ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
how to ripen raw mango at home

कच्चे आंबे घरात  पिकवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

आंब्याचा मस्त सीझन सुरू झाला आहे. ज्यामुळे प्रत्येकाच्या घरी मस्त निरनिराळ्या प्रकारच्या आंब्याच्या पेटी आल्याच असतील. मे महिन्यात मनसोक्त आंबे खाण्याची मजाच निराळी आहे. मात्र आंबे बाजारातून खरेदी करत असाल तर ते सावधपणे खरेदी करा. कारण आंब्याची असलेली प्रचंड मागणी पाहून अनेक विक्रेते केमिकलने पिकवलेले आंबे विकतात. जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशा वेळी थेट झाडावर पिकलेले अथवा घरात कच्चे आंबे पिकवून खाणे नक्कीच फायद्याचं ठरतं. कोकणात नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी ते आढीत ठेवले जातात. यासाठीच जाणून घ्या कच्चे आंबे घरी कसे पिकवावे.

आंबे सुकलेल्या गवतात ठेवा

आंबे पिकवण्याचा जुना आणि पारंपरिक प्रकार म्हणजे ते पेंढी म्हणजेच सुकलेल्या गवतात ठेवणे. यालाच आंब्याची आडी असं म्हणतात. काही जण यालाच आंब्याचा माच लावणं असंही म्हणतात. आंब्याच्या पेटीसोबत मिळालेलं गवत तुम्ही यासाठी वापरू शकता. मोकळ्या जागी गवत रचून त्यामध्ये आंब्याची आडी लावावी. म्हणजे आंबे एका बाजूला एक असे मांडून ठेवावे. मात्र आडीमधून डागाळलेले, कीडलेले अथवा नासलेले आंबे बाहेर काढावे. नाहीतर त्यामुळे इतर आंबे खराब होऊ शकतात. आंबे गवतात ठेवल्यामुळे उष्णतेमुळे ते एक ते दोन दिवसांत पिकतात.

तांदळात आंबे ठेवणे

एखादं फळ पिकवण्याचा हा सोपा आणि पारंपरिक मार्ग आहे. तुमच्या घरी असलेल्या तांदळाच्या डब्यात तुम्ही कच्चे आंबे यासाठी ठेवू शकता. मात्र लक्षात ठेवा आंबे तांदळाच्या वर रचून ठेवू नका. तांदळात कमीत कमी एक ते दोन फुटांवर आंबे  पुरून ठेवा. चार ते पाच दिवसांमध्ये आंबे पिकू लागतील. मात्र तांदळात या पेक्षा जास्त दिवस आंबे ठेवू नका. कारण पिकून खराब झाल्यास तुमचे तांदूळदेखील खराब होतील.

कापडात गुंडाळून ठेवा

आंबे पिकवण्यासाठी तुमच्याजवळ गवत अथवा तांदळाचा पर्याय नसेल तर, तुम्ही एखाद्या सुती कापडात आंबे गुंडाळून ठेवू शकता. सुती कापडात पुरेशी उष्णता आणि हवा खेळती राहिल्यामुळे आंबे चार ते पाच दिवसांमध्ये पिकतील. सुती कापडात गुंडाळून ठेवल्यामुळे आंब्याप्रमाणे कोणतंही कच्चं फळ तुम्ही घरी पिकवू शकता.

ADVERTISEMENT

कागदात गुंडाळून ठेवा

आंबे पिकवण्याचा हा एक आणखी सोपा उपाय आहे. वर्तमान पत्र अथवा एखाद्या कागदात तुम्ही आंबे गुंडाळून ठेवले तर ते लवकर पिकतात. कागदात तुम्हाला यासाठी चार ते पाच दिवस आंबे ठेवावे लागतील. मात्र गुंडाळलेले आंबे दररोज काढून पाहू नका. याच पद्धतीने तुम्ही कच्ची पपई अथवा चिकू पिकवू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

29 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT