एखादा टाईट फिटिंगचा ड्रेस असेल किंवा मोठ्या गळ्याचा ड्रेस असेल अशा ड्रेसच्या आतमध्ये ब्रा घालायला नकोसे होते. कारण अशा ड्रेसमध्ये ब्रा अजिबात चांगल्या दिसत नाही. कारण त्यामधून ब्रा चे पट्टे दिसण्याची शक्यता जास्त असते. रेडिमेड ड्रेस किंवा फॅन्सी ब्लाऊज घ्यायचा असेल किंवा शिवून घ्यायचा असेल तर अशा ड्रेसमध्ये कप्स लावले जातात. कप्सचे ड्रेस खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कप्स फिटिंगचे ड्रेस निवडताना तुम्ही नेमकी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया. म्हणजे कप्स ड्रेसची खरेदी करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत.
कप्सची साईज

कोणताही रेडिमेड ड्रेस किंवा साडी घेताना त्यातील कप्स हे तुमच्या साईजचे असतातच असे सांगता येत नाही. बरेचदा एक कॉमन साईज असलेले असे हे कप्स असतात. त्यामुळे असे कप्स आपल्याला फिट होतील असे सांगता येत नाही. कोणताही ड्रेस फायनल केल्यानंतर त्याची फिटिंग करायला देताना ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपली कप्ससाईज कोणती आहे त्यानुसार तुम्हाला त्या कप्स साईजमध्ये बदल करायला द्यायचा आहे. प्रत्येक ड्रेसवाले तुमच्या कप्ससाईजनुसार याची फिटिंग करतात. त्यानंतरच हे ड्रेस परफेक्ट फिट होतात. त्यामुळे तुम्ही कप्ससाईजची खात्री करुन घ्या.
लग्नात हेव्ही वर्क केलेला लेहंगा वापरणार तर असा ड्रेप करा दुपट्टा
कप्सची फिटिंग
कप्स साईज काय हे प्रत्येकीला माहीत असायला हवे. जर माहीत नसेल तर तुमची ब्रा ची साईज काय आहे ते अचूक माहीत असायला हवे. तुमच्या ब्राची साईज ही तुमची कपसाईज असते. त्यामुळे कप्सची साईज योग्य जाणून घ्या. कधी कधी ड्रेस किंवा ब्लाऊज अल्टर करताना कप्स हे खाली वर होण्याची शक्यता असते. म्हणजे खांद्याकडून फिटिंग केल्यानंतर चेस्टचा भाग हलतो. त्यामुळे कप्स हे वर येतात. आता शरीराच्या ठेवणीनुसार कप्स हे वर गेले तर ते चांगले दिसत नाही. त्यामुळे तुमच्या शरीराचा आकार सुद्धा खराब दिसतो. त्यामुळे कप्सची फिटिंग तुमच्या चेस्टला परफेक्ट आली आहे की नाही ते देखील बघून घ्या. तसे नसेल तर ते कप्स काढून पुन्हा योग्य जागी स्टीच करायला लावा.
कप्सची सेटिंग

खूप वेळा कप्स जुने झाले असतील तर त्याचा आकार बदलतो. खूप ड्रेसमध्ये लोबजेट कप्स असतात. त्याचा आकार हा आकर्षक वाटत नाही. असे कप्स उशी घातल्यासाखे वाटतात. असे कप्स जर चुरगळे असतील तर त्याचा आकार हा लाईट ड्रेसमध्ये अधिक उठून दिसतो.जर तुम्ही घेतलेल्या कपड्यांमध्ये अशाप्रकारचे कप्स असतील तर ते काढून टाका. त्याऐवजी तुम्ही नवीन कप्स लावून घ्या ते जास्त चांगले
लग्नासाठी 5 बेस्ट वेडिंग ड्रेस पॅटर्न
कप्स असलेले कोणतेही कपडे घालताना
- वर दिलेल्या टिप्स व्यतिरिक्तही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. ज्यांची बस्ट साईज म्हणजेत छातीचा आकार जास्त मोठा असेल अशांनी खूप मोठ्या बस्ट साईजचे कप्स निवडू नयेत ते फारच वाईट दिसतात.
- कप्स असलेल्या कपड्यांमधून कप्स काढून टाकण्याचा विचार असेल तर अशा कपड्यांमध्ये योग्य ब्राचा प्रकार निवडा.
आता कप्स फिटिंगचे ड्रेस निवडताना या गोष्टींची काळजी अगदी हमखास घ्या
साऊथ इंडियन साड्यांचे प्रकार जे लग्नासाठी आहेत परफेक्ट