ADVERTISEMENT
home / Mental Health
depression in elderly

घरातील वयोवृद्धांना नैराश्य येऊ नये म्हणून ही काळजी घ्या 

निरोगी आयुष्य जगणे म्हणजे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य देखील चांगले असणे होय. मानसिक आरोग्य चांगले असणे आजच्या काळात अधिक महत्त्वाचे झाले आहे कारण आता माणूस एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत असतो. हल्लीच्या तणावयुक्त आयुष्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होणे साहजिकच आहे. आपल्याला आयुष्यात अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते जे आपल्याला नैराश्याच्या दिशेला ढकलतात. अगदी कुणालाही नैराश्य येऊ शकते. काही लोक ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम असतात आणि त्यांना फार त्रास न होता ते त्यातून लवकर बाहेर पडतात, तर काही लोक नैराश्याच्या खोल गर्तेत सापडतात आणि त्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. नैराश्याची ही अवस्था वृद्धापकाळातही विकसित होऊ शकते. 

निवृत्तीनंतरचे बदललेले आयुष्य 

लोकांना असे वाटते की नैराश्य अशा लोकांना  येते ज्यांना काही त्रास किंवा अडचणी असतात. पण हा एक भ्रम आहे. ज्यांचे जीवन वरकरणी सामान्य आणि आरामदायी दिसते, ज्यांच्याकडे पैसा, साधन किंवा कशाचीही कमतरता नसते अशा लोकांनाही नैराश्याचा त्रास होतो. आकडेवारी तर असे दर्शवते की निवृत्तीनंतर 80 टक्क्यांहून अधिक लोक नैराश्याच्या दुष्टचक्रात सापडतात.परंतु या सर्व लोकांमध्ये नैराश्याची गंभीर लक्षणे दिसतातच असे नाही. या समस्येचे एक मोठे कारण म्हणजे लोक निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नीट नियोजन करत नाहीत. निवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून अचानक वर्षानुवर्षे सुरु असणारी दिनचर्या बदलते. निवृत्तीनंतर खास करून पुरुषांना घरात करण्यासारखे काहीच दिसत नाही तेव्हा निरुपयोगी असल्यासारखे वाटते. रोजच्या सहकाऱ्यांशी होणारा संपर्क, घरापासून ऑफिसपर्यंतच्या वाटेतील घडामोडी इत्यादी गोष्टी तुटतात आणि व्यक्ती नैराश्याच्या कचाट्यात सापडते.

Depression In Older People
Depression In Older People

वृद्धांमधील नैराश्याची लक्षणे 

वृद्धापकाळात मानसिक स्थितीत होणारे बदल आणि त्यामुळे नैराश्यासारख्या समस्या उद्भवणे सामान्य आहे, परंतु मोजकेच लोक यासाठी उपचार घेतात. वृद्धांमध्ये नैराश्य लक्षणे तरुणांपेक्षा वेगळी असू शकतात. त्यांच्यामध्ये दिसणारी लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात. नेहमी थकल्यासारखे वाटणे,  झोप न लागणे,चिडचिड होणे,कोणत्याही कामात किंवा गोष्टीत लक्ष केंद्रित करण्यात अडचण, आवडीच्या गोष्टीत पूर्वीप्रमाणे उत्साह किंवा स्वारस्य न वाटणे, भूक आणि वजन कमी होणे, हालचाली व कामाचा वेग मंदावणे, उदास वाटणे, अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, आत्महत्या किंवा स्वत:ची हानी करण्याचे विचार येणे इत्यादी. 

Depression In Older People
Depression In Older People

अशी घ्या काळजी 

जर तुमच्या कुटुंबात डिप्रेशनची हिस्ट्री असेल तर वयाच्या पन्नाशीनंतर नंतर कुटुंबातील सदस्यांच्या नियमित चाचण्या कराव्या. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर गरज पडल्यास समुपदेशन घ्यावे. घरातील ज्येष्ठांना निवृत्तीनंतर  छंद जोपासण्यास प्रवृत्त करा. घरातील वृद्ध किंवा वयस्कर व्यक्तीच्या वागण्यात काही वेगळे जाणवले तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.  वडीलधारी मंडळी एकटी राहत असतील, मुले घरापासून दूर असतील, तर वेळोवेळी ज्येष्ठांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. जर वारंवार भेटणे शक्य नसेल तर व्हिडीओ कॉल करून त्यांच्या संपर्कात राहा. वयोवृद्धांना आपले अस्तित्व निरुपयोगी व व्यर्थ वाटणार नाही याची काळजी घ्या. नैराश्यावर वेळीच उपचार सुरू केले तर खूप चांगले परिणाम मिळू शकतात, पण त्यासाठी कुटुंबीय किंवा मित्र-परिवार यांचे सहकार्य असायला हवे. जवळच्या व्यक्तींचा आधार असेल तर नैराश्यावर लवकर मात करता येते.

ADVERTISEMENT

नैराश्यावर उपचार घेत असताना,डॉक्टरांना आधीच चालू असलेल्या सर्व औषधांबद्दल माहिती दिली पाहिजे.कारण काही इतर औषधे नैराश्याच्या औषधांसह एकत्रित केल्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. उपचारांबरोबरच घरातील ज्येष्ठांच्या शारीरिक हालचालींचीही काळजी घ्या. त्यांनी योग, ध्यान, रोज चालणे यासारख्या क्रिया कराव्या यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. 

अशा प्रकारे घरातील ज्येष्ठांना नैराश्याचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घ्या. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT