तुमच्या घरात तुम्ही औषधे कुठे ठेवता? काही जण औषधे स्वयंपाकघरातील एखाद्या कपाटात ठेवतात तर काही लोक त्यांच्या बाथरूम कॅबिनेटमध्ये औषधे ठेवतात. ज्यांच्या घरी लहान मुले आहेत ते लोक लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी औषधे ठेवतात तर काही लोक सरसकट सगळी औषधे फ्रिज मध्ये ठेवतात. पण जर फार उष्ण किंवा फार थंड ठिकाणी तुम्ही औषधे ठेवत असला तर तसे करू नका कारण असे केल्याने बरीचशी औषधे निकामी होऊ शकतात. उष्ण आणि दमट ठिकाणी औषधे साठवल्याने औषधे कमी परिणामकारक होऊ शकतात. औषधे ही रसायनेच असतात ज्यांच्या रासायनिक रचनेत कोणताही बदल टाळण्यासाठी त्यांना थेट उष्णता, सूर्यप्रकाश किंवा आर्द्रता यापासून दूर ठेवावे लागते. त्यामुळे औषधांचा साठा करताना त्यांच्या औषध मूल्यात कोणताही बदल होणार नाही याकडे बारकाईने लक्ष द्या. औषधे योग्य प्रकारे सुरक्षित कशी ठेवायची जेणेकरून त्यांच्या संरचनेत बदल होणार नाही हे जाणून घेण्यासाठी वाचा.
या ठिकाणी ठेवा औषधे
बहुतेक औषधे रूम टेम्परेचरवर थेट सूर्यप्रकाशापासून दूर, थंड आणि कोरड्या जागी ठेवावीत. प्रत्येक औषध हे फ्रिजमध्ये साठवण्याची गरज नसते. तसेच कोणतीही हानी टाळण्यासाठी, गोळ्यांच्या स्ट्रिप्स आणि सिरपच्या बाटल्या लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा. गोळ्यांच्या बाटल्यांमध्ये कापूस, प्लास्टिक किंवा कागद ठेवू नका कारण यामुळे औषधाचा प्रभाव कमी होऊ शकतो.
औषधे ठेवण्यासाठी आदर्श तापमान
सर्वप्रथम, योग्य तापमान आणि औषध योग्यरित्या साठवण्यासाठी पॅकेजिंगवरील स्टोरेज सूचना वाचा. बर्याच औषधांच्या लेबलवर रूम टेम्परेचरवर औषध साठवण्याची सूचना असते जे साधारणपणे 25°C च्या आसपास असते. परंतु काही औषधे ही थंड तापमानात म्हणजेच फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता असू शकते. यामध्ये लस आणि इन्सुलिनसारख्या इंजेक्शन्सचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रेफ्रिजरेटेड औषधांसाठी योग्य तापमान सामान्यतः 2-8 डिग्री सेल्सियस असते. त्यामुळे चुकूनही कधीही औषधे फ्रीजरमध्ये ठेवू नका.
बॉक्समध्येच ठेवा गोळ्यांच्या स्ट्रिप्स
बॉक्समध्ये पॅक केलेली औषधे टॅब्लेट/कॅप्सूल स्ट्रिप्स केवळ औषधाचे घटक राखून ठेवत नाही तर हवा आणि आर्द्रतेपासून त्यांचे संरक्षण देखील करते. काहीवेळा, गोळ्यांच्या खोक्यांचा वापर विशिष्ट औषधे साठवण्यासाठी केला जातो कारण त्यावर प्रत्येक दिवसासाठी सूचना दिलेल्या असतात, ज्यामुळे लोकांना दैनंदिन नियमानुसार औषधांचा मागोवा घेणे सोपे होते. अनेक लोक त्यांच्या गोळ्या बॉक्समध्ये न ठेवता तशाच काढून ठेवतात. यामुळे गोळ्या हवेच्या संपर्कात येतात. बॉक्समध्ये ठेवलेल्या अशा गोळ्या काहीवेळा आठवडाभरात खराब होऊ शकतात आणि त्यामुळे अशी औषधे नंतर नष्ट करावीत. तसेच, जेव्हा तुम्ही गोळ्या पॅकिंगच्या बॉक्समधून काढून ठेवता तेव्हा औषधाची एक्सपायरी डेट विसरण्याची दाट शक्यता असते.
सिरप साठवण्याची योग्य पद्धत
सिरप नेहमी सूर्यप्रकाशापासून दूर आणि रूम टेम्परेचरवर ठेवावे. जर त्यावर फ्रिजमध्ये साठवण्याची सूचना लिहिलेली असेल तरच ते फ्रिजमध्ये ठेवावे. तसेच, हवा आणि आर्द्रतेचा संपर्क टाळण्यासाठी बाटलीचे झाकण व्यवस्थित बंद करावे कारण यामुळे सिरप दूषित होऊ शकते. औषधे किंवा सिरपने भरलेली बाटली वारंवार उघडू नये कारण त्यामुळे औषध हवेच्या संपर्कात येते आणि औषधाच्या परिणामकारकतेवर परिणाम होऊ शकतो.
अशा प्रकारे औषधे व्यवस्थित ठेवायला हवीत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक