महिलांसाठी आवश्यक असलेली एकमेव वस्तू म्हणजे ‘सॅनिटरी पॅड’. प्रत्येक महिन्याला लागणारी ही वस्तू शरीराशी संबधित असल्यामुळे ती चांगली असायला हवी. सॅनिटरी पॅडच्या बाबतीत जर तुम्ही हयगय करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. कारण पिरेड्सच्या दरम्यान लागणारी ही वस्तू घेताना अधिक काळजी घेणे फारच गरजेचे असते. सॅनिटरी पॅडच्या निवडीबाबत तुम्ही कायम अधिक सजग राहायला हवे. सॅनिटरी पॅडची निवड नेमकी कशी करावी हे कळत नसेल तर या मापदंडानुसार ठरवा तुमच्यासाठी बेस्ट सॅनिटरी पॅड नेमके कोणते?
उन्हाळ्यात तुम्हालाही नकोसे होतात पिरेड्स, मग वाचाच
पातळ आणि कॉटनचे सॅनिटरी पॅड
सॅनिटरी पॅडमध्ये आता बरीच क्रांती झाली आहे. वेगवेगळ्या फायद्यांनी युक्त असे सॅनिटरी पॅड हल्ली सगळीकडे मिळतात. सॅनिटरी पॅड गुप्तांगाशी निगडीत असल्यामुळे आणि ती जागा सतत बंद असल्यामुळे सॅनिटरी पॅड हे उत्तम दर्जाच्या कॉटनचे हवे. सॅनिटरी पॅड हे कॉटनचे असेल तर ते जास्त काळासाठी टिकते आणि जरी ते जास्त काळासाठी टिकले तरी देखील त्याचे रॅशेश येत नाही. सॅनिटरी पॅड निवडताना ते पातळ असेल तर जास्त काळासाठी पँटीवर टिकून राहते. जाड सॅनिटरी पॅड त्याच्या कडा लवकर सोडते. जर तुमचा फ्लो जास्त असेल तर तुम्ही जाड सॅनिटरी पॅड मुळीच निवडू नका. कारण त्याचा काहीच मिनिटांमध्ये आकार वाढतो. पायांच्या मध्ये ते जड वाटू लागतात.
लांब सॅनिटरी पॅड उत्तम
सॅनिटरी पॅडमध्ये वेगवेगळ्या साईज असतात. शरीराच्या आकारानुसार हे सॅनिटरी पॅड निवडायचे असले तरी देखील XL किंवा XXL ही साईज अगदी कोणत्याही वयोगटातील आणि कोणत्याही आकारमान असलेल्यांसाठी योग्य असते. सॅनिटरी पॅड लांब असेल तर तुम्हाला अगदी कसेही बसता येते. बसताना डाग लागण्याची शक्यता ही फारच कमी असते. त्यामुळे नेहमी लांब आकाराचे सॅनिटरी पॅड निवडा. त्यामुळे तुमच्या पँटीच्या कडा किंवा पँटी खराब होणार नाही. शिवाय तुम्हाला उठता-बसता काही अडचणीही येणार नाहीत.
सॅनिटरी पॅडच्या कडा मांड्याना लागतात.. मग करा या सोप्या आयडिया
सेंटेड पॅड फायद्याचे
हल्ली सॅनिटरी पॅडला एक मंद सुगंध असतो. यामुळे पिरेड्सच्या रक्ताचा फारसा दुर्गंध येत नाही. हल्ली सगळ्याच ब्रँडच्या सॅनिटरी पॅडमध्ये असा मंद सुगंध असतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार असे सेंटेंड सॅनिटरी पॅड निवडा. त्यामुळे थोड्या जास्त काळासाठी सॅनिटरी पॅड वापरु शकता. त्यामुळे असेच सॅनिटरी पॅड निवडा ज्याला असा मंद सुगंध असतो.
चांगल्या प्रतीचे सॅनिटरी पॅड
सॅनिटरी पॅडसारखी गोष्ट तुम्ही केवळ पैशांचा विचार करुन घेऊ नका. कारण ही वस्तू तुमच्या शरीराशी इतकी निगडीत असते की, त्याची निवड करताना पैशांचा विचार करण्यापेक्षा ते चांगल्या प्रतीचे असू द्या. सॅनिटरी पॅड कोणत्याही ब्रँडचे घेण्यापेक्षा चांगल्या ब्रँडचे निवडा. जर तुम्ही एखादा ब्रँड वापरत असाल तर शक्यतो तोच वापरा. कारण अचानक नवे सॅनिटरी पॅड वापरले की, त्यामध्ये वावरायला थोडासा वेळ जातो. त्यामुळे चांगल्या प्रतीचे आणि उत्तम ब्रँडचे सॅनिटरी पॅड निवडा.
एक्सपायरीही महत्वाची
सॅनिटरी पॅडची ही एक्सपायरी असते. ते कधीही वापरुन चालत नाही. कधी कधी स्वस्त विकणारे सॅनिटरी पॅड किंवा ऑफरमध्येअ असलेले सॅनिटरी पॅड हे जुने झालेले असतात. अशा सॅनिटरी पॅडचा गोंद हा गेलेला असतो. असे पॅड पँटीला चिकटत नाही. त्यामुळे कोणतेही सॅनिटरी पॅड घेताना त्याची एक्सपायरीही नीट बघा. म्हणजे तुम्हाला ते सॅनिटरी पॅड किती जुने आहे ते लक्षात येईल. त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा ते देखील कळेल.
आता नवे सॅनिटरी पॅड घेताना या गोष्टींचा नक्की विचार करा.