पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी केवळ इंडस्ट्रियालिस्ट आणि सरकारची नाहीये. तर आपल्यासारखे सामान्य नागरिक सुद्धा रोज अनेक सवयींमध्ये बदल करून पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावू शकतात. आपण प्रत्येकानेच ‘रिड्यूस -रियुझ व रिसायकल’ हा मंत्र अंमलात आणला तर पर्यावरणाचा ऱ्हास खूप कमी होईल. आपण रोजच्या वापरातल्या अनेक वस्तू एकदा वापरून टाकून देतो. याच वस्तूंचा खूप मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होतो. शहरांच्या बाहेर डंपिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याचे अक्षरश: डोंगर साचतात. प्लास्टिक आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या, नैसर्गिकरित्या विघटन न होणाऱ्या इतर वस्तूंचा भलामोठा साचलेला डोंगर बघितला की काळजात धस्स होते. या कचऱ्याचे काय होणार, आपण एकदा वापरून टाकून दिलेल्या या वस्तू आणखी किती हजारो वर्षे अशाच पडून राहणार व पर्यावरणाचे किती भयंकर नुकसान करणार या विचारांनीच अंगावर काटा उभा राहतो. म्हणूनच आपण शक्य तितक्या वस्तू रिसायकल केल्या पाहिजेत. युझ अँड थ्रो वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे. अशीच एक युज अँड थ्रो वस्तू म्हणजे ऍल्युमिनियम फॉईल होय. (How to Reuse Aluminium Foil Paper?)
का करावा पुनर्वापर?
1900 च्या दशकाच्या सुरुवातीस कॅंडीसाठी रॅपर म्हणून सर्वप्रथम ऍल्युमिनियम फॉइलचा उपयोग झाला आणि त्वरीत टिन फॉइल घराघरांतील स्वयंपाकघरांमध्ये वापरले जाऊ लागले.. आज वापरण्यास सोपे असे ऍल्युमिनियम फॉईल प्रकाश आणि ऑक्सिजनपासून संपूर्ण संरक्षण देते आणि म्हणूनच अन्न आणि इतर नाशवंत वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी आदर्श आहे. तथापि, हे सोयीस्कर संसाधन मिळवणे काही सोपे नाही. ऍल्युमिनियम फॉईल बनवण्यासाठी बॉक्साईट धातूवर प्रक्रिया करावी लागते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता असल्यामुळे ऍल्युमिनियम काढण्यासाठी संसाधनांचा खर्च खूप जास्त असतो. तसेच ते इको फ्रेंडली देखील नाही. म्हणूनच ऍल्युमिनिअम फॉईलचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे.
ऍल्युमिनिअम फॉईलचा पुनर्वापर कसा करता येईल?

एकदा वापरलेले ऍल्युमिनियम फॉईल पुन्हा पुन्हा वापरता येणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी फॉइल डिशवॉशरमध्ये किंवा कोमट पाण्याने आणि साबणाने धुवा आणि नंतर त्यावर लाटणे फिरवून ते पुन्हा सरळ करून घ्या. फक्त लक्षात ठेवा की कच्च्या मांसाच्या संपर्कात आलेले फॉइल कधीही पुन्हा वापरू नये.
स्क्रबर म्हणून वापरा
जर तुमच्या कढया,पॅन, भांडी, ड्रिल किंवा ओव्हनचे दरवाजे खराब झाले असतील तर आपण ते ऍल्युमिनियम फॉइल वापरून साफ करू शकता. ऍल्युमिनियम फॉईलचा एक बोळा करा त्यावर बेकिंग सोडा घाला आणि नंतर त्या बोळ्याने घासून तुमच्या वस्तू स्वच्छ करा. महत्वाचे म्हणजे तुम्ही हे वापरून स्टीलला लागलेला गंज देखील स्वच्छ करू शकता.

इस्त्री करणे
कपड्यांना कडक इस्त्री करण्यासाठी आणि सुरकुत्या काढून टाकण्यासाठी इस्त्री करताना कपड्यांच्या खाली फॉइल शीट ठेवा. फॉइल लोखंडाचे तापमान रिफ्लेक्ट करते आणि त्यामुळे ते कापड खालून देखील गरम करते व सुरकुत्या अधिक प्रभावीपणे काढून टाकते.
चांदीच्या वस्तू आणि दागिने साफ करणे
एका भांड्याला ऍल्युमिनियम फॉइल लावा आणि त्यात गरम पाणी घाला. त्यात ब्लीच-फ्री डिटर्जंट पावडर किंवा बेकिंग सोडा घाला. ते चांगले मिसळा व त्यात दागिने किंवा चांदीची भांडी ठेवा. तुमचे दागिने किंवा चांदीची भांडी ह्या पाण्यात केवळ एक ते दोन मिनिटे ठेवा व नंतर त्यातून काढून त्यांना हवेत सुकवा. यामुळे तुमचे दागिने किंवा चांदीची भांडी चकचकीत होण्यास मदत होईल.
कात्रीला धार लावणे
वापरलेल्या फॉइलचा तुकडा सात ते आठ वेळा फोल्ड करा. नंतर जी कात्री बोथट झाली आहे ती वापरून फॉईल अनेक वेळा कापा. असे केल्यास तुमची कात्री पुन्हा धारदार होईल.
अशा प्रकारे तुम्ही ऍल्युमिनियम फॉईलचा पुनर्वापर करू शकता.
Photo Credit – istockphoto, unsplash
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक