ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
how-to-travel-with-baby-safely-in-marathi

बाळासह सुरक्षितपणे प्रवास कसा कराल

तुमच्या बाळासोबत प्रवास करायचाय आणि त्याची तुम्हाला भिती वाटतेय का? मग, घाबरू नका! बाळाच्या सुरक्षित आणि निरोगी प्रवासासाठी आम्ही तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागेल. नवजात बाळ किंवा लहान मुलासोबत प्रवास करणे हे आव्हानात्मक ठरु शकते. सहप्रवाशांसाठी देखील ही एक परीक्षा ठरू शकते कारण त्यांना बाळाचा किंवा लहान मुलांचा त्रास होऊ शकतो. परंतु लहान मुलांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रवासापूर्वी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.  प्रवास करताना केवळ सुरक्षितच नाही तर सर्वांसाठी आनंददायी कसा ठरु शकतो यासाठी काही खास टिप्स या लेखाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. डॉ. प्रशांत मोरलवार, सल्लागार बालरोगतज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खारघर यांच्याशी आम्ही याबाबत अधिक चर्चा केली आणि काही खास टिप्स घेतल्या आहेत. 

बाळासह प्रवास करण्यासाठी टिप्स  

  • विमानात किंवा कारमध्ये बसण्यापूर्वी तुम्ही डायपर बदलू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या बाळाला विमान प्रवासात लगेचच डायपर बदलण्याची आवश्यकता भासणार नाही. जर तुम्ही कारने प्रवास करत असाल तर बाळाचे डायपर बदलण्यासाठी वारंवार ब्रेक घ्या. असे न केल्यास त्वचेवर पुरळ येणे तसेच त्वचा लाल होऊ शकते. बाळाला जास्त वेळ ओले ठेवू नका. म्हणून, वेळोवेळी डायपर बदलण्याचा सल्ला दिला जातो
  • तुमच्या बाळाच्या झोपेच्या पॅटर्नशी जुळणार्‍या फ्लाइट्स निवडा: तुम्हाला तुमच्या बाळाच्या झोपेच्या पॅटर्नच्या नुसार वेळेची निवडावी करणे योग्य ठरेल. दुपारच्या वेळी किंवा रात्रीच्या झोपण्याच्या वेळेनुसार प्रवास निवडणे योग्य राहील. सकाळी लवकर उड्डाण केल्याने तुमच्या बाळाची झोप खराब होऊ शकते
  • आवाजाची तीव्रता कमी करणार्‍या हेडफोन्सची निवड करा: विमानाच्या इंजिनचा मोठा आवाजाने मुल गोंधळून जाऊ शकतात. तसेच थकूही शकतात. तुम्ही लहान मुलासाठी आवाजाची तीव्रता कमी करणारे हेडफोन वापरून पाहू शकता जेणेकरून विमान किंवा रस्त्याने जाताना त्याला चांगली झोप मिळेल
  • टेकऑफ आणि लँडिंगपूर्वी स्तनपान करा: तुम्हाला माहिती आहे का? फीडिंगमुळे बाळाच्या युस्टाचियन ट्यूब्स उघडल्या जातील आणि कानांमध्ये दाब समान होईल आणि वेदना कमी होईल
  • तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत प्रवास करा, जर तुम्हाला एकापेक्षा जास्त बाळांना घेऊन प्रवास करत असाल तर असे केल्याने तुम्हाला बाळाला उत्तमरित्या हाताळता येईल तसेच, इतर माणसं लहानग्यांची काळजी घेत असताना तुम्ही थोडा वेळ काढून आराम करू शकता. रस्त्याने प्रवास करतानाही हे उपयुक्त ठरू शकते

काही महत्त्वाच्या टिप्स 

  • आरामदायी आसन निवडा: ते तुम्हाला अधिक आरामशीर प्रवास करण्यात मदत करते. विंडो सीटमुळे बऱ्याचदा सहप्रवाशांची गैरसोय होऊ शकते त्यामुळे विचारपूर्वक सीट निवडा
  • वेळेत पोहोचा: विमान प्रवास करताना, तुम्ही बाळाला घेऊन वेळेत पोहोचले पाहिजे आणि इतरांच्या आधी चढले पाहिजे. असे केल्याने तुम्हाला बाळासोबत स्थिरस्थावर होण्यास  मदत होऊ शकते
  • अत्यावश्यक वस्तू जवळच बाळगा: अनेकदा फ्लाइट्सच्या विलंबामुळे तुमच्या प्रवासाची लांबी काही तासांनी वाढू शकते. तुम्ही बाळाला लागणारा खाऊ, फॉर्म्युला किंवा पंप केलेले आईचे दूध, डायपर जवळच ठेवा जेणेकरुन अचानक गरज भासल्यास तुमची धांदल होणार नाही
  • तुमच्या बाळाला आरामदायी आणि झाकून ठेवतील असे कपडे घाला: तुमच्या बाळाला थरांमध्ये कपडे घाला. जर बाळाला थंडी वाजत असेल तर ब्लँकेट सोबत ठेवा
  • बाळाची आवडती खेळणी सोबत ठेवा: रस्त्यावरून किंवा विमानाने प्रवास करताना, बाळाला आनंदी आणि व्यस्त ठेवणे तुमच्यासाठी अत्यावश्यक असेल. काही आवडती खेळणी आणि पुस्तके आणा जेणेकरून बाळ रडू लागल्यास त्याचे मनोरंजन करता येईल
  • लहान बाळांना जंतुसंसर्ग चटकन होतो. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. त्यांना वरचेवर नीट पुसून घ्या त्यांचे कपडेही अधूनमधून बदला. घामामुळे किंवा ओलसरपणामुळे बॅक्टेरिया संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणूनच बाळांचे कपडे स्वच्छ आणि कोरडे ठेवा
  • विमान प्रवास असो अथवा इतर कोणताही ठिकाणी आजकाल रेस्टरूममध्ये बाळासोबत असलेल्या आईसाठी खास सोय केलेली असते. या सोयीचा फायदा घ्या. बाळाचे कपडे बदलण्यासाठी, स्तनपान देण्यासाठी तुम्हाला या सोयींचा फायदा होऊ शकतो

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT