ADVERTISEMENT
home / Eye Make Up
जुन्या आयशॅडो पॅलेटचा असा करा उपयोग होणार नाही त्रास

जुन्या आयशॅडो पॅलेटचा असा करा उपयोग होणार नाही त्रास

प्रत्येक महिलेकडे मेकअपचे अगदी बेसिक सामान असतेच. कधीतरी मेकअप करु या विचाराने अनेकदा आयशॅडो पॅलेट, लिपस्टिकचे वेगवेगळे रंग, हायलायटर, काजळ, मस्कारा अशा गोष्टी घेतल्या जातात. मेकअपच्या साहित्यामधील काही गोष्टी या आपण वापरुन संपवू शकतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या जास्त वापरल्या जात नाहीत आणि एक्सपार्ड झाल्या की, वापरण्याचीही भीती वाटते. अशी मेकअपमधील गोष्ट म्हणजे ‘आयशॅडो’ अगदी बेसिक रंगाचे पॅलेट घेतले आणि ते फक्त तुम्ही वापरणार असाल तर ते जास्त वापरले जात नाही. त्यामुळे ते भरभर संपण्याचा प्रश्नच नसतो. आयशॅडो पॅलेट एक्पायर्ड झाले की, ते टाकून देण्याची इच्छा अनेकांना नसते. अशावेळी तुम्ही या पॅलेटमधील रंगाचा उपयोग करुन काही वेगळ्या गोष्टी करु शकता. जाणून घेऊया या जुन्या आयशॅडो पॅलेटचा उपयोग नेमका कसा करायचा.

कितीही पिंपल्स आले तरी या बजेट ट्रिटमेंट देतील नितळ त्वचा

तयार करा नेलपेंट

तयार करा नेलपेंट

Instagram

ADVERTISEMENT

 हो, तुम्ही वाचत आहात ते अगदी खरं आहे. तुमच्या जुन्या आयशॅडो पॅलेटचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या आवडीची नेलपेंट अगदी आरामात आणि कमी कष्टात बनवू शकता. 

साहित्य. जुने आयशॅडो पॅलेट, बेस नेलपेंट (ट्रान्सफरंट नेलपेंट), पेपर, नेलपुशर 

कृती

  • आयशॅडो पॅलेटमधील तुमचा आवडता रंग घेऊन तो एका पेपरवर काढून घ्या. 
  • आयशॅडो नेलपुशर किंवा इअरबड्सच्या मदतीने कुस्करुन घ्या. त्याची एकसंध पावडर होईपर्यंत असे करा. 
  • ट्रान्सफरंट नेलपेंट घेऊन त्यामध्ये पेपरच्या मदतीने फनल तयार करा. आणि त्यामध्ये या आयशॅडोची पावडर घाला.
  • एका इअर बडच्या मदतीने नेलपेंट एकत्र करा. 
  • नेलपेंटचा एक कोट अप्लाय करा. तुमची  आयशॅडोपासून नेलपेंट तयार 

डोळ्यांना आयशॅडो लावताना या तुम्ही करता का या चुका, मग वाचा

ADVERTISEMENT

क्रिम आयशॅडो

क्रिम आयशॅडो

Instagram

पावडर आयशॅडो लावायला तसे अनेकांसाठी कंटाळवाणे काम असते कारण खूप जणांना त्यासाठी ब्रश शोधा आणि चेहऱ्यावर सांडलेले त्याचे कण काढणे नकोसे होते. त्यामुळेही अनेकदा पावडर आयशॅडो पडून राहतात. पण जर तुम्ही त्याला क्रिम बेस दिला तर असे आयशॅडो वापरणे ही सोपे होऊन जाते. 

साहित्य:  तुमच्या आवडीचा आयशॅडो, मॅट क्रिम प्राईमर, एखादा छोटा डब्बा 

ADVERTISEMENT

कृती: 

  • एका छोट्या कंटेनरमध्ये  प्राईमर घ्या.
  • तुमच्या आवडत्या आयशॅडोच्या रंगाची पावडर करुन ती प्राईमर असलेल्या कंटेनरमध्ये टाका. 
  • एका काठीच्या मदतीने प्राईमर आणि शॅडो एकत्र करुन घ्या. 
  • एका टिश्यू पेपरच्या मदतीने ते समांतर करुन सेट करुन घ्या. आता तुम्ही कधीही अगदी हातानेच या क्रिम आयशॅडोचा वापर करा. 

पेटींगसाठी खास रंग

 जर तुम्हाला या वर सांगितलेल्या दोन्ही पद्धतींचा वापर करुन पॅलेट खराब करायचे नसेल तर तुम्ही या रंगाच पेंट म्हणूनही उपयोग करु शकता. एखादे चित्र काढून त्यावर ग्लिटरच्या आयशॅडोने केलेले रंग अधिक उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेही याचा वापर करु शकता 


आता आयशॅडो पॅलेट किंवा आयशॅडो फेकण्यापूर्वी त्याचा असा वापर नक्की करा.

DIY: आयशॅडोपासून तयार करा कलर आयलायनर, फॉलो करा या स्टेप्स

ADVERTISEMENT

 

जर तुम्ही उत्तम आयशॅडो पॅलेटच्या शोधात असाल तर तुम्ही MyGlammचे प्रोडक्ट नक्की ट्राय करा.

01 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT