सुंदर घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठीच घरात अनेक वेगवेगळे बदल आपण करत असतो. नव्या ट्रेंडनुसार घरी रंगकाम करुन घेणे, किचन बदलणे, बेडरुम सजवणे अशा गोष्टी आपण सगळेच करतो. पूर्वीच्या काळी इंटेरिअर डिझाइनर्सचे फॅड जास्त नव्हते. आपआपल्या पद्धतीने लोक रंग आणि डिझाईनिंग करत होते. पण आता या कामासाठी विशिष्ट तज्ज्ञांची मदत घेतली जाते. काही जण अगदी काही वर्षांनी घराचे इंटेरिअर अगदी करुन घेतातच. पण सगळ्यांनाच सतत इतका खर्च करुन इंटेरिअर करता येईलच असे नाही. जर तुम्हाला घरात सतत काही बदल करायला आवडत असतील तर तुम्हाला पैसे कसे वाचवता येतील ते देखील जाणून घ्यायला हवे. नेमक्या कोणत्या गोष्टी करुन तुम्ही पैसा वाचवू शकता ते आपण जाणून घेऊया.
नाताळानिमित्त अशी करा घराची सजावट (How To Decorate Your Home For Christmas)
भिंतीचे पीओपी
हल्ली कोणत्याही इमारतीचे बांधकाम पाहिले की, तुम्हाला त्या भिंती या अतिशय गुळगुळीत आणि चमकदार दिसतील. जर तुमच्या घराची भिंत ही तशी नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भिंतींना पीओपी करुन घ्या. पीओपी केल्यामुळे तुम्ही काढलेला रंग हा अधिक काळ टिकण्यास मदत होते. हा खर्च जरी जास्त वाटत असला तरी देखील तुमच्या घराला लुक येण्यासाठी चांगला आहे. एकदा का भिंतीला पीओपी केले की पुन्हा तसे करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे एक प्रकारे तुम्ही असे करुन पैसे नक्कीच वाचवत आहात.
फर्निचर टाळा
आता घराचे काम करायचे म्हणजे फर्निचर आलेच. घर म्हटले की, त्यामध्ये सोफा, टीव्ही पॅनल, खुर्च्या अशा काही गोष्टी अगदी हमखास आल्याच. पण हा खर्च प्रत्येक वेळी करता येत नाही. घराचे काम कोणालाही दिल्यानंतर ती व्यक्ती घराचा आराखडा तुम्हाला देत असते. जर तुम्ही संपूर्ण घर नवे करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये फर्निचरच्या डिझाईन्सदेखील दिल्या जातात. अशावेळी तुम्ही फर्निचर करुन घेण्यापेक्षा तुम्ही फर्निचर बाहेरुन खरेदी करा. ते बनवून घेण्यापेक्षा अधिक स्वस्त मिळतात. त्यामुळे एकदा बनवून घेण्याचा आणि विकतच्या वस्तूंच्या किंमती विचारा.
घराची सजावट करून द्या घराला नवा लुक, करा स्वस्तात मस्त सजावट (Home Decor Ideas In Marathi)
कमीत कमी फर्निचर
घर जितके सुटसुटीत असेल तर तुम्ही कमीत कमी फर्निचर करा. जर घरी कमी फर्निचर असेल तर ते घर अधिक चांगलं दिसतं. घरात सगळ्यात जास्त फर्निचर हे किचनमध्ये लागतं. त्यामुळे त्या ठिकाणी काय करायचे ? याचा विचार सगळ्यात आधी करा. कारण त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त बजेट लागते. शक्य असेल तर तुम्ही कमीत कमी फर्निचर घरी ठेवा. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा फर्निचर घ्यायचे असेल तर ते घेताना फारच महागडे घेतले असेल तर ते टाकताना तुम्हाला थोडा विचार नक्कीच करावा लागतो.
लाईटिंगचा खर्च नीट तपासा
घर नवे दिसण्यासाठी लाईटिंगही तितकीच महत्वाची असते. पण कधी कधी लाईटिंग खूप करणे ही फार खर्चिक होऊन जाते.जर तुम्हाला घरी सिलिंगला खूप खर्च करायचा नसेल तर तुम्ही तो खर्च टाळा. लाईटिंग करताना तुम्ही ती गरजेपुरती करुन घ्या. त्यामुळे तुम्हाला त्याचा खर्च वाचवता येतील.
या काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही घराचे इंटेरिअर केले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच बजेटमध्ये होईल.
#HouseInterior : तुमचे घर किती हरित आहे?