लग्नसराईच्या दिवसांना सुरूवात झाली आहे. पण लग्नाच्या सिझनमध्ये फक्त चांगलं दिसणं आणि लोकांना भेटणं इतकंच महत्त्वाचं नाही. तुम्ही जिथे जाता तिथे लोकांनी तुमच्यासाठी खास मेन्यूही ठेवलेला असतो. त्यामुळे चवीच्या चक्रव्यूहात अडकल्याने नेहमीपेक्षा जरा जास्तच खाल्लं जातं. परिणामी शरीरामध्ये जमा होऊ लागतात एक्स्ट्रा कॅलरीज आणि एकदा वजन वाढलं की, ते कमी करणं खूपच कठीण असतं. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही सोपे उपाय. ज्यांच्या मदतीने तुम्हाला कॅलरीजवर कंट्रोल करणं सोपं होईल.
चालता चालता एक्स्ट्रा कॅलरीजला करा बाय
तुम्ही जेव्हा लग्नाला जाता तेव्हा तिथल्या मेन्यूमधील तेल आणि मसाले तुम्ही कमी करू शकत नाही आणि आवडत्या मिठाई खाण्यावरही कंट्रोल करू शकत नाही. भरपेट जेवण तर आपण रोजच करतो. या सगळ्या कॅलरीज बर्न करण्याचा सोपा उपाय म्हणजे चालणे. जेवणानंतर 15-20 मिनिटं तुम्ही वॉक घेतल्यास कॅलरीज बर्न होतील. जेवणानंतर पाय मोकळे करायला तुम्ही घरच्यांसोबत किंवा मित्रमेैत्रिणींसोबत नक्कीच उतरू शकता. वॉक केल्याने जेवण पचायला सोपं जातं. लक्षात घ्या हा वॉक आरामात करा. वेगाने चालणं टाळा. कॅलरीज नक्कीच बर्न होतील.
इनडोअर एक्सरसाइजेसवर ठेवा विश्वास
आता लग्नाला किंवा एखाद्या फंक्शनला गेल्यावर साहजिक आहे की, तुमचं नेहमीच शेड्यूल बिघडतं. मग त्याची भरपाई करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी करू शकता खास इनडोअर एक्सरसाईज. सकाळी, दुपारी किंवा रात्री तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे वेळ ठरवा आणि हा इनडोअर व्यायाम करा. लक्षात ठेवा की, या व्यायामाच्या आणि जेवणाच्यामध्ये किमान एक तासाचा ब्रेक असावा. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका. इनडोअर व्यायामात तुम्ही जम्पिंग जॅक, पुश अप्स, प्लँक, सिट अप्स आणि स्क्वाट्सही करू शकता. पण आठवणीने ठरवलेल्या वेळी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा हळूहळू स्टॅमिनाही वाढेल. यासोबतच तुम्ही लिफ्टऐवजी पायऱ्यांनी चढा, सायकलिंग करा किंवा वॉकसारख्या एक्टीव्हिटीजही करू शकता.
गोड खाण्यावर नियंत्रण
लग्न आणि सणावाराला आवर्जून गोड खाल्लं जातं. जे टाळणंही अशक्य असतं. पण यातही तुम्ही पर्यायाने कमी गोड मिठाई किंवा तूपाऐवजी प्रोटीन लाडू निवडू शकता. यामुळे कॅलरीजही कमी होतील आणि प्रोटीनही मिळेल. तुम्ही दुसऱ्यांना गिफ्ट देतानाही प्रोटीन चॉकलेट आणि कुकीज गिफ्ट करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
भरपूर पाणी पिणं कधीही चांगलंच
आपल्या शरीरात सर्वात अधिक प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे त्याचं प्रमाण संतुलित ठेवणं आवश्यक आहे. आपली पाणी पिण्याची पद्धत आपल्या वजन नियंत्रित ठेवते. बरेचदा लोक जेवल्यानंतर भरपूर पाणी पितात. यामुळे जठराग्नी शांत होतो. त्यामुळे जेवण नीट पचत नाही. जेवणाआधी किमान 30 मिनिटं पाणी प्यावं किंवा जेवणानंतर 30-45 मिनिटांनी प्यावं. यामुळे जेवण नीट पचतं. तसंच शरीराला पोषक तत्वांचं शोषण करण्यासही आवश्यक वेळ मिळतो. एक्सरसाइज आधी आणि नंतर थोडंथोडं पाणी प्यावं. यामुळे शरीर हायड्रेट राहतं.
कॅलरी काऊंट
कॅलरी काऊंट करून जेवणं हे खूपच किचकट काम आहे. तरीही कॅलरीजवर नजर ठेवणं आवश्यकच आहे. यासाठी तुम्ही कोणतंही फिटनेस अॅप डाऊनलोड करू शकता. ज्यामध्ये तुमच्या बॉडी टाईपसोबतच उंची, वय यानुसार तुम्हाला कॅलरीजचं प्रमाण सांगितलं जातं. यामध्ये तुम्हाला पाणी पिण्याचं प्रमाण आणि एक्सरसाईजबाबतही सांगितलं जातं.
तर वरील सोप्या उपायांनी तुम्ही लग्नसराईच्या दिवसातही स्वतःला फिट ठेऊ शकता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूटही देत आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.