चीज हा जगातील सर्वात प्रिय पदार्थांपैकी एक आहे आणि त्याचे शेकडो प्रकार आहेत. काही लोक भरपूर महाग असलेले गॉरमेट चीज पसंत करतात, तर काही लोक तुलनेने स्वस्त प्रोसेस्ड चीज खाणे पसंत करतात. चीज फक्त मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडते. म्हणूनच बरेच लोक नेहमी पिझ्झा पास्त्यामध्ये अतिरिक्त चीजची मागणी करतात. चीज घातल्याने जेवणाची चव अनेक पटींनी वाढते मग तो पिझ्झा असो वा सामान्य पराठा. पण चीजचे कार्य केवळ पदार्थांची चव वाढवणे एवढेच नसून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते ज्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय चीज खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. बर्याचदा आपण चीज फ्रीजमध्ये ठेवतो, विशेषत: ज्या घरांमध्ये लहान मुले असतात, तेथे अशा वस्तूंना जास्त मागणी असते. त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात चीज आणतो आणि ते ताजे राहण्यासाठीही आपण अनेक उपाय करतो.जर तुम्ही देखील चीज प्रेमी असाल, तर चीज साठवण्याचा योग्य मार्ग कुठला हे जाणून घ्या.

प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळू नका
चीज सहज प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून ठेवता येते, परंतु हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. यामुळे चीज खराब होऊ शकते, तसेच प्लास्टिक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
चीज बॅग किंवा चीज पेपर
जर तुम्हाला चीज जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर तुम्ही यासाठी चीज बॅग किंवा चीज पेपर वापरू शकता. हे चीजचे हवेच्या संपर्कात येण्यापासून संरक्षण करेल.
वॅक्स किंवा पार्चमेंट पेपर
जर तुम्हाला चीज ठेवायला बॅग किंवा चीज पेपर सापडत नसेल तर तुम्ही वॅक्स पेपर किंवा पार्चमेंट पेपर देखील वापरू शकता. तुम्ही त्यात चीज गुंडाळून कोणत्याही झिप लॉक पाऊच बॅगमध्ये ठेवू शकता. यामुळे हवा आत जाण्यास प्रतिबंध होईल आणि चीज कोरडे होणार नाही.
चीजचा डबा वारंवार बदला
जर तुम्ही एखाद्या डब्यात मोठ्या प्रमाणात चीज साठवले असेल, तर तुम्ही तो डबा किंवा ते भांडं दर दोन दिवसांनी बदलायला हवे. एकाच भांड्यात जास्त काळ चीज ठेवू नका. यामुळे चीज खराब होऊ शकते.
चीजची एक्स्पायरी डेट लक्षात ठेवा
अन्नपदार्थ फक्त काहीच कालावधीसाठी ताजे व चांगले राहतात.काही पदार्थ लवकर खराब होतात तर काही पदार्थ बराच काळ टिकतात. चीजचे अनेक प्रकार असतात.त्यातलेही काही प्रकार बराच काळ टिकतात. त्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी, तुम्ही खरेदीची तारीख आणि एक्स्पायरी डेट लक्षात ठेवा.

एका वेळी फक्त थोडे चीज खरेदी करा
चीज कमी प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ते फक्त काही दिवसांसाठी साठवावे लागेल. असे करणे फायदेशीर आहे कारण तुम्ही ते पहिल्यांदा विकत घेता तेव्हा त्याची चव अधिक ताजी असते. आदर्शपणे तुम्ही फक्त एक किंवा दोन वेळा जितके चीज खाऊ शकता तितकेच चीज खरेदी केले पाहिजे. शिवाय, अशा प्रकारे ते वाया देखील जाणार नाही.
भाजीच्या ड्रॉवरमध्ये ठेवा
आदर्शपणे, चीज 35 ते 45 अंश फॅरेनहाइट दरम्यान ठेवले पाहिजे. फ्रीझिंगमुळे त्याचे टेक्स्चर खराब होऊ शकते, म्हणून चीज साठवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण हे फ्रीझरपासून शक्य तितके दूर आहे. ते फ्रिजमधील भाजीपाला साठवण्याच्या ड्रॉवरमध्ये किंवा तळाशी असलेल्या शेल्फवर ठेवा जेथे तापमान एकसमान असेल परंतु खूप थंड नसेल. तसेच तुम्ही चीजला ऑलिव्ह ऑइलचा हात लावून ठेवले तरी ते जास्त काळ फ्रेश राहण्यास मदत होते.
अशा प्रकारे तुम्ही चीज अधिक काळ ताजे ठेवू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक