ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
air conditioner

या सोप्या ट्रिक्स वापरल्या तर जुना एसी सुद्धा कमी खर्चात करेल जास्त कुलिंग

मे महिना सुरु झाला आणि भगवान सूर्यदेव संपूर्ण शक्तीनिशी तळपायला लागलेत. उन्हात पापड ठेवला तर आपोआप भाजून निघेल इतके गरम वातावरण झाले आहे. आणि भारतातील प्रमुख भागांत अत्यंत उष्ण हवामान  आहे. उष्ण प्रदेशातील घरांना या कडक उन्हात थंड ठेवण्यासाठी एकतर एअर कंडिशनर किंवा घरातील कूलरची गरज असते. एसी किंवा कुलरशिवाय राहणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागले आहे. या हंगामात सर्वत्र उष्णतेच्या लाटांमुळे कूलिंग इलेक्ट्रॉनिक्सची मागणी अनेक पटीने वाढली आहे. परंतु एअर कंडिशनरच्या अधिक वापरामुळे, वीज बिल दर महिन्याला वाढतच चालले आहे, आणि बहुतेक लोकांसाठी ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

बहुतेक एअर कंडिशनर्स उत्तम तापमान सेटिंग आणि आर्द्रता नियंत्रणासाठी अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतात, ज्यामुळे विजेचे बिल वाढते. त्यामुळे नवीन एसी घेण्यापूर्वी अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.त्यांचा उपयोग करून आपण कमी खर्चात जास्त कुलिंग मिळवू शकतो. जर तुमच्या घरातही एसी असेल आणि तुम्हाला त्याचा वापर करून लवकर घर थंड झालेले हवे असेल तर पुढील टिप्स फॉलो करा. 

टीप 1 – एसी सुरु असताना खोली बंद ठेवा 

ज्या खोलीत एसी चालू असेल त्या खोलीचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात. जर खोली कुठूनही उघडी असेल तर एसीमुळे ती खोली थंड होण्यास जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे वीज बिलही जास्त येते.

टीप 2- एसीचे तापमान बाहेरच्या पेक्षा 10 अंश खाली सेट करा 

बाहेरचे तापमान काहीही असो, तुम्ही तुमचा एसी बाहेरच्या तापमानापेक्षा 10 अंश खाली सेट करावा. तसेच, आपल्या शरीराचे तापमान सरासरी 36 ते 37 अंशांच्या दरम्यान असते. म्हणून, या खाली तापमान गेले तर ती खोली आपल्यासाठी थंड असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसीमध्ये तुम्ही जितके तापमान कमी कराल तरी ते ६ टक्के जास्त वीज वापरेल. म्हणून, खोलीचे तापमान नेहमी 18 अंशांऐवजी 23-24 अंशांदरम्यान ठेवण्याची सवय लावा.

ADVERTISEMENT

टीप 3 – एसीबरोबर फॅन देखील लावा 

एसी सुरु असताना कमी स्पीड वर फॅन लावल्याने विजेची बचत होते.  एसी चालू असताना सीलिंग फॅन चालू ठेवावा. पंखे खोलीला हवेशीर ठेवतात आणि खोलीच्या कानाकोपऱ्यात थंड हवा पसरवतात. यामुळे खोली लवकर थंड होते. आणि यामुळे तुम्हाला एसीचे तापमान कमी करावे लागणार नाही. अशा प्रकारे तुम्ही कमी पॉवर वापरून अधिक कूलिंग मिळवू शकता. एसी चालू करण्यापूर्वी तुमच्या खोलीचा पंखा चालू करा जेणेकरून गरम हवा खोलीतून बाहेर पडेल, त्यानंतर तुम्ही तुमचा एसी सुरू करू शकता.अशाने तुमची खोली लवकर थंड होईल. 

टीप 4 – एसीचे फिल्टर नियमित साफ करा 

तुम्‍हाला तुमच्‍या जुन्या एसीनेही चांगले कूलिंग व्हावे असे वाटत असल्‍यास, त्‍याचे फिल्टर नियमित अंतराने साफ करत राहा.फिल्टरमध्ये धूळ व घाण साठून राहिल्यास एसीच्या कुलिंगवर परिणाम होतो आणि वीज नुसतीच वाया जाते पण खोली नीट थंड होत नाही.  बर्‍याच कंपन्यांच्या एसीचे फिल्टर्स आपल्याला स्वतःच घरच्या घरीही नियमित काढून धुता येऊ शकतात. परंतु, जर तुम्हाला ते स्वतः करायचे नसेल तर तुम्ही त्यासाठी एसी सर्व्हिसिंग करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाचीही मदत घेऊ शकता.

टीप 5 – खोलीत कमी उजेड ठेवा 

जितके दिवे सुरु असतील तितकी त्या जास्त उष्णता खोलीत निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही खोली थंड करू इच्छित असाल तर खोलीतील अतिरिक्त दिवे बंद करा.दिवे बंद केल्याने खोलीतील उष्णता कमी होईल. यामुळे कूलिंग जलद होईल. तसेच, स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये चालू असलेला एक्झॉस्ट फॅन बंद करा. जेणेकरून थंड हवा बाहेर जाणार नाही. 

अशा प्रकारे तुम्ही वीज वाचवून सुद्धा अधिक कुलिंग मिळवू शकता.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

19 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT