ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
How to Use a Pumice Stone in Marathi

Pumice Stone म्हणजे काय, सौंदर्यासाठी कसा करावा वापर

त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात. बाजारातही यासाठी विविध प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट दाखल होतात. त्वचेवरील डेड स्कीन काढण्यासाठी सध्या प्युमिक स्टोन वापण्याची पद्धत आहे. यालाच झावा दगड असंही म्हणतात. या दगडाने तुम्ही त्वचेवरील डेड स्कीन स्वच्छ करू शकता. साधारणपणे पायाच्या टाचा, गुडघे, हातावरची जाड आणि काळी झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी हा दगड वापरला जातो. तसंच त्वचेची निगा राखण्यासाठी वाचा पावसाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी | Skin Care Tips For Monsoon In Marathi, संवेदनशील त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स (Sensitive Skin Care Tips), तेलकट त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स (Oily Skin Care Tips In Marathi) कोरड्या त्वचेसाठी स्कीन केअर टिप्स (Dry Skin Care Tips In Marathi)

प्युमिक स्टोन (Pumice Stone) चा वापर कसा करतात

प्युमिक स्टोन ज्वालामुखीमुळे तयार होते. तो खूपच हलका आणि सच्छिद्र असतो. या दगडाचा वापर प्रामुख्याने त्वचा स्वच्छ करण्यासाठीच केला जातो. इनग्रो हेअरची वाढ थांबण्यासाठीदेखील या दगडाचा वापर परिणामकारक ठरतो. मात्र त्यासाठी हा दगड त्वचेवर कुठे आणि कसा वापरावा हे माहीत असायला हवं. 

  • पाय स्वच्छ करण्यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात तुमचे पाय बुडवून ठेवा. पाय भिजल्यावर तुम्ही प्युमिक दगडाने तुमच्या पायाच्या टाचा स्वच्छ करू शकता.
  • प्युमिक दगड वापरताना पाय अथवा हात सर्वात आधी कोमट पाण्यात भिजवावे ज्यामुळे त्वचा मऊ होते आणि स्वच्छ करण्यास मदत होते. 
  • त्वचेवर साबण अथवा तेल लावूनही तुम्ही प्युमिक दगड वापरू शकता. 
  • त्वचेवर हा दगड एक ते दोन वेळा हळूवार घासल्यास तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन आणि धुळ, माती निघून जाते. 
  • प्युमिक स्टोनचा वापर झाल्यावर त्वचा आणि दगड दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवावे.
  • त्वचेला एक्सफोलिएट केल्यावर पुसून मॉइस्चराइझर लावण्यास विसरू नये. 
  • प्युमिक स्टोनचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता. 

प्युमिक स्टोनचे फायदे

प्युमिक स्टोन तुम्ही त्वचेसाठी वापरल्यास तुमची त्वचा स्वच्छ आणि मऊ होते. यासाठी जाणून घ्या फायदे

टाचांसाठी

वातावरणात बदल झाला की तुमच्या टाचा फुटू लागतात. अति थंड अथवा अति उष्ण वातावरण टाचांना सहन होत नाही. मात्र फाटलेल्या टाचांमुळे तुमच्या पायाचे सौंदर्य कमी होते. अशा वेळी तुम्ही पायांच्या टाचांवरील जाड स्कीन काढून टाकण्यासाठी प्युमिक स्टोनचा वापर करू शकता. घरी पेडिक्युअर आणि मेनिक्युअर करण्यासाठी प्युबिक स्टोन फायद्याचा आहे.

ADVERTISEMENT

कोरडी त्वचेसाठी

हिवाळ्यात त्वचा जितकी कोरडी होते तितका तुमच्या त्वचेवर डेड स्किनचा थर जमा होतो. अशा वेळी त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी प्युबिक स्टोन वापरणं फायद्याचं ठरेल. त्वचा स्वच्छ करून मग मॉइस्चराइझरचा वापर केल्यामुळे त्वचेमध्ये ते चांगल्या पद्धतीने मुरतं आणि त्वचा मऊ करतं.

अनावश्यक केसांसाठी

अंगावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी तुम्ही नियमित प्युमिक स्टोन वापरू शकता. मान, हात, अंडरआर्म्स, मांड्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही प्युमिक स्टोन वापरू शकता. मात्र फार जोरात तो त्वचेवर रगडू नका. नाहीतर त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT