ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
easy tips to remove smell from cloths

ओल्या कपड्यांमधून येत असेल दुर्गंध तर वापरा सोप्या टिप्स

पावसाचा हंगाम आपल्याला त्यातील गारव्यामुळे नक्कीच आवडतो. पण पावसामुळे घरातील कपडे न सुकणे ही एक मोठी समस्या आहे. कपडे सुकले नाही तरी एक वेळ चालून जाते. पण ते तसेच ओले राहिल्यानंतर त्यातून एक वेगळा दुर्गंध घरात येऊ लागतो. कपड्यांमध्ये एक प्रकारचा दमटपणा राहिल्यामुळे दुर्गंध येतो. तसंच कपडे सुकण्यासाठी खूपच वेळ लागतो. जेव्हा कपडे ओले राहतात, तेव्हा त्यातून दुर्गंध येऊ लागतो. काही वेळा तर पाऊस नसतानाही योग्य ठिकाणी कपडे वाळत न घातल्यास, असा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. पण तुम्हाला लवकर कपडे सुकवायचे असतील आणि त्यातून दुर्गंधी येऊ नये असे वाटत असेल तर आम्ही तुम्हाला कपडे सुकविण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत. यामुळे दुर्गंधीपासूनही तुम्ही राहाल दूर.

क्लोथिंग रॅकचा करा वापर

Freepik

कपड्यांचा रॅक तुमच्यासाठी योग्य आहे. ज्याचा उपयोग तुम्ही पावसाळ्यातच नाही तर अगदी प्रत्येक हंगामात करू शकता. घरात कपडे तुम्ही अगदी पंख्याखालीही सुकवू शकता. क्लोथिंग रॅकवर कपडे घातल्यास, वेळेत सुकण्यास मदत मिळते. तुम्ही एखादा मोठा रॅख खरेदी करा आणि तुमचे कपडे मोकळ्या हवेशीर खोलीत वाळत घाला. कपडे तुम्हाला लवकर सुकायला हवे असतील तर तुम्ही पंखा चालू ठेवा. यामुळे कपड्यांना येणारा दुर्गंध निघून जाण्यास मदत मिळते. 

कपडे एकत्र ठेऊ नका

बरेचदा काही जण भिजलेले कपडे दुसऱ्या दिवशी धुवायचे असले तरीही एकत्र ठेवतात. पण असे करणे चुकीचे आहे. यामुळे कपड्यांना एक वेगळीच दुर्गंधी दुसऱ्या दिवशी येऊ लागते. अशी दुर्गंधी कपडे धुतल्यानंतरही लवकर निघून जात नाही. लहान लहान कपडे हाताने धुवा आणि एका कोपऱ्यात तुम्ही दोरी बांधून त्यावर सुकवा. तसंच तुम्हाला हवं तर ओले कपडे पंख्याखाली सुकवा आणि नंतर धुवायला टाका. यामुळे दुर्गंधी येणार नाही. 

कपडे धुण्यासाठी व्हिनेगर वा बेकिंग सोडा

baking soda
Shtterstock

बऱ्याचदा चांगल्या डिटर्जंटचा वापर करूनही दुर्गंधी जात नाही. तुम्ही जी पावडर वापरत आहात त्याचा सुगंध या दुर्गंधीपेक्षा कमी ठरत असेल. तर अशावेळी तुम्ही या पावडरसह पाण्यात थोडेसे व्हाईट व्हिनेगर अथवा बेकिंग सोडा मिक्स करून पाहा. या दोन्ही पर्यायामुळे कपड्यांना येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होते आणि ओल्या कपड्यांतून येणारा हा वास निघून जातो. तसंच कपडे अधिक छान दिसतात आणि व्यवस्थित धुतले जातात. बेकिंग सोड्याचे अनेक फायदे होतात.

ADVERTISEMENT

कपड्यांना इस्त्री करणे विसरू नका

हो हे खरं आहे. ओले कपडे लवकर सुकविण्यासाठी आणि त्यातून दुर्गंधी काढण्यासाठी तुम्ही हा पर्यायही वापरू शकता. जेव्हा तुमचे कपडे सुकतील तेव्हा लगेचच त्यांना इस्त्री करा. यामुळे त्यातील जो काही थोडासा दमटपणा राहिला असेल तो निघण्यास मदत मिळते. तसंच त्यातून दुर्गंधी येणे बंद होईल. इस्त्री केल्यामुळे उरलेल्या दमटपणातून तुम्हाला सुटका मिळते. पण तुमचे कपडे अधिक ओले असतील तर तुम्ही त्यावर इस्त्री करू नका. अन्यथा कपडे जळण्याचा धोका असतो. इस्त्री चिकटण्याचाही धोका असतो. 

कपडे धुताना करा लिंबाचा वापर

हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे. ज्या पाण्यात तुम्ही कपडे भिजवणार आहात त्यामध्ये आधी थोडासा लिंबाचा रस तुम्ही घाला. यामुळे कपडे सुकल्यानंतर लिंबाचा ताजा आणि अप्रतिम सुगंध कपड्यांवर राहतो. लिंबामुळे कपड्यांवर कोणताही डाग असेल तर तो निघून जाण्यासही मदत मिळते. तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणार असाल तर तुम्ही पावडरसह लिंबाचा रस घाला आणि त्यानंतर मशीन स्टार्ट करा. तुमच्या कपड्यांना दुर्गंधी येणार नाही. 

या पद्धतीने तुम्ही कोणत्याही हंगामात तुमचे कपडे सुकवू शकता आणि या सोप्या टिप्स वापरून तुम्ही कपड्यांमधील ओलेपणामुळे येणारी दुर्गंधीही कमी करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT