सध्या पुन्हा एकदा सगळे काही सुरळीत सुरु झाले आहे. कोरोना काळात सगळ्यांनी घरात सामान आणून ठेवायची सवय लावून घेतली आहे. आताही अनेक जण घरात सामान आणून ठेवतात. कामावर जाणाऱ्यांना रोजच्या रोज भाज्या आणणे शक्य होतेच असे नाही. त्यामुळे आठवडाभराच्या भाज्या अनेक जण घरात आणून ठेवतात. भाज्या आणल्यानंतर त्यावर अनेक संस्कार करावे लागतात. भाज्या धुणे आणि त्या नीट ठेवणे गरजेचे असते. भाज्या जास्त काळ टिकण्यासाठी आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही चुका झाल्या की, भाज्या लगेच खराब होऊ लागतात. जर तुम्हाला फ्रिजमध्ये भाज्या जास्त काळासाठी टिकवायच्या असतील तर तुम्ही हे काही सोप्या टिप्स फॉलो करु शकता.
कणीक अधिक तास ताजी ठेवायची असल्यास वापरा सोप्या टिप्स
भाज्या करा स्वच्छ
फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्यापूर्वी तुम्हाला भाज्या स्वच्छ करणे गरजेचे असते. भाज्या स्वच्छ करणे म्हणजे ते पाण्यातून काढू नका. कारण भाज्या पाण्यातून काढल्या तर त्यावर कितीही वाळवल्यानंतर मॉईश्चर टिकून राहते.त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर भाज्या या खराब होऊ लागतात. त्यामुळे भाज्या आणल्यानंतर विशेषत: पालेभाज्या, कोथिंबीर या भाज्या धुवू किंवा चिरु नका. कारण त्यामुळेही त्या खराब होतात. भाज्यांची देठ मोडून त्यामध्ये अडकलेली माती झटकून घ्या.
एअर टाईट डब्याचा वापर
भाज्या स्वच्छ केल्यानंतर तुम्ही त्या डब्यामध्ये ठेवू शकता. त्यामुळे त्या चांगल्या टिकतात. बाजारात खास एअर टाईट डबे मिळतात. ज्याच्यामध्ये मॉईश्चर अजिबात जात नाही. त्यामुळे भाज्यांचे आयुष्य वाढते असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे स्वच्छ केलेल्या पालेभाज्या तुम्ही डब्यात भरुन ठेवा. यासाठी स्टीक किंवा साधे डबे टाळा. जर तुम्ही वांगी, मटार, तोंडली, शिराळी अशी भाजी ठेवत असाल तर त्यातील दाणे किंवा शेंगा मोडल्यातरी देखील चालू शकतील.
टिश्यूचा करा वापर
काही जणांचे फ्रिज हे खराब झालेले असतात. अशा फ्रिजचे सेटिंग कितीही बदलले तरी देखील त्याच्यामध्ये खूप बर्फ तयार होतो. अशावेळी तुम्ही ज्या प्लास्टिकच्या डब्यात कोथिंबीर किंवा भाजी ठेवत असाल त्या डब्याच्या खाली आणि त्या डब्याच्या वर एक एक टिश्यू पेपर ठेवा . टिश्यू पेपर ठेवल्यामुळे जर डब्यावर पाणी साचणारे असेल तर ते पाणी शोषण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही टिश्यू पेपरचा वापर देखील करु शकता.
आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)
झिप पाऊचही आहे फायद्याचे
जर तुम्हाला डब्यांचा वापर करुन तुम्हाला फ्रिजमधील जागा अडकवायची नसेल तर तुम्हाला झिप पाऊचचा वापर करणे फारच सोपे आहे. कारण त्यामुळे तुम्ही जास्ती जास्त भाज्या या फ्रिजमध्ये सहज ठेवू शकता. भाज्या कोरड्याच स्वच्छ केल्यानंतर मगच त्या पिशवीमध्ये भरा आणि त्यानंतरच मग तुम्ही पाऊच भरुन फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे भाज्या चांगल्या टिकतात.
जर तुम्ही भाज्या भिजवून त्या वाळवल्या तर त्या जास्त काळ टिकत नाहीत. फ्रिजचा थंडावा सहन न झाल्यामुळे भाज्या या खराब होऊ लागतात. ज्यावेळी तुम्ही भाज्या करणार असाल त्यावेळीच तुम्हाला हवी ती भाजी काढा धुवा, चिरा आणि मग खा.
वेकेशनवर जाण्यापूर्वी घराची कशी राखावी निगा, फॉलो करा या टिप्स