सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. अनेक ठिकाणी लगीनघाई सुरु आहे. लग्नासाठी काही खास खरेदीचा विचार करत असाल तर त्यामध्ये ज्वेलरी ही आलीच. लग्नासाठी तुम्हाला ब्रायडल ज्वेलरी निवडणे महत्वाचे असते. लग्नासाठी ज्वेलरी निवडायची तर ती खास असायला हवी. तुमचेही लग्न ठरले असेल आणि सोन्याची ज्वेलरी घेण्यापेक्षा तुम्ही इमिटेशन ब्राईडल ज्वेलरी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ब्राईडल ज्वेलरीची निवड करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
लग्नासाठी हारांचे सुंदर डिझाईन्स (Varmala Designs In Marathi)
हेवी चोकर सेट
नवरी म्हटली की तिच्या गळ्यात हेवी चोकर सेट असायलाच हवा. कारण असे हेवी चोकर दिसायला खूपच सुंदर दिसतात. हेवी चोकर सेट वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. स्टोनस्टडेट, कुंदन आणि अन्य वेगळ्या प्रकारात हेवी चोकर सेट मिळतात. साडी असो वा लेहंगा किंवा एखादा वेस्टर्न वेडिंग आऊट फिट असला तरी देखील तुम्हाला हेवी चोकर सेट घालता येतात. चोकर सेट हे वेगवेगळ्या रेट्समध्ये मिळतात. तुम्हाला अगदी 2 हजार रुपयांपासून असे वेगवेगळे चोकरसेट मिळतात. ते तुम्ही निवडले तर अगदी साध्या साडीचा लुकही एकदम चांगला उठून दिसतो.
टेंपल ज्वेलरी
सध्या टेंपल ज्वेलरी हा खूप चांगला चालणारा ट्रेंड आहे. जर तुम्हाला टेंपल ज्वेलरी आवडत असतील. तुमचा लुक थोडा ट्रेडिशनल असेल तर तुम्ही टेंपल ज्वेलरीची निवड करायला हवी. टेंपल ज्वेलरी या दिसायला एकदम क्लासी आणि चांगल्या दिसतात. हल्ली टेंपल ज्वेलरीचा एक सेटच येतो. यामध्ये तुम्हाला अगदी चोकरसेट पासून ते लाँग नेकलेस मिळतात. इतकेच नाही तर तुम्हाला त्यामध्ये कंबरपट्टा आणि मांग टिका मिळतो. जो तुम्हाला अधिक चांगला दिसतो. सध्या ब्राईडल ट्रेंडमध्ये हा एक चांगला ट्रेंड आहे जो तुम्ही नक्की फॉलो करायला हवा.
कुंदन ज्वेलरी
कुंदन ज्वेलरी या कायम एव्हरग्रीन आहेत. या ज्वेलरी कधीही जुन्या होत नाहीत. तुम्हाला कधीही या ज्वेलरी घालता येतात. कुंदन ज्वेलरी तुम्हाला घ्यायच्या असतील तर अगदी बिनधास्त घ्या. या ज्वेलरी तुम्हाला कुठेही मिळतात. हल्ली त्याचे वेगवेगळ्या लेंथचे हेवी पीसेस मिळतात. त्यामध्ये असलेले रंगसंगती आणि पॅटर्न इतके सुंदर असतात की तुम्ही ते हमखास निवडायला हवेत. कुंदन ज्वेलरी निवडताना तुम्हाला नेमकी काय रंगसंगती करायची हे माहीत असायला हवेत. कारण हे सेट्स खूप महागात मिळतात. त्यामुळे विचार करुन यांची निवड करावी.
क्रिस्टल ज्वेलरी
क्रिस्टल ज्वेलरी या तुम्ही अगदी हमखास निवडायला हव्यात. क्रिस्टल ज्वेलरी या खूप महाग असतात. पण त्या दिसायला खूपच सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्हाला जर हा पर्याय निवडायचा असेल तर तो तुम्ही अगदी योग्य असा निवडायला हवा. या ज्वेलरी टिकवण्यासाठी तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. पण ब्राईडल अशा स्टोनची ज्वेलरी निवडताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते. जर त्यामध्ये तुम्हाला काही हेवी सेट्स मिळत नसतील तर तुम्ही हा पर्याय टाळलेला बरा!
आता तुम्हाला ब्राईडल ज्वेलरी निवडायची असेल तर तुम्ही नक्कीच या काही ज्वेलरीची निवड नक्की करा.