प्रत्येकाच्या घरी जेवणासाठी आलं- लसूण पेस्ट अगदी हमखास वापरली जाते. जेवण करायला घेतल्यानंतर आयत्यावेळी आलं- लसूण सोलून त्याची पेस्ट करणे अनेकांना कंटाळवाणे वाटते. लसूणं सोलणं एक टास्क असून त्यामुळे तुमच्या वेळेचे गणित नक्कीच बदलू शकते. हे गणित बिघडू नये म्हणून अनेक जणं ही पेस्ट आधीच घरी बनवून ठेवतात. आलं- लसूणचे योग्य प्रमाण घेऊन ही पेस्ट तयार करता येते. पण हीच पेस्ट महिनाभर टिकवायची झाली तर तुम्ही काही गोष्टींची काळजीही घ्यायला हवी. महिनाभर टिकणारी ही आलं-लसूण पेस्ट कशी तयार करायची ते जाणून घेऊया.
सुकलेलं लसूण फेकण्याआधी हे वाचा.. तुम्हालाही बसेल धक्का
मीठ आणि तेलाची आलं- लसूण पेस्ट
आलं- लसूण पेस्ट करण्याची पहिली पद्धत आहे फारच सोपी. इतर कोणत्याही आलं- लसूण पेस्ट प्रमाणेच ती तुम्हाला वाटेल. पण कमी कष्टात होणारी आणि योग्य पद्धतीने ठेवली तर ती महिन्याहून अधिक काळासाठी टिकू शकते
साहित्य:
1 कप आलं, 1 कप लसूण, एक मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा मीठ
कृती:
- आलं आणि लसूण स्वच्छ करुन घ्या. आल्याच्या वरच्या साली काढून टाका. लसूण सोलून घ्या.
- एका मिक्सरच्या भांड्यात आलं-लसूण घेऊन ते पाण्याशिवाय वाटून घ्या. चांगली बारीक पेस्ट होईपर्यंत वाटा.
- मिक्सरचे भांडे उघडून त्यामध्ये एक चमचा मीठ आणि तेल घाला. ही पेस्ट एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा. मीठामुळे आलं- लसूण पेस्टचा बर्फ होत नाही. तर तेल ही पेस्ट टिकवून ठेवायला मदत करते.
- ज्यावेळी तुम्हाला ही पेस्ट हवी असेल त्यावेळी फ्रिजमधून काढून त्याचा वापर करा आणि परत फ्रिजमध्ये ठेवा.
सोललेला लसूण फ्रेश राहण्यासाठी असा ठेवा साठवून
व्हिनेगर आलं-लसूण पेस्ट
बाजारात मिळणारी आलं- लसूण पेस्ट फोडणीत घातली की, त्याला एक वेगळाच चायनीजचा वास आल्यासारखे वाटते. हा वास चायनीजच्या फोडणीचा नसून तो वास व्हिनेगरचा असतो. ही अशी चटपटीत व्हिनेगर आलं-लसूण असलेली पेस्ट कशी बनवायची ते जाणून घेऊया.
साहित्य:
1कप आलं, 1 कप लसणीच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा व्हिनेगर आणि मीठ
कृती :
- आलं-लसूण स्वच्छ करुन घ्या. आल्याची सालं काढून घ्या. लसणीच्या पाकळ्या काढून घ्या.
- एका मिक्सरच्या भांड्यात आलं-लसूण- व्हिनेगर घालून पाणी न घालता आलं-लसूण पेस्ट वापरुन घ्या.
- पेस्ट काढून त्यामध्ये एक चमचा मीठ घालून एका कंटेनरमध्ये काढून ठेवा. ही पेस्ट चांगली 2-4 महिने टिकते.
अशा पद्धतीने तुम्ही आलं-लसूण पेस्ट केली तर ही आलं-लसूण पेस्ट चांगली टिकून राहील. फक्त आलं-लसूण निवडताना तुम्ही लसणीच्या पाकळ्या मोठया आणि ताजं आलं निवडा.ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.