एक काळ होता ज्यावेळी बेलबॉटम चांगलाच ट्रेंडमध्ये होता. जितका मोठा बॉटम तितकी ती पँट स्टायलिश असायची. काळ बदलला स्टाईल बदलली हल्लीच्या काळात चिनोज आणि घट्ट पँट घालण्याची स्टाईल आली. पण आता फॅशन इतक्या लगेच बदलली आहे की, सध्या वाईड लेग पँटची फॅशन आली आहे. बेलबॉटम आणि वाईड लेग पँटमध्ये काहीही साम्यता नसती तरी ट्रेंड फॉलो करणाऱ्यांनी हा प्रकार नक्की ट्राय करायला हवा. वाईड लेगची ही फॅशन कशी कॅरी करायची चला घेऊया जाणून
वाईड लेग पँट म्हणजे काय?
बेलबॉटम पँट या फक्त खालूनच मोठ्या असायच्या. पण आताच्या या वाईड लेग बॉटम कंबरेच्या खालच्या भागापासूनच मोठ्या असतात. त्याचा तुमच्या फिगरशी काहीही संबंध नसतो. त्याचा आकार वरपासून ते बॉटमपर्यंत अगदी सारखा असतो. ही पँट एखाद्या लेंग्यासारखी असते असे म्हटले तरी काहीही हरकत नाही. पण ही पँट सध्या चांगलीच ट्रेंडमध्ये आहे. कॉलेजच्या तरुणींची ची आवडती फॅशन झाली आहे. टाईट जीन्स घालून कंटाळला असाल तर अगदी कम्फर्टेबल असा पर्याय म्हणून तुम्ही वाईड लेग पँटची फॅशन करु शकता.
वाईड लेगची फॅशन करताना टिप्स
वाईड लेग पँट घालायचा विचार करत असाल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायल्या हव्यात. तरच ही स्टाईल तुम्ही उत्तम पद्धतीने कॅरी करु शकता.
- वाईड लेग पँटवर क्रॉप टॉप हे अधिक ट्रेंडी दिसतात. ज्यावेळी तुमची पँट लुझ असते. त्यावेळी वरचा टॉप टाईट असेल तर तो अधिक चांगला दिसतो. एखादा असा क्रॉप टॉप त्यावर निवडा जो तुमच्या पायांची उंची अधिक दाखवेल. आणि तुमचा बांधा अधिक सुडौल
- वाईड लेग पँट मध्ये तुम्हाला रिप्ड (फाटलेली) असा देखील एक पर्याय मिळतो. जो खूप जास्त ट्रेंडी दिसतो. अशा पँटवर टॉप हे जास्त ट्रेंडी आणि लेटेस्ट हवे. जसे की पोलोनेक, हॉल्टरनेक, ट्युब पण हे सगळे टॉप शॉर्ट असायला हवेत. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बॉडी हगिंग असायला हवे. तरच ते जास्त चांगले दिसतात.
- ज्यांच्या मांड्या जाड आहेत अशांना ही पँट उत्तम आहे कारण त्यामुळे तुमच्या मांड्या झाकल्या जातात. या पँटमध्ये तुम्हाला अगदी सहज वावरता येेते. त्यामुळे स्थुल असणाऱ्या व्यक्तिंनी पँट घालायला काहीच हरकत नाही.
- वाईड लेग पँट जर तुम्हाला कुडत्या खाली घालायची असेल तर तुम्ही तसे देखील करु शकता. हल्ली चुडीदार पेक्षा खूप जण पँट घालतात. कारण त्या दिवसभर घालण्यासाठी खूपच कम्फी असते. अशावेळी तुम्ही थोड्या शॉर्ट कुडतीवर अशाप्रकारे वाईड लेगची फॅशन कॅरी करु शकता. ते देखील चांगले दिसतात.
- जर तुम्ही प्लस साईज असाल तर अनेकदा पँट घेताना तुम्हाला अडथळा होत असेल. पण ही एकमेव अशी फॅशन आहे ज्याचा फिट खूप चांगला मिळतो. चांगल्या ब्रँडमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला चांगल्या फिटच्या पँट मिळू शकतात.
आता वाईड लेग पँट नक्की करा कॅरी आणि दिसा फॅशनेबल