कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. कोरोना विषाणू एखाद्या गोष्टींवर नऊ ते दहा सहज दिवस टिकू शकतात असं म्हटलं जात आहे. म्हणूनच आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूला वेळीच निर्जंतूक करण्याची गरज आहे. दिवसभरात आपण सर्वात जास्त हाताळतो ती वस्तू म्हणजे ‘मोबाईल फोन’ शिवाय आपण फोनवर सतत बोलत असल्यामुळे हातासोबत मोबाईलचा स्पर्श कान आणि चेहऱ्यावरही होत असतो. सहाजिकच फोनच्या माध्यमातून कोणताही जीवजंतू तुमच्या त्वचेच्या संपर्कात येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच सुरक्षेसाठी हात धुण्यासोबतच वारंवार तुमच्या मोबाईल फोनला निर्जंतूक करण्याची गरज आहे.
Shutterstock
मोबाईल फोन स्वच्छ आणि निर्जंतूक करणं का आहे गरजेचे
घरात असताना अथवा घराबाहेर जीवनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी जाताना तुम्ही मोबाईलचा सतत वापर करता. या काळात नकळत तुम्ही घराबाहेरील दरवाजे, कड्याकुलूप, वाणसामान, भाजी आणि फळे, दुधाच्या पिशव्या, पैशांची नाणी आणि नोटा अशा कितीतरी गोष्टींना हात लावता. या गोष्टी या आधी अनेकांच्या हातातून तुमच्या हातापर्यंत आलेल्या असतात. तेच हात तुम्ही मोबाईल फोनचा वापर करण्यासाठी पुन्हा मोबाईल फोनला लावता. आजकाल मोबाईल फोनशिवाय जगणं माणसाला जवळजवळ अशक्यच झालेलं आहे. याचप्रमाणे अनेक लोकांना चक्क टॉयलेट सीटवर बसतानाही मोबाईल फोन हाताळण्याची सवय असते. ज्यामुळे अशा अनेक कारणांमुळे तुमचा मोबाईल अस्वच्छ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच तो कसा स्वच्छ करायचा हे प्रत्येकाला माहीत असायला हवं.
Shutterstock
असा करा तुमचा मोबाईल फोन स्वच्छ –
एका संशोधनानुसार टॉयलेट सीटपेक्षा जास्त जीवजंतू तुमच्या मोबाईलफोनवर पोसले जातात. मोबाईलचे दुष्परिणामही अनेक आहेत. म्हणूनच तुमच्या मोबाईलची स्वच्छता कशी करावी हे जाणून घेणं सद्यपरिस्थितीत अत्यंत गरजेचं झालं आहे.
- सर्वात आधी तुमचा मोबाईल फोन त्याच्या कव्हर अथवा केस मधून बाहेर काढा.
- एका भांड्यात रबिंग अल्कोहोल आणि पाणी समप्रमाणात एकत्र घ्या आणि ते मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
- बाजारात मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारचे अॅंटि बॅक्टेरिअल लिक्विडदेखील विकत मिळतात. केमिस्टकडून तुम्ही ते विकत घेऊ शकता.
- अॅंटि बॅक्टेरिअल मायक्रो फायबर कापडावर हे लिक्विड घ्या.
- मोबाईल स्वच्छ करण्यासाठी स्प्रे बॉटलमधूनदेखील या लिक्विडचा वापर तुम्ही करू शकता. मात्र ते थेट मोबाईलवर स्प्रे करण्याऐवजी कापडावर घ्या.
- या कापडाने तुमचा मोबाईल फोन स्वच्छ पुसून घ्या. लिक्विडचे प्रमाण अधिक घेऊ नका ज्यामुळे तुमचा मोबाईल जास्त ओला होणार नाही.
- रबिंग अल्कोहोल अथवा अॅटि बॅक्टेरिअल लिक्विड हवेत लगेच उडून जाते. मात्र तरिही फोन ओलसर होणार नाही याची नीट काळजी घ्या. नाहीतर तुमचा फोन खराब होण्याची शक्यता जास्त आहे.
- फोन व्यवस्थित कोरडा होईपर्यंत तो पुसून घ्या. मात्र फोन पुसण्यासाठी कापड त्याच्यावर जोरात रगडू नका. नाहीतर तुमच्या फोनवर विनाकारण ओरखडे उठतील.
- मोबाईल फोन स्वच्छ केल्यावर फोनचे कव्हर अथवा केस स्वच्छ करण्यास मुळीच विसरू नका. कारण मोबाईलपेक्षा जास्त जीवजंतू त्यावर असू शकतात.
- मोबाईल फोनच्या कव्हरचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यामुळे ज्या मटेरिअलपासून तयार केलेले कव्हर तुम्ही वापरत आहात त्यानुसार त्याची स्वच्छता करा.
- धोका टाळण्यासाठी सध्या काही दिवस घरी असताना तुमच्या मोबाईलला कव्हर अथवा केस लावणे टाळा.
- दिवसातून एकदा तुमचा फोन नीट स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –