अनेक हिंदू सणांना आता सुरुवात झाली आहे. सगळीकडे मंगलमय असे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. अशात पूजेची भांडी लागणे हे अगदी स्वाभाविक आहे. पूजेची भांडी ही प्रत्येक हिंदू घरात काही खास कार्यक्रमानांच काढल्या जातात. पूजाविधी आटोपला की, पूजेची भांडी नेमकी कशी ठेवावी हे कित्येकांना कळत नाही. तांब्याची-चांदीची भांडी वापरल्यानंतर त्यांची स्वच्छता राखणे आणि त्या व्यवस्थित ठेवणे हे देखील गजरेचे असते. त्यामुळे आज आपण पूजेची भांडी स्वच्छ केल्यानंतर ती जपून कशी ठेवावी ते जाणून घेऊयात
स्टीलच्या भांड्यांना लागलेला गंज काढा सोप्या पद्धतीने, पटकन होईल सुटका
भांडी स्वच्छ धुवून घ्या
पूजाविधी करताना तांब्या चांदीच्या भांड्यात आपण दूध- दूधाचे पदार्थ असे ठेवत असतो.हळदी-कुंकू याचा त्यांना स्पर्श होत असतो. त्यामुळे ही भांडी आपसुकच काळी पडतात किंवा त्यांना डाग पडतात. ही भांडी अशीच्या अशी आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे ही भांडी स्वच्छ करुन मगच कपाटात ठेवणे गरजेचे असते.त्यामुळे सगळ्यात आधी पुजेची भांडी धुवून घ्या. चांदीच्या भांड्यासाठी खास पावडर मिळतात किंवा तुम्ही कोलगेट पावडरसुद्धा वापरु शकता. तर तांब्याची भांडी धुताना तुम्ही कोकम किंवा खास बाजारात मिळणाऱ्या पावडर देखील वापरु शकता. त्यामुळे सगळ्यात आधी भांडी स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करुन घ्या.
कापडी फडताळ्यात बांधा
सगळ्यात सोपा आणि साधा पर्याय म्हणजे तुम्ही छान स्वच्छ पातळ अशा कपड्यात तुमची भांडी ठेवू शकता. भांडी कोरडी केल्यानंतर ती छान एक एक फडताळात बांधून ठेवा. असे केल्यामुळे भांडी छान राहतात. ज्यावेळी तुम्ही पुन्हा भांडी काढता त्यावेळी ती वापरायला बरी पडतात. इतकेच नाही तर कापडी फडताळात भांडी बांधल्यामुळे भांड्यामध्ये राहिलेले पाणी टिपण्यासही मदत मिळते. त्यामुळे भांड्यामध्ये ओलालवा हा अजिबात राहात नाही.
वॅक्युम पद्धत वापरा
जर तुमच्याकडे वॅक्युममशीन असेल तर तुमच्यासाठी ही ट्रिक फारच कामी येईल. चांगली जाड प्लास्टिकची एअरटाईट पिशवी घेऊन त्यामध्ये तुम्ही भांडी अगदी योग्य पद्धतीने लावून ठेवा. त्यानंतर तुम्ही वॅक्युम मशीनचा उपयोग करुन त्यामधून सगळी हवा काढून टाका. झीप पाऊचचा एक थोडासा भाग उघडूून तुम्हाला हे करायचे आहे. ती सगळी हवा काढून टाकल्यानंतर सगळी भांडी एकदम जागच्या जागी राहतात. ज्यावेळी तुम्हाला भांडी हवी असतील त्यावेळी तुम्ही त्याला एक होल पाडून त्यातील हवा काढून भांडी वापरु शकता.
आरोग्यदायी पंचामृत सेवनाचे फायदे (Panchamrut Benefits In Marathi)
प्लास्टिकच्या डब्यात ठेवा
जर तुम्हाला बाकी काहीही करणे शक्य नसेल तर तुम्ही सरळ एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. अशा डब्यांमध्ये ही भांडी अगदी व्यवस्थित राहतात. आता ही ट्रिक थोडी जागा घेणारी आहे. पण यामध्ये भांडी चांगली राहिल्यामुळे तुम्हाला ती अगदी कधीही वापरता येतात. त्यामुळे किचनमध्ये जागा असेल तर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यातच घालून हे डबे ठेवावे. त्यामध्ये हवा राहू नये असे वाटत असेल तर त्यामध्ये मखमखी कपडा घालून ठेवला तरी चालेल.
आता पूजेची भांडी वापरुन झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ही भांडी ठेवून द्या.