एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर अचानक आपल्याला काही त्रास होऊ लागतो. म्हणजेच पोटदुखी, उलट्या असा त्रास झाला की आपल्याला समजते की आपल्याला काही तरी झालं आहे. यालाच आपण फुड पॉयझनिंग म्हणतो. फुड पॉयझनिंग झाल्यानंतर एक मोठी उलटी आपल्याला होते. खूप जणांना तर हगवणही लागते. असे झाल्यामुळे अंगातून त्राण निघून जाते. पण तुम्हाला फुड पॉयझनिंग झाले असे निदान झाले असेल तर तुम्ही कशापद्धतीने काळजी घ्यायला हवी आणि काय करायला हवे ते आपण जाणून घेऊया.
तुम्हाला जर असा त्रास झाला किंवा तुमच्या जवळपासच्या व्यक्तिला झाला तर तुम्ही त्या व्यक्तीची अशाप्रकारे काळजी घेऊ शकता.
फुड पॉयझनिंग म्हणजे काय?
एखादा अन्न पदार्थ खाल्ला की, पोट दुखी, उलट्या असा त्रास होऊ लागला की समजावे तुम्हाला फुड पॉयझनिंग झाले आहे. इतकेच नाही तर ही उलटी इतर उलटी प्रमाणे नसते तर तुम्हाला फुड पॉयझनिंग झाल्यानंतर खूप मोठी उलटी होते. असा त्रास तुम्हाला होऊ लागला की, समजावे तुम्हाला एखादे अन्न बाधले आहे. फुड पॉयझनिंग ही दोन प्रकारच्या बॅक्टेरियामुळे होते. इ कोलाय आणि साल्मोनेला अशी त्यांची नावे असून. इ कोलाय या बॅक्टेरिया हा दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, कच्चे किंवा मासांहारी पदार्थ यांमुळे होऊ शकते. तर दुसऱ्या प्रकारच्या बॅक्टेरियाचा त्रास झाल्यामुळे ताप येणे, उलट्या येणे असा त्रास होऊ लागतो.
फुड पॉयझनिंगनंतर अशी घ्या काळजी

तुम्हाला फुड पॉयझनिंगचा त्रास झाला असेल तर तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया
- पाणी पिणे: फुड पॉयझनिंग झाल्यानंतर शरीरातून पाणी कमी झालेले असते. त्यामुळे शरीरातून त्राण गेल्यासारखे होते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही पाणी प्यायला हवे. थोड्या थोड्यावेळाने तुम्ही पाणी पित राहाल तर तुम्हाला थोडी उर्जा मिळण्यास मदत मिळेल. शिवाय पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात राहिलेला मल: देखील बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. ज्युस प्या तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.
- जिऱ्याचे पाणी : पोटत दुखत असेल किंवा सतत मळमळ झाल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यायला हवे. भाजलेले जिरे घेऊन ते पाण्यात घालावे आणि असे पाणी प्यावे. त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल.
- केळ: केळ्यामध्ये पोटॅशिअम असते. त्यामुळे पोटदुखी कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही फुड पॉयझनिंगनंतर केळ्याचे सेवन केले तरी देखील चालू शकते.
- पुदिना: पुदिना हा देखील तुमच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. पुदिन्याची काही पाने घेऊन तुम्ही ती पाने वाटून पाण्यात घालावे. असे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाला आराम मिळण्यास मदत मिळते.
- सफरचंद: Eat Apple Day keep Doctor Away असे सफरचंदाबद्दल सांगितले जाते. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास झाला असेल तर तुम्ही सफरचंदाचे सेवन करायला हवे. सफरचंद खाल्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळते.
आता तुम्हाला फुड पॉयझनिंग झाले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी.