लॉकडाऊन आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे खूप जणांचे बाहेर जाण्याचे प्लॅन सुरु झाले आहेत. प्रवासासाठी बाहेर जायचं म्हणजे बॅग या आल्याच. प्रवास म्हणजे बॅग हे असे असले तरीदेखील बॅगांची निवड ही प्रत्येकसाठी खूप महत्वाचे असते. प्रवासासाठी नेमकी कोणती बॅग तुम्ही निवडायला हवी. जेणेकरुन तुमच्याकडे बॅगांचे ओझे होणार नाही. तर त्यामध्ये सामान नीट राहण्यास मदत होईल. चला प्रवासासाठी निवडूयात सोप्या आणि सुटसुटीत बॅगा. एकट्या महिलांना फिरण्यासाठी ठिकाणे जाणून घेतली तर तुम्हाला या बॅग्स घेऊन प्रवास करता येईल
डफल बॅग्स
खूप जणांना खांद्यावर असणाऱ्या बॅगा खूप आवडतात. डफल बॅगा या गोलाकार आकाराच्या असतात. त्याचे तोंड म्हणजेच उघडण्याचा भाग हा थोडा निमुळता असतो. हल्ली या बॅगांमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. म्हणजेच या बॅगांना ट्रॉलीदेखील लावली जाते. खूप लांबचा प्रवास असेल तर यामधील ट्रॉली असलेला प्रकार तुम्ही निवडलात तर सगळ्यात उत्तम कारण अशा बॅगा तुम्हाला पटकन ओढता येतात. पण अशा बॅगा खूप लांब म्हणजे परदेशात नेता येत नाहीत. शिवाय अशा बॅंगाचे वजन विनाकारण खूप लागते. जर तुम्हाला सगळ्या वस्तू नीट आणि पटपट हव्या असतील तर तुमच्यासाठी या बॅग्स अजिबात चांगल्या नाहीत. कारण या बॅगा जास्त वेळासाठी ओढता येत नाहीत. त्यांच्यामध्ये मोठे सामान राहणे कठीण जाते.
जाणून घ्या का असायला हवे तुमच्या बॅगमध्ये पाऊच
ट्रॉली बॅग्ज
बाहेर जायचे असेल तर प्रत्येकाकडे वेगवेगळ्या साईजमध्ये ट्रॉली बॅग्ज मिळतात. अशा बॅग्ज तुम्हाला कुठेही आणि कधीही नेता येतात. या बॅगांमध्ये सर्वसाधारणपणे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक कपड्यांची आणि दुसरी टफ प्लास्टिकची या दोघांपैकी कोणत्या बॅगेची निवड तुम्ही करायला हवी ते जाणून घेऊया
कपड्याची बॅग
खूप जणांना कपड्याची बॅग आवडते याचे कारण असे की या बॅग्स वापरताना त्या तुटण्याची शक्यता कमी असते असे अनेकांना वाटते. या बॅगांवर दाब पडला तरी त्या बॅगा तडकणार नाही याची खात्रीच असल्यामुळे खूप जण या बॅगांना पसंती देतात. या बॅगेबद्दल सांगायचे झाले तर तुम्ही अगदी हमखास या बॅगेची निवड लांबच्या किंवा कोणत्याही प्रवासाला करायला हवी. कारण अशा बॅगांमध्ये सामान अगदी नीट राहते. तुमच्या बॅगेच्या आकारानुसार तुम्हाला त्यामध्ये हवे तसे सामान ठेवता येते. शिवाय कपड्याच्या बॅगांना मिळणारे अधिकचे कप्पे खूपच जास्त कामी येतात.
प्लास्टिकची टफ बॅग
हल्ली स्टाईलमध्ये असलेल्या या बॅग्स सगळीकडे दिसतात. अशा बँगाच्या प्रेमात पडायचे नाही असे अजिबात होणार नाही. या बॅग्स दिसायला सुंदर असल्या तरी त्यामध्ये खूप सामान राहात नाही. त्यामुळे अशा बॅग्स घेताना सामान किती याचा अंदाज घ्या. त्यानंतर याची निवड करा. कारण यामध्ये आतला एखादा कप्पा वगळता कोणताही जास्तीचा कप्पा मिळत नाही. त्यामुळे यामध्ये काहीही जास्तीचे सामान राहात नाही. अनेकदा एअरपोर्टवर बॅगा एकमेकांवर आपटल्या जातात. अशावेळी या बॅगा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कुठे जाणार आणि सामान काय आहे याचा विचार करुन मगच तुम्ही ही बॅग निवडा.
काय आहे वॅक्सिन पासपोर्ट, कसा करावा उपयोग जाणून घ्या माहिती
पाठीवरील सॅक
या रोजच्या सॅक नाही जी लोक बॅक पॅकिंग प्रवास करतात. अशांकडे या बॅगा असतात. या बॅगा लांब आणि मोठ्या असतात. या बॅगमध्ये चांगलेच सामान राहते. पण या बॅगा सगळं नीटनेटके सामाना ठेवणाऱ्यांसाठी चांगले नाही. याचे कारण असे की, या बॅगमध्ये खूप पाऊच असले तरी त्यामध्ये सामान शोधताना दमछाक होते. त्यामुळे पाठीवरील ही सॅक ट्रेकिंग किंवा अशा पिकनिकला न्या. जिकडे तुम्हाला इस्त्रीचे कपडे नकोत
आता बॅग निवडताना या गोष्टींची काळजी घ्या. या शिवाय प्रवासाला जाताना प्रवास भन्नाट करणारे कोट्स पाठवायला विसरु नका
कँपिंगला जाण्याचा प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा या गोष्टी