प्रत्येक स्वयंपाकघरात चाकू ही अत्यंत गरजेची वस्तू आहे. याशिवाय तुमचे कोणतेही काम स्वयंपाकघरात होणे शक्य नाही. त्यामुळे चाकू नुसता असून चालत नाही तर चाकूला योग्य धार असणे आणि चाकू चांगला असणंही तितकंच गरजेचे आहे. पण बऱ्याचदा चाकू नीट वापरला जात नाही अथवा ठेवण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे चाकू खराब होतो आणि त्याला गंज लागतो. गंजामुळे चाकूची धार बोथट होते. तर चाकूला लवकर गंज लागतो आणि हा गंज काढणे तितकेच गरजेचे आहे. पण बरेचदा कितीही प्रयत्न केला तरीही चाकू व्यवस्थित ठेवले जात नाहीत आणि मग ते खराब होतात अथवा त्याला गंज लागतो. कार्बन स्टीलवाल्या ब्लेड्सच्या चाकूना लवकर गंज लागतो आणि स्टेनलेस स्टीलच्या चाकूला लवकर गंज लागत नाही. तसंच सेरेमिक ब्लेड्सवर गंज लागत नाहीत. चाकूवरील गंज कसा काढायचा याचा उपाय आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत. तुम्हीही याचा वापर करून घ्या.
बेकिंग सोड्याचा वापर करून हटवा गंज
चाकूवरून गंज हटविण्यासाठी बेकिंग सोडा (Baking Soda) हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्ही चाकू थोडा ओला करा आणि त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा घाला. साधारण 5 मिनिट्स बेकिंग सोडा त्यावर तसाच राहू द्या. पाच मिनिट्सनंतर स्क्रबने हे स्वच्छ करून घ्या. त्वरीत तुम्हाला गंज निघालेला दिसून येईल. व्यवस्थित स्वच्छ होईपर्यंत बेकिंग सोड्याने तुम्ही स्वच्छ करा. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसा आणि सुकल्यावर जागेवर ठेवा.
व्हिनेगरने काढा गंज
तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या चाकूचा गंज हटविण्यासाठी व्हिनेगर (Vinegar) तुम्हाला चांगलीच मदत करू शकेल. यासाठी तुम्ही एका कपात अर्धा कप व्हिनेगर भरून ठेवा. त्यानंतर साधारण 5 मिनिट्सपर्यंत गंज लागलेला चाकू त्यामध्ये तुम्ही बुडवून ठेवा. त्यानंतर काढून तुम्ही स्वच्छ करा. लक्षात ठेवा की, तुम्ही जास्त वेळ चाकू व्हिनेगरमध्ये बुडवून ठेऊ नका. अन्यथा चाकूचे ब्लेड खराब होण्याची शक्यता असते.
बटाट्याच्या रसाने हटवा गंजाचे डाग
बटाट्यामध्ये (Potato) ऑक्सेलिक अॅसिड असते, जे गंज काढण्याची क्षमता अधिक दर्शवितात. बटाट्याला चिर मारून तुम्ही त्यात चाकू ठेवल्यास, त्याचा गंज निघण्यास मदत मिळते. तसंच चाकू बटाट्याच्या रसातही काही वेळ ठेऊन तुम्ही त्याचा गंज काढू शकता. रात्रभर चाकू तुम्ही बटाट्याच्या रसामध्ये ठेवा आणि मग सकाळी डिटर्जंट आणि पाण्याने धुवा. नंतर सुकल्यावर व्यवस्थित जागेवर ठेवा.
लिंबाच्या रसाने काढा गंज
चाकूला गंज लागला असेल तर लिंबाच्या रसाचाही (Lime Juice) तुम्ही वापर करू शकता. यामुळे गंज घालविण्यास मदत मिळते. यामध्ये असणारे सायट्रिक असिड हे गंजाच्या डागांना काढून टाकण्यास फायदेशीर ठरते. तुम्हाला केवळ इतकेच करायचे आहे की, लिंबू कापून गंज लागलेल्या ठिकाणी चाकूवर घासा आणि त्यानंतर चाकू धुवा. तुम्ही चाकू धुण्याआधी काही मिनिट्स आधी लिंबू चाकूवर रगडा आणि त्यानंतर चाकू धुऊन स्वच्छ करा. यामुळेही चाकूवरील गंजाचे डाग निघण्यास मदत मिळते.
कांद्याच्या रसाचा करा वापर
कांदा हा स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग आहे. प्रत्येक भाजीमध्ये आपल्याकडे कांदा वापरला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? कांद्याचा वापर करून तुम्ही चाकूचा गंजही काढू शकता. कांद्यामध्ये सल्फेनिक अॅसिड असते, जे गंज काढण्यासाठी उपयोगी ठरते. यासाठी तुम्ही चाकूला कांद्याचा रस योग्यरित्या लावा आणि ठेवा. एक तासानंतर चाकू स्वच्छ करून घ्या. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही दुसऱ्यांदादेखील हा प्रयोग करून डाग काढू शकता.
चाकूवरील गंज घालविण्यासाठी तुम्हाला हे काही सोपे उपाय आणि टिप्स आम्ही सांगितल्या आहेत. पण तुम्हाला चाकूला गंज चढावा अशी वेळच येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही चाकू रोज धुवा आणि सुकवल्यानंकरच होल्डरमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला चाकूवर स्पॉट्स दिसून येतील तेव्हा त्वरीत चाकू स्वच्छ करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक