ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
how to steam face at home without steamer

स्टीमर शिवाय चेहऱ्यावर अशी घ्या वाफ, करा सोपे उपाय

वातावरणाशी सतत संपर्क आल्यामुळे चेहऱ्यावर धुळ, माती, प्रदूषण जमा होतं. मेकअप सावधपणे न काढल्यास मेकअपचे कण त्वचेवर चिकटून बसतात. ज्यामुळे भविष्यात त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी नियमित फेशिअल करणं गरजेचं आहे. फेशिअलमधील एक महत्त्वाची स्टेप म्हणजे स्टीमिंग थोडक्यात चेहऱ्यावर वाफ घेणे. वाफ घेण्यामुळे त्वचा स्वच्छ होतेच शिवाय त्वचेवरील काळे डाग, चट्टे देखील कमी होतात. सर्दी, खोकल्यासारखे इनफेक्शन झाल्यास चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे आराम मिळतो. यासाठी आजकाल प्रत्येकाच्या घरी स्टीमर असतं. पण जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर काळजी करू नका कारण स्टीमरशिवायही तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेऊ शकता. त्यासोबतच जाणून घ्या कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi)

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे –

चेहऱ्यावर वाफ घेण्यामुळे तुमच्या त्वचेला चांगला आराम मिळतो. वाफेमुळे चेहऱ्यावरील पोअर्स उघडतात आणि त्यात अडकलेली धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण बाहेर टाकले जातात. त्वचेला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. फेशिअल करताना त्वचा मुळापासून स्वच्छ करण्यासाठी स्टीम घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. मात्र फेशिअल व्यतिरिक्तही तुम्ही त्वचेवर नियमित वाफ घेऊ शकता. सर्दी, खोकल्यापासून दूर राहण्याचा, त्वचा फ्रेश आणि हायड्रेट ठेवण्याचा हा सोपा आणि बिनखर्चिक मार्ग आहे. आणखी वाचा काही चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे (Vaf Ghenyache Fayde In Marathi)

घरी स्टीमरशिवाय चेहऱ्यावर  वाफ कशी घ्यावी –

दर महिन्याला फेशिअल करताना काही मिनीटे चेहऱ्यावर वाफ घेणं खूप गरजेचं आहे.

भांड्यात पाणी गरम करा –

चेहऱ्यावर वाफ घेण्याचा हा जुना आणि सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्ही एखाद्या उथळ भांड्यात पाणी उकळू शकता. उकळलेलं पाण्याखाली गॅस बंद करा आणि त्या भांड्यातून येणारी वाफ चेहऱ्यावर घ्या. वाफ घेताना भांडे लवकर थंड होऊ नये शिवाय वाफ भांड्यातून निघून जाऊ नये यासाठी चेहऱ्याच्या मागील भाग जाड टॉवेलने कव्हर करा. हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

ADVERTISEMENT

हॉट टॉवेल –

स्टीमरने चेहऱ्यावर वाफ घेणं सोपं जरी असलं तरी तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही टॉवेलचा वापर स्टीमसाठी करू शकता. यासाठी गरम पाण्यात एखादा छोटा टर्कीशचा टॉवेल बूडवा आणि घट्ट पिळून घ्या. पिळल्यानंतर टॉवेलमध्ये गरम वाफ साठून राहते या टॉवेलने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर शेक घेऊ शकता. चेहऱ्यावर टॉवेल गुंडाळा ज्यामुळे चेहऱ्याला वाफ मिळेल. टॉवेल थंड झाल्यावर तो पुन्हा गरम पाण्यातून पिळून घ्या आणि चेहऱ्यावर वाफ द्या.  दोन ते तीन वेळा असं करून तुम्ही चेहऱ्यावर वाफ देऊ शकता.

हॉट बाथ –

चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेण्याचा अथवा संपूर्ण अंग शेकवण्याचा सोपा मार्ग म्हणज गरम पाण्याने अंघोळ करणे. हॉट वॉटर शॉवरने तुम्ही तुमचा चेहरा, मान आणि शरीर शेकवू शकता. बाथरूममध्ये हवा जास्त खेळती नसल्यामुळे अंघोळ करताना तुमच्या चेहऱ्यावर चांगली वाफ लागते. ज्यामुळे स्टीमिंगचे फायदे तुमच्या त्वचेला मिळतात. 

22 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT