कमी करण्याचे उपाय (How To Relieve Mental Pressure)

मानसिक ताण कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसोबतच जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं आहे. यासाठीच या छोट्या छोट्या गोष्टी करा आणि मानसिक ताणाला दूर ठेवा.

ADVERTISEMENT

कुटुंबासोबत वेळ घालवा (Spend Time With Family)

कामाचा ताण प्रत्येकाला असतोच. मात्र शक्य असेल तर घरी आल्यावर ऑफिसच्या कामाचा विचार करू नका. शिवाय सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालविल्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ताणापासून दूर राहू शकाल. आजकाल सर्वजण घरी आणि घराबाहेर मोबाईल आणि इतर गॅझेट्समध्ये गुंतलेली दिसतात. डिजिटल माध्यमांमुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूरावले जातो. त्यामुळे दिवसभरातील काही तास हे फक्त घरच्यांसाठी राखून ठेवा. गप्पा-टप्पा आणि सुख-दुःख घरच्यांसोबत शेअर केल्यामुळे तुमचा मानसिक ताण नक्कीच कमी होऊ शकतो.

आवडीचं संगीत ऐका (Listen To Music)

Music

संगीतमध्ये  कोणतेही दुःख विसरण्याची ताकद असते. शांत म्युझिक अथवा आवडीची गाणी ऐकल्यामुळे तुमच्या  मनावरचा ताण कमी होऊ शकतो. यासाठी सकाळी ऑफिसला जाण्याआधी अथवा संध्याकाळी घरी आल्यावर तुमच्या आवडीची गाणी ऐका. संगीत क्लासिकल, बॉलीवूड अथवा वेस्टर्न असलं तरी चालेल फक्त ते तुमच्या आवडीचंं असेल याची काळजी घ्या. इतरांना त्रास होऊ नये यासाठी कानात एअर फोन घाला आणि मोबाईलवर तुमच्या आवडीची गाणी लावा. डोळे बंद करून थोडावेळ एका वेगळ्याच दुनियेचा अनुभव घ्या. यामुळे तुमचं मेंटल प्रेशर अवश्य कमी होईल.

नियमित मेडीटेशन करा (Do Regular Meditation)

मेडीटेशन अर्थात ध्यान करण्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. योगासन आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते. यासाठी दररोज सकाळी नियमित ध्यानाचा सराव करा. सुरूवातीला तुमचे मन ध्यान करण्यास नकार देईल. ध्यानाला बसल्यावर तुमच्या मनात अनेक विचारांचा गोंधळ देखील उडेल. मात्र मुळीच चिंता करू नका. हळूहळू सरावाने तुमचे मन शांत आणि निवांत होईल. जर तुम्हाला मेंटल प्रेशरपासून दूर राहायचे असेल तर नियमित मेडीटेशन करा.

तुमचा आवडता छंद जोपासा (Find Your Hobby)

प्रत्येकाला एखादा छंद असू शकतो. काहीजणांना लेखनाची आवड असते तर काहीजणांना निरनिराळे पदार्थ तयार करण्याची. तुम्हाला काय करायला आवडतं हे ओळखा. पैसे कमाविण्याच्या धावपळीत कधीकधी आपण आपल्या आवडी-निवडी विसरून जातो. मात्र कामावरून आल्यावर अथवा  सुटीच्या दिवशी एखादा छंद जोपासला तर त्यात तुमचे मन गुंतून राहू शकते. मन एखाद्या आवडी-निवडीत गुंतविल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण आपोआप कमी होऊ लागतो. नृत्य, गाणी, कलाकुसर, चित्रकला अशा अनेक छंदापैकी तुमचं मन कशात रमतं ते ओळखा आणि मानसिक ताणापासून मुक्त व्हा.

ADVERTISEMENT

ऑफिसमधील काम घरी आणू नका (Don’t Bring Work Home)

Don't Bring Work Home

ऑफिसचे काम शक्य झाल्यास ऑफिसमध्येच करा. काही लोकांना कामाचा ताण ऐवढा असतो की ते ऑफिसचे काम घरी घेऊन जातात. यामुळे तुम्ही दिवसरात्र फक्त कामच करत राहता. कामाचा ताण वाढत गेल्यामुळे तुमच्या मनावरील ताणही वाढू लागतो. शिवाय यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या लोकांनाही पुरेसा वेळ देऊ शकाल. ऑफिसमधील काम, घरातील काम आणि सामाजिक काम अशा तीन स्थरांवर माणूस काम करत असतो. त्यामुळे जे काम जेव्हा कराल तेव्हा ते प्रामाणिकपणे करा. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच कामाचा ताण येणार नाही.

वाचा – Types Of Bipolar Disorder In Marathi

कुटुंबासोबत बाहेर फिरायला जा (Go Out With Family)

family

घरच्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याची एक वेगळीच मौज असते. निसर्गरम्य वातावरण, बदलेली भौगोलिक परिस्थिती, मुक्त भटंकती, अशा अनेक गोष्टींमुळे यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होतो. उंच डोंगरदऱ्या, अथांग समुद्रकिनारा, जंगलसफारी तुम्ही निसर्गामध्ये गुंतून राहता. शिवाय या निमित्ताने तुम्ही तुमच्या कुटुंब आणि जवळच्या लोकांच्या अधिक जवळ जाता. मनातील गोष्टी एकमेकांना सांगितल्यामुळे तुम्हाला मानसिक ताणापासून मुक्ती मिळू शकते. आजकाल अनेक ट्रॅव्हल कंपनी तुमच्यासाठी टूर ऑर्गनाईझ करतात. तेव्हा वर्षातून एकदा अथवा दोनदा बाहेरगावी फिरायला जा. 

ADVERTISEMENT

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. मानसिक ताणाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

मन आणि शरीर यांचा खूप जवळचा संबध असतो. त्यामुळे मानसिक समस्यांचा परिणाम थेट तु्मच्या शरीरावर होऊ लागतो. मानसिक ताण वाढल्यायस तुम्हाला उच्च रक्तदाब, ह्रदयसमस्या, मधूमेह अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय यामुळे पुढे तुम्हाला अनेक मानसिक आजार आणि नैराश्यालादेखील सामोरे जावे लागू शकते.

2. मानसिक ताणामुळे मृत्यू होऊ शकतो का?

मानसिक ताण वाढल्यास माणूस मानसिक आजार आणि नैराश्याच्या आहारी जातो. मानसिक ताण सहन न झाल्यास दगावल्याच्या अनेक घटना आहेत. शिवाय यामुळे ह्रदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसिक ताणावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

ADVERTISEMENT
15 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT