केस पांढरे झाल्यावर केस रंगवणे ही संकल्पना आता मागे पडली आहे. हल्ली कोणीही आपल्या आवडीचा हेअर कलर कोणत्याही वयात करतात. केसांना रंग केल्यानंतर काही वेळासाठी तो चांगला दिसतो. केसांना एक छान लुक येतो. स्वाभाविकपणे तुमचाही लुक उठून दिसतो. केसांचा रंग जसजसा खाली उतरत जातो. तसतशा केसांच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यापैकी एक म्हणजे केस कोरडे होणे. खूप जणांचे केस हे कोरडे होऊ लागतात. केसांचा अक्षरश: झाडू दिसू लागतो. केस हेअर कलर केल्यानंतर ड्राय होत असतील तर तुम्हाला काही सोप्या टिप्स माहीत करुन घ्यायला हव्यात जेणेकरुन तुम्हाला केस चांगले राहण्यास मदत मिळेल.
ब्लीचचा परिणाम
केसांना रंग लावणे म्हणजे केसांवर ब्लीचचा वापर करणे. केसांसाठी आपण कोणता रंग निवडतो. त्यावर ब्लीच अवलंबून असते. कधी कधी काही जणांकडून ब्लीच जास्त घातले गेले तर केसांचा तेवढा भाग हा नाजूक दिसतो. केस अधिक फुललेले दिसतात. ते थोडे विंचरले तरी देखील तुटतात. असे केस नुसतेच फुललेले असतात. त्यांना काहीही जोर राहिलेला नसतो. केसांना रंग करताना तो चांगल्या आणि जाणकार व्यक्तीकडून करा.
डीप कंडिशनिंग
केसांसाठी डिप कंडिशनिंग ही या दिवसात फार महत्वाची असते. केसांना दर दोन दिवसांनी कंडिशनर लावायला अजिबात विसरु नका. कंडिशनर लावल्यानंतर थोडावेळ तो केसांवर ठेवणे फार गरजेचे असते. केसांना कंडिशनर हा तुम्ही साधारण 10 मिनिटे लावून ठेवायला हवा. कारण त्यानंतरच खऱ्या अर्थाने तुमचे कंडिशनर केसांना चांगले लागते. केसांना कंडिशनर लावल्यानंतर केस चांगले ठेवण्यासाठी तुम्ही असे डीप कंडिशनिंग करायला हवे. त्यानंतर केस स्वच्छ धुवायला अजिबात विसरु नका. कारण खूप वेळ केसांना लावल्यामुळे कंडिशनर पटकन निघत नाही. केस चांगले स्वच्छ होऊ द्या.
केस विंचरा
खूप जणांना केस विंचरायला खूपच जास्त कंटाळा असतो. असा कंटाळा केसांना रंग लावलेल्यांनी अजिबात करु नये. कारण असे केले तर केसांचा गुंता होत नाही. खूप जण केस विंचरायला पाहात नाही. ज्यावेळी केस विंचरायची वेळ येते. त्यावेळी केसांच्या खालच्या बाजूला केसांचा गुंता झालेला असतो. हल्ली बाजारात टँगल फ्री असे कंगवे मिळतात. असे कंगवे तुम्हाला केसांचा गुंता सोडवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही काही काळाने केस विंचरा. केसांच्या हेअरस्टाईल बदलत राहा. त्यामुळे देखील तुमच्या केसांना फायदा होतो.
प्रोफेशनलची घ्या मदत
केसांना सतत रंग केल्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नसेल तर अशावेळी सलोनला जाऊन तुमच्या केसांची निगा राखणे हे कधीही चांगले. कारण हेअर एक्सपर्ट तुम्हाला या बाबतीत चांगलीच मदत करु शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला केसांची काळजी घेणे खूपच सोपे जाते. त्यामुळे शक्य असल्यास महिन्यातून एकदा तरी तुम्ही हेअर वॉश, हेअर स्पा किंवा हेअर कट असे करायला जा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांमध्ये झालेला फरक नक्की दिसेल
आता कोरड्या केसांची काळजी करण्याची काहीही गरज नाही. फक्त या काही टिप्स नक्की करा फॉलो