ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to clean tiles

सिरॅमिक टाइल्सवर पडले असतील काळे ओरखडे तर हा उपाय करा

तुमच्या घरात सिरॅमिकच्या टाईल्स असल्यास त्यावर वारंवार  काळे ओरखडे उमटतात. टाइल्सवरील डाग किंवा काळे ओरखडे गडद विशेषतः काळे सोल असलेले शूज, फर्निचरचे पाय आणि लहान मुलांच्या खेळण्यांतील रबरच्या चाकांमुळे पडतात. आपण कितीही महाग फ्लोअर क्लिनर वापरून टाइल्स स्वच्छ पुसल्या तरीही हे डाग व ओरखडे जात नाहीत किंवा अगदी फिकटही होत नाहीत. डाग कपड्याला असोत की किचनच्या टाइल्सला,ते सगळा लूक बिघडवतात. एक साधा डाग पांढऱ्याशुभ्र टाइलचा लूक खराब करू शकतो. अनेक महिने फ्रिज त्याच ठिकाणी ठेवल्यानेही टाइल्सवर जाड आणि पिवळसर कोटिंग तयार होते, ज्यामुळे फरशा खराब दिसू लागतात. फ्रिज हलवल्यानेही टाइल्सवर काळे ओरखडे पडू शकतात. 

परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वापरून टाइल्सवर पडलेले हट्टी डाग व ओरखडे सुरक्षितपणे आणि सहजतेने काढून टाकू शकता, जेणे करून तुमच्या सुंदर टाईल्स स्वच्छ होतील व नव्यासारख्या चमकतील. ओरखडे व डाग काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, आधी टाइल्सवरील धूळ किंवा घाण काढून टाकण्यासाठी टाईल्स स्वच्छ झाडून घ्या व पुसून घ्या जेणे करून तुमच्या फरशीवर जास्त घाण न होता ओरखडे व डाग काढून टाकणे तुम्हाला सोपे होईल. हे डाग व ओरखडे काढून टाकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही. तुमच्या घरातच असलेल्या वस्तू वापरून तुम्ही हे डाग काढू शकता. 

How To Remove Scuff Marks
How To Remove Scuff Marks

खोडरबर

मोठ्या पेन्सिल खोडरबरचा वापर थोड्या प्रमाणात स्कफ मार्क्स काढण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु तुम्हाला नवीन पांढरा किंवा हलक्या रंगाचा खोडरबर वापरावा लागेल कारण रंगीत खोडरबरमुळे कदाचित पांढऱ्या फरशीवर डाग पडू शकतात. एक चांगला पांढरा खोडरबर घ्या आणि स्कफ मार्क निघून जाईपर्यंत तो त्या डागांवर किंवा काळ्या ओरखड्यांवर घासा. हा उपाय एक किंवा दोन किंवा अगदी लहान डागांवर व काळ्या ओरखड्यांसाठी चांगला आहे. मोठ्या ओरखड्यांसाठी तुम्हाला खूपच मेहनत करावी लागेल. मोठ्या डागांसाठी दुसरी पद्धत वापरा. 

टेनिस बॉल 

तुम्हाला हे विचित्र वाटेल पण टेनिस बॉलचा वापर करून तुम्ही तुमच्या टाइलला पडलेले डाग काढू शकता. यासाठी तुम्हाला मूळ पिवळसर/हिरवा टेनिस बॉल वापरावा लागेल कारण काही गडद रंगाच्या टेनिस बॉलमुळे तुमच्या टाइल्सवर डाग पडू शकतात. यासाठी बॉलमध्ये झाडूचे हँडल बसेल इतका मोठा क्रॉस किंवा X आकारात बॉलला चिरा द्या. त्यानंतर त्यात झाडूचे हॅन्डल घाला व स्कफ मार्क्सवर टेनिस बॉल डाग जाईपर्यंत घासा. 

ADVERTISEMENT
How To Remove Scuff Marks
How To Remove Scuff Marks

टूथपेस्ट 

दात स्वच्छ करण्याबरोबरच टाइल्सवरील डाग साफ करण्यासाठी टूथपेस्ट हा एक उत्तम पर्याय आहे. टूथपेस्टच्या मदतीने तुम्ही अगदी हट्टी डाग व काळे ओरखडे काही मिनिटांतच काढून टाकू शकता. डाग पडलेली फारशी एक किंवा दोनदा पाण्याने पुसून घ्या. आता डाग असलेल्या भागावर टूथपेस्टचा जाड थर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. काही वेळाने सॅंडपेपरने घासून स्वच्छ करा. यामुळे काळे ओरखडे व डाग सहजपणे निघून जातील. 

बेकिंग सोडा 

बेकिंग सोडा हा केवळ स्वयंपाकातच नाही तर टाइल्सवरील कोणत्याही खुणा सहजपणे काढून टाकण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. स्वच्छतेसाठी बेकिंग सोड्याचे अनेक उपयोग केले जाऊ शकतात. बेकिंग सोडा वापरून तुम्ही टाइल्सवर पडलेल्या फ्रीजच्या खुणा सहज काढून टाकू शकता. याच्या वापराने डाग व ओरखडेही दूर होतील आणि टाइल्सचा रंगही परत येईल. त्यासाठी एक लिटर पाणी थोडेसे गरम करा. आता हे पाणी डाग पडलेल्या जागेवर शिंपडा. पाणी शिंपडल्यावर त्यावर एक ते दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि थोडा वेळ तसाच राहू द्या. सुमारे 10 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रश किंवा स्क्रबच्या मदतीने ते स्वच्छ करा. हा उपाय केल्यास टाइल्सवरचे हट्टी डाग सहजपणे निघून जातील. 

अशा प्रकारे तुम्ही टाइल्सवर पडलेले डाग व ओरखडे सहजपणे काढू शकता. 

Photo Credit – The Spruce, Maid Sailors 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT