ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
AC चा वापर करताय

उन्हाळ्यात एसी (AC) चांगला टिकवण्यासाठी सोप्या टिप्स

 उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी हल्ली सगळ्यांच्याच घरी एसी (Air Conditioner) लावला जातो. तो कधीही बंद करु नये असा उकाडा खूप जणांना जाणवतो. पण सतत एसीचा वापर करणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. कारण त्यामुळे बाहेर गेल्यानंतर इतर हवामानाशी जुळताना आपल्याला त्रास होतो. घरी नवा एसी आणला की, त्याची मजा वेगळी असते. दिवसभरातून एसी लावण्याची संधी आपण शोधत असतो. एसीशिवाय शरीरातील थंडावा टिकवण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करणे चांगले असते. ठिकाणी एसी हा दिवसभर लावला जातो. थंड हवा देणारा एसी ही शेटी एक मशीन आहे. त्याची काळजी घेणे हे देखील गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या या दिवसात एसी जास्तीत जास्त काळासाठी टिकवण्यासाठी तुम्ही काही प्रो टिप्स वापरायला हव्यात.

एसी कधी लावाल?

Air Condtioner

दिवसभर एसी लावणे चांगले नाही हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. पण झोपताना तुम्हाला आरामदायी झोप हवी असेल तर तुम्ही रात्री झोपताना किंवा ज्यावेळी तुम्ही झोपत असाल त्यावेळी एसी लावा. घरात वावरताना शक्यतो तुम्ही एसी न लावलेला बरा. कारण त्यामुळे तुम्हाला इतर वातावरणात राहणे थोडे कठीण जाते. रात्री झोपताना एसी लावायचा असेल आणि झोपायचे असेल तर तुम्ही एसीवर टाईमर सेट करा. त्यामुळे देखील तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळते.

उन्हाळ्यात एसीची अशी घ्या काळजी 

एसीची काळजी

तुमच्याकडे नवा एसी आणला असेल किंवा तुमचा एसी जुना असेल तरी देखील तुम्ही त्याची काळजी कशी घ्याची ते जाणून घेऊया. जेणेकरुन तुमचा एसी अधिक काळ चांगला टिकेल. 

  1. एसीसाठी कॉम्प्रेसर हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याची काळजी घेणे सगळ्यात जास्त गरजेचे असते. त्यामुळे या कॉम्प्रेसरवर काही जात नाही ना याची काळजी घ्या. तो योग्य वेळी स्वच्छ करा. नुसता झाडूने जरी त्यावरील धूळ,माती काढले तरी देखील चालून जाते.त्यामुळे कॉम्प्रेसर चांगला सुरु राहतो. 
  2. एसी हा थंड हवा तेव्हाच देते जेव्हा त्यामध्ये योग्य प्रमाणात गॅस भरलेला असतो. तुम्ही एसीचा जितका वापर कराल तेवढा त्याचा वापर जास्त होतो. त्यामुळे गॅस संपला तर तो भरुन घेणे गरजेचे असते.तरच तुम्हाला एसीची थंडी हवा लागू शकते. 
  3. अनेकदा एसी काही केल्या काम करत नाही. अशावेळी एसीमध्ये घाण अडकलेली असू शकते. किंवा अन्य काही कारणे देखील असू शकतात. तुमच्या एसीचे काम करणे बंद झाले असेल तर तुम्ही लगेच टेक्निशअन्सना बोलावून एसीचे काम करुन घ्या. म्हणजे तुम्हाला उन्हाळा सहन करावा लागणार नाही. 
  4. एसीमधून अचानक पाणी पडणे, बर्फाचे खडे पडणे असा त्रास होत असेल तर तुम्ही लगेचच एसीची सर्व्हिसिंग करुन घ्यायला हवी. नाहीतर एसी अधिक बिघडण्याची शक्यता असते. 
  5. काही ठिकाणी लाईट येत जात असते अशावेळी एसीवर लोड पडण्याची शक्यता असते. अशावेळात एसीला स्टेबिलायझर लावणे गरजेचे असते. म्हणजे तुमचा एसी खराब होत नाही

एसीमधील गॅस जास्त टिकवायचा असेल तर तुम्ही त्याचा वापर घरच्या घरी करताना नीट करायला हवा. म्हणजे काही काळासाठी एसी लावून मग तुम्ही तो बंद करा. खोली व्यवस्थित बंद असेल तर एसीची हवा जास्तीत जास्त काळ आत राहण्यासाठी मदत होईल. जर तुम्ही सारखी उघडझाप केली तर एसीची हवा जास्त काळ टिकण्यासाठी मदत होणार नाही.

ADVERTISEMENT

आता एसीची वापर करा पण त्याचा योग्य वापर करण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा.

04 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT