पेट्रोलियम जेलीचा वापर केवळ फाटलेले ओठ किंवा भेगा पडलेल्या टाचा मऊ करण्यासाठीच नाही तर पेट्रोलियम जेलीचे त्वचेशी संबंधित इतरही अनेक फायदे आहेत. जरी बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ते विशेषतः हिवाळ्यात त्वचेचे पोषण करण्यास उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहितेय का,उन्हाळ्यातही पेट्रोलियम जेली उपयोगी पडू शकते. तेही सनबर्न दूर करण्यासाठी! तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करून त्वचेवरील सन टॅन सहज काढू शकता.तुमच्या सनबर्न झालेल्या त्वचेवर पेट्रोलियम जेली लावल्यास त्वचेचे पुढील नुकसान टाळण्यास मदत होते. पेट्रोलियम जेली तुमची त्वचा मऊ करण्यास आणि त्यातील ओलावा लॉक करण्यास मदत करते. पेट्रोलियम जेली त्वचेचे कवच म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान करणारे कण त्वचेत जाण्यापासून रोखले जातात. जाणून घ्या पेट्रोलियम जेली वापरून आपण टॅनिंग कसे काढू शकतो.
दूध, मध व पेट्रोलियम जेली वापरून काढा सन टॅन
यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुमच्या घरात सहज मिळू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा पेट्रोलियम जेली, एक चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक चमचा कोमट दूध आवश्यक आहे. एका भांड्यात मध, पेट्रोलियम जेली आणि लिंबाचा रस घेऊन मिसळा. नंतर त्यात एक चमचा कोमट दूध घाला. याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. त्यानंतर कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ही पेस्ट तुमच्या शरीराच्या टॅन झालेल्या भागांवर लावा. ही पेस्ट शरीरावर लावल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटे वर्तुळाकार गतीने मसाज करा. नंतर सुमारे 20-30 मिनिटे ते तसेच ठेवा व नंतर धुवून टाका. तुम्ही ही पेस्ट झोपताना लावून रात्रभर तशीच ठेवू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. आणि स्वच्छ टॉवेलने तुमची त्वचा कोरडी करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीनदा करू शकता. टॅनिंग काढण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.
ऍलोवेरा जेल व पेट्रोलियम जेली काढते टॅनिंग
यासाठी तुम्हाला एक चमचा व्हॅसलीन, एक चमचा एलोवेरा जेल, 3-4 थेंब गुलाबपाणी या गोष्टींची आवश्यकता आहे.एका भांड्यात पेट्रोलियम जेली, कोरफड जेल आणि गुलाबपाणी घाला. एकत्र करून एक गुळगुळीत पेस्ट बनवा. नंतर कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ही पेस्ट तुमच्या शरीराच्या टॅन झालेल्या भागांवर लावा. या पेस्टने तुमच्या शरीरावर सुमारे दोन ते तीन मिनिटे वर्तुळाकार गतीने मसाज करा. आणि सुमारे 20-30 मिनिटे त्वचेवर ठेवा. किंवा तुम्ही ही पेस्ट रात्रभर देखील लावून ठेवू शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती धुवून टाका.दिवसातून एकदा हा उपाय करा.
तुम्हाला जर कुठलीही पेस्ट बनवायची नसेल तर फक्त पेट्रोलियम जेली सुद्धा तुम्ही टॅन झालेल्या भागावर लावू शकता. त्यावर सुती कापड बांधून त्वचा झाकून ठेवा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. सकाळी तुम्हला तुमची त्वचा पूर्णपणे तरुण आणि टवटवीत झालेली वाटेल आणि टॅन पूर्वीपेक्षा खूपच कमी होईल.
टॅनिंग काढण्यासाठी इतर उपाय
कोरफड सर्व घरगुती उपचारांमध्ये निर्विवादपणे सर्वात प्रभावी आहे. अनेक फायद्यांनी भरलेली, ही वनस्पती त्वचा आणि आरोग्याच्या विविध समस्यांवर उपाय म्हणून सर्वात जास्त प्रभावी आहे. कोरफड जेल तुम्हाला तुमच्या त्वचेवरील टॅन काढून टाकण्यास मदत करेल आणि त्याच वेळी डाग आणि मुरुम कमी करण्यासही मदत करेल. रात्रभर हे जेल लावा आणि सकाळी धुवा.तसेच टोमॅटो हा देखील तुमची त्वचा उजळ करण्याचा आणि टॅनपासून मुक्त होण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
अशा प्रकारे तुम्ही त्वचेवरील टॅनिंग काढू शकता.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक