पदार्थावर बनवून झाला की, त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरली जाते. अगदी कमीत कमी लागणाऱ्या कोथिंबीरीच्या काही काड्यांसाठी कधी कधी सोन्याचा भाव मोजावा लागतो. कोथिंबीर अगदी कमी लागत असली तरी त्याच्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे कधीच वाटत नाही. कोथिंबीर घरी आणल्यानंतर ती जर जास्त काळासाठी टिकवून ठेवायची असेल तर काही ट्रिक्स नक्कीच करता येतात. कोथिंबीर टिकवून ठेवण्यासाठी एक ट्रिक आम्ही घरी करुन पाहिली आणि कोथिंबीर जास्त काळासाठी टिकवता आली. कोथिंबीर टिकवण्यासाठी ही पद्धत आहे फारच सोपी. चला जाणून घेऊया ही सोपी पद्धत
सुक्या जवळ्यापासून बनवा या मस्त रेसिपी (Jawala Recipes In Marathi)
अथी टिकवता येईल कोथिंबीर
कोथिंबीर टिकवण्याचा विचार केला असेल तर तुम्हाला यासाठी थोडा जास्तीचा वेळ देता यायला हवा. दीर्घ काळासाठी कोथिंबीर टिकवायची ही आहे योग्य पद्धत
- कोथिंबीरीची मोठी गड्डी घेऊन या. कोथिंबीर आणतानाच त्याला माती कमीत कमी चिकटलेली असेल असे बघा. म्हणजे तुम्हाला कोथिंबीर स्वच्छ करताना फार त्रास होणार नाही. कोथिंबीरीची मूळ काढून फक्त पानांचा भाग घेता येईल अशी कोथिंबीर निवडा.
- कोथिंबीर आणून ती स्वच्छ करुन घ्या. जर कोथिंंबीर खूप ओली झाली असेल आणि खूप भिजलेली असेल तर ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यातील पाणी चांगले टिपून घ्या.
- पाणी टिपून झाले की, कोथिंबीर चांगली स्वच्छ करुन त्याचे तुरे काढून घ्या. कोथिंबीरचा जेवढा भाग तुम्ही वापरणार असाल तितकाच भाग काढून घ्या.
- आता एक ओढणी घेऊन कोथिंबीर ओढणीवर पसरवून घ्या.
- कोथिंबीर उन्हात चांगली वाळवून घ्या. चांगली दोन -चार उन्ह लागली की, कोथिंबीर चांगली कोरडी होते.
- जर तुम्हाला कसुरी मेथी माहीत असेल तर तुम्हाला कोथिंबीरही तितकीच सुकवायची आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोथिंबीर अगदी कुरकुरीत होईपर्यंत तुम्हाला छान वाळवायची आहे.
- कोथिंबीर छान कुरकुरीत वाळली असेल तर ती जास्त काळात टिकू शकते. ही कुरकुरी कोथिंबीर तुम्हाला अगदी कधीही आणि सहज वापरता येते. एखाद्या चटणीसाठी किंवा पराठ्यासाठी तुम्ही ही वाळवलेली कोथिंबीर अगदी सहज वापरु शकता.
- एखाद्या एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्ही ही कोथिंबीर अगदी सहज ठेवू शकता. ज्यावेळी तुमच्याकडे कोथिंबीर नसेल अशावेळी तुम्ही कोथिंबीर चुरुन त्यात घालू शकता.
पिकनिकसाठी भन्नाट स्नॅक्स आयडियाज, प्रवास होईल मस्त
बनवू शकता रेसिपी
अशी वाळत ठेवलेली कोथिंबीर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज करता येऊ शकतात. ज्यावेळी कोथिंबीर महाग असेल अशावेळी तुम्ही अशा कोथिंबीरचा उपयोग करुन कोथिंबीर पराठा, कोथिंबीर वडी किंवा सजावटीसाठी कोथिंबीरचा वापर करु शकता.
अशा प्रकारे कोथिंबीर टिकवाही आणि त्यापासून मस्त वेगवेगळ्या रेसिपीज करायलाही विसरु नका.
2020 मध्ये हिट झाल्या या लॉकडाऊन रेसिपी, तुम्ही करुन पाहिल्यात की नाही?