भारतीय घरामध्ये भात हा अत्यंत कॉमन पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा भात बनतो. काही ठिकाणी मऊ भात खाल्ला जातो. काही ठिकाणी लहान तांदळाचा भात असतो, तर काही ठिकाणी लांबसडक तांदळाचा भात बनते. साधारण लांब, मध्यम आणि लहान असे तांदूळ असतात. जे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पिकतात. तर आपल्याकडे पुलाव, बिर्याणीसाठी लांब तांदळाचा वापर करताता. लहान आकाराच्या तांदळाला आपल्याकडे सांबा म्हटले जाते, ज्याचे उत्पादन दक्षिणेतील तामिळनाडू येथे अधिक प्रमाणात होते. तर मध्यम आणि लांब तांदळाचे उत्पादन हे पश्चिम बंगालच्या अनेक क्षेत्रांमध्ये होते. पण बिर्याणी बनविण्यासाठी नेहमी लांब तांदूळ वापरणेच योग्य ठरते. पण हा तांदूळ योग्य आहे का? याची निवड योग्यतेने होते की नाही याबाबत आपण जाणून घेऊया. याची निवड कशी कराल हे जाणून घ्या.
लांबसडक तांदूळ
सर्वात किमती लांब असणारे तांदूळ म्हणजे सुगंधी असेल बासमती तांदूळ, जे पारंपरिकरित्या हिमालयाच्या पायथ्याशी उगविण्यात येतात. हे तांदूळ पातळ आणि लांब असून यामध्ये अधिक प्रमाणात स्टार्च असते. तसंच अत्यंत सावधानतेने हा बनविण्यात येतो. या तांदळाची बिर्याणी अत्यंत चांगली तयार होते. तसंच बिर्याणीचे तांदूळ तुटत नाहीत आणि भांड्यांना चिकटतही नाहीत.
मध्यम दाण्याचे तांदूळ
हे लांब तांदळापेक्षा थोडे लहान असतात आणि भात तयार झाल्यावर थोडासा फुललेला बनतो. या तांदळामध्ये कमी स्टार्च असतो आणि हे एकत्र दिसतात. याला टेबल राईस (Table Rice) असंही म्हटलं जातं. चीन, कोरिया, जपान या देशांमध्ये हा तांदूळ अधिक लोकप्रिय आहे. रिसोटो बनविण्यासाठी याचा अधिक वापर करण्यात येतो. मध्यम आचेवर हा तांदूळ शिजविण्यात येतो. शिजल्यावर याचा स्टार्च एक क्रिमी टेक्स्चर बनते. दिसायला जरी हे चिकट असले तरीही खाताना मात्र हे चिकट लागत नाहीत.
लहान दाण्याचा तांदूळ
केरळ आणि तामिळनाडू क्षेत्रांमध्ये अधिक वापरण्यात येणारा हा तांदूळ आहे आणि कोकणातही याचा वापर करण्यात येतो. लहान, गोल आणि स्टार्ची असणारा हा तांदूळ भात तयार झाल्यावर हात अथवा चॉपस्टिकने खाणे अत्यंत सोपे आहे. कारण हा एक एक उचलण्याची गरज भासत नाही. तुम्ही जर केरळचा पारंपरिक फिश राईस (Fish Rice) खाल्ला असेल तर त्यामध्ये अशा लाल तांदळाची स्वादिष्ट फिश करी देण्यात येते.
बिर्याणीसाठी कसा निवडाल योग्य तांदूळ
तुम्हाला बिर्याणीसाठी योग्य तांदूळ निवडायला हवा. जर तांदूळ लहान असेल तर बिर्याणी होणार नाही त्याचा पुलाव तयार होईल. त्यामुळे तांदूळ निवडण्याच्या दोन पद्धती आहेत. या पद्धती वापरून बनवा योग्य आणि परफेक्ट बिर्याणी.
बिर्याणीसाठी योग्य तांदूळ
बासमती तांदूळ (Basmati Rice) हा अत्यंत सुगंध, लांब आणि बारीक असतो. त्यामुळे बिर्याणीसाठी हाच तांदूळ शक्यतो वापरावा. बासमती तांदूळ हा शिजल्यानंतर सुटसुटीत होतो. त्यामुळे बिर्याणी (Biryani) करताना हा तांदूळ चिकटत नाही आणि बिर्याणी अधिक सुटसुटीत आणि चांगली तयार होते. तुम्ही नॉनव्हेज बिर्याणी (Non – Veg Biryani) बनवतानाही चुकूनही इतर कोणताही तांदूळ निवडू नका. बासमती तांदळाची बिर्याणीच अधिक चांगली आणि स्वादिष्ट बनते.
जुन्या बासमती तांदळाची करा निवड
बिर्याणी अधिक चांगली आणि स्वादिष्ट बनवायची असेल तर तुम्ही जुन्या बासमती तांदळाची निवड करावी. पण हा तांदूळ जुना आहे की नाही हे कसं कळेल. तर जो तांदूळ हलकासा पिवळसर दिसेल तो तांदूळ जुना बासमती तांदूळ आहे हे तुम्ही लक्षात घ्या. दुसरी पद्धत म्हणजे 2-3 तांदूळ घेऊन तुम्ही चावा. हे जर दाताला चिकटले तर ते नवे बासमती तांदूळ आहे असं समजा आणि दाताला न चिकटल्यास, हे जुने बासमती तांदूळ आहे हे निश्चित होते. तुम्ही तांदळाची निवड करून मगच बिर्याणीसाठी वापरा.
या तंत्राचा वापर करून तुम्ही बिर्याणीसाठी तांदूळ निवडा आणि त्यानंतर सुगंधी आणि चविष्ट बिर्याणी आपल्या घरात तुम्ही बनवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक