प्रत्येक घरात पनीरची भाजी (Paneer Sabji) हमखास बनते. पाहुणे घरात आल्यानंतर तर आपल्याकडे वेगळी भाजी काही बनवयाची असेल तर पनीर भाजीची रेसिपी आपल्या कामी येते. बऱ्याचदा पनीर घरात आणल्यानंतर तो जास्त काळ टिकणार नाही असं आपल्याला वाटतं. त्यामुळे पटकन त्याच दिवशी पनीरची भाजी करण्यात येते. पनीर साधारण दोन दिवस ठेवला तर खराब होतो. पण तुम्ही पनीर जर आम्ही सांगितलेल्या पद्धतीने स्टोअर केला तर 15 दिवस नाही तर तब्बत एक महिना टिकू शकतो आणि त्याला कोणताही खराब वासही येणार नाही. अशा पद्धतीने पनीर तुम्ही साठवला तर तो ताजाही राहील आणि खाण्यालायकही राहील. पनीर अधिक काळ कसा टिकवावा याच्या काही सोप्या टिप्स घ्या जाणून.
अधिक वाचा – नासलेलं दूध टाकून न देता असा करा वापर, बनवा स्वादिष्ट पदार्थ
पाण्यात ठेवा पनीर
पनीर अधिक काळ टिकण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक एअरटाईट कंटनेर बॉक्स (Airtight container box) घ्या. यामध्ये पनीरचे तुकडे ठेवा. आता कंटेनरमध्ये पाणी भरून घ्या. कंटेनरमधील पनीरचे तुकडे पाण्यात पूर्णतः बुडतील इतके पाणी भरा. त्यानंतर बॉक्स पूर्ण बंद करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. केवळ एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला पनीर जितके दिवस साठवायचा आहे तितके दिवस फ्रिजमधून डबा बाहेर काढून तुम्हाला त्यातील पाणी बदलावे लागेल. पनीर अजिबात खराब होणार नाही आणि तुम्ही साधारण अशा पद्धतीने खूप दिवस पनीर टिकवून ठेऊ शकता. तसंच पनीर आणल्यानंतर स्टोअर करण्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित पाण्याने धुऊन घेतला तरीही तो अधिक काळ टिकू शकतो. त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरू शकता.
पनीरच्या मऊपणासाठी
मलमल अथवा कॉटनच्या कपडा भिजवा आणि पनीर आणल्यानंतर त्यामध्ये ठेवा. त्यानंतर चारही बाजूने कपडा दुमडा. असे करून झाल्यावर पनीर बांधलेला कपडा फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे पनीरचा मऊपणा टिकून राहातो आणि ताजेपणाही तसाच राहातो. बॉक्स अथवा डब्ब्यापेक्षा पनीर अशा पद्धतीने ठेवले तर अधिक ताजे आणि मऊ राहाते. कपडा सुकला आहे असं वाटेल तेव्हा दोन – तीन दिवसाने काढून पुन्हा एकदा ओला करून त्यात पनीर तसाच ठेवा. जेणेकरून पनीर अधिक काळ टिकू शकतो. पनीरचे तुकडे करून ठेवले तर अधिक काळ टिकतात. त्यामुळे कपड्यात बांधण्यापूर्वी तुकडे करा आणि मग कपडा दुमडा. तसंच कपडा अधिक घट्ट बांधला जाणार नाही याचीही काळजी घ्या.
एक महिना खराब नाही होणार पनीर
पनीर जास्त काळ टिकविण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक पारदर्शक आणि स्वच्छ असा पॉलिथिन घ्या. त्याऐवजी तुम्ही झिपलॉक बॅगेचा वापरही करू शकता. आता त्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा व्हाईट व्हिनेगर (White Vinegar) ओता आणि पॉलिथिनच्या आत सगळीकडे पसरवा. यामध्ये पनीर ठेवा आणि बंद करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॉलिथिन अथवा झिपलॉकमध्य अजिबात हवा राहू देऊ नका. त्यानंतर तुम्ही हे फ्रिजमध्ये स्टोअर करा. असे केल्याने पनीर साधारण एक महिना टिकते. लक्षात ठेवा की, 15 दिवसानंतर प्लास्टिक तुम्हाला बदलावे लागेल. त्याशिवाय जेव्हा तुम्हाला पनीर वापरायचे असेल तेव्हा पॉलिथिनमधून काढल्यावर सर्वात पहिले हे पनीर कोमट पाण्यात टाका. ज्यामुळे पनीर मऊ आणि खाण्यालायक होतील. पनीर काढल्या काढल्या तुम्हाला ते वापरता येणार नाही हे लक्षात ठेवा.
पनीर तुम्ही अधिक काळ अशा पद्धतीने साठवू शकता. तुम्हाला पनीरची भाजी अचानक नको असेल तर ते साठविण्यासाठी तुम्ही या सोप्या पद्धतींचा अवलंब नक्की करा. इतकंच नाही मधुमेही डाएटसाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्की करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक