ADVERTISEMENT
home / Brothers
नाती जपताना… येऊ शकतात या अडचणी

नाती जपताना… येऊ शकतात या अडचणी

कोणतंही नात जपताना त्या नात्यात अनेक चँलेंजेस येतात. नातं बहीण- भाऊ, नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, नणंद-जाऊ, सासू-सून, सून-सासरे, दीर-वहिनी.. असं कोणतही नातं जपायचं असेल तर तुम्हाला या नात्यामध्ये काहीतरी अँडजस्टमेंट करावी लागते. नात्यांवरील मराठी स्टेटस ठेवणं सोपं असतं पण नाती जपताना अनेक अडचणी येतात. पण अशी नातं जपताना तुम्ही जर काही गोष्टी सोडून दिल्या तर नातं जपताना तुम्हाला अडचणी येणार नाही. चला जाणून घेऊया नाती जपताना या अडचणींचा सामना कसा करायला हवा.

मोठे कुटुंब.. मोठ्या जबाबदाऱ्या.. एकत्र कुटुंबात जाताना

प्रत्येक जण चुकतो

माणूस म्हटल्या की,चुका आल्या. प्रत्येक जण कधी ना कधी चुकतो. त्यामुळे इतरांच्या चुकांना जास्त मनात ठेवून जर तसे वागायची सवय झालेली असेल तर तुम्ही मुळीच तसे वागू नका. कारण असे वागणे इतरांना दुखावू शकते. चूक केल्यानंतर माफी मागण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्येच नाते टिकवण्याचे गुण असतात. त्यामुळे हा गुण निर्माण करणे फारच गरजेचे आहे. 

उदा. कधीकधी आपल्याला आपली चूक झाली हे माहीत असते. पण तरीही माफी मागायची नसते कारण जर माफी मागितली तर आपल्या वयाचा,मानाचा अपमान होईल असे  आपण मानतो. वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाने माफी मागितली की, समोरच्याला खूप काही शिकायला मिळते. त्याच्यामध्येही माफी मागण्यासाठीची मानसिक तयारी होते.

ADVERTISEMENT

तुम्ही तुमचा पासवर्ड बदलता की नाही, पासवर्ड बदलताना

एकमेकांवर लादू नका आवडीनिवडी

नात्यात दरी येण्यामागे हे एक कारण नक्कीच असू शकते. खूप जण एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून न घेता आपल्याला काय आवडते हे जोडीदारावर किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीवर लादतात. असे करताना त्या व्यक्तिला तिचे असे स्वतंत्र मत राहात नाही. त्यामुळे आपसुकच एकमेकांबद्दल आकस वाटू लागतो. तुमच्या बाबतीतही असे काही होऊ लागले असेल तर तुम्ही खूप वेळ जाण्याआधीच तुम्हाला काय आवडते काय नाही? हे समोरच्याला दाखवून द्या. आधी ऐकून नंतर त्याचा विरोध करण्याऐवजी आधीच तुम्हाला काय आवडते काय नाही हे सांगा. म्हणजे त्यानुसार ती व्यक्तीसुद्धा बदलते. 

उदा. तुला हा रंग चांगला दिसणार नाही. तू हा रंग पाहू नकोस. त्यापेक्षा तू हा रंग घे. त्यामुळे तू छान उठून दिसशील. कधी कधी त्वचेचा रंग थोडासा गडद असला की, लगेचच खूप जण कोणता रंग वापरावा याचे सल्ले देऊ लागतात. तू जरा जाड आहेस तू असे कपडे घालू नकोस वगैरे हे सल्ले बिनकामाचे असतात. त्यामुळे समोरचा माणूस दुखावला जातो.

सतत कुरबुरी करत राहणे

खूप जणांना घरात खुट्ट झाले किंवा मनाविरुद्ध झाले की, लगेचच घरात कुरबुर करायला खूप आवडते. त्यांना असं वाटतं की आपल्या सतत बोलण्यामुळे आपल्याबद्दल घरात दहशत किंवा मला अमुक एक लागतं याची भावना निर्माण होईल. पण असे होत नाही. अशा व्यक्तिला चारचौघात काही सांगणे किंवा करणे हे खूप जण बंद करुन टाकतात. त्यामुळे जर तुम्ही नाहक सगळ्या कारणांमध्ये घरात वाद घालत असाल तर असा वाद करणे तुम्ही आताच टाळा कारण त्यामुळे तुमची किंमत राहील असे वाटत असेल तर असे मुळीच होत नाही. 

ADVERTISEMENT

त्यामुळे नाती जपताना आपल्या स्वभावामुळे किती अडचणी येऊ शकतात हे जाणून घेतल्यानंतर त्या टाळण्यासाठी तुम्ही या गोष्टी करणे फारच गरजेच्या आहेत. 

हेही वाचा –

कुंभ राशीच्या व्यक्तींची वैशिट्ये, काय आहेत यांचे गुण आणि दोष

18 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT