भारतीय सौंदर्यशास्त्रात केशरला फारच जास्त महत्व आहे. अगदी सोन्याहून पिवळे असलेले हे केशर अगदी खूपच महाग मिळते. केशराच्या काही काड्या या काहीशेंच्या घरात जातात. त्यामुळे केशरापासून बनवलेल्या वस्तू या महाग मिळतात. पण बाजारातून महागड्या अशा केशराच्या साैंदर्यप्रसाधनांची खरेदी करण्यापेक्षा तुम्ही घरी राहून केशराचा उपयोग करुन काही सोपे पॅक्स किंवा क्रिम बनवू शकता. त्यामुळे तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडण्यास मदत होईल. केशराचा उपयोग करुन तुम्हाला नेमकी सौंदर्यात कशी भर घालावी ते जाणून घेऊया.
केशर क्रिम
रोजच्या वापरासाठी तुम्ही केशरच्या क्रिमचा उपयोग करु इच्छित असाल तर तुम्ही केशरापासून खास क्रिमदेखील बनवू शकता. केशरपासून क्रिम बनवण्यासाठी नेमके काय करावे ते जाणून घेऊया.
साहित्य:
केशराच्या काही काड्या, भिजवलेले बदाम, ॲलोवेरा जेल
कृती:
- केशराच्या काड्या काही काळासाठी थोड्याशा पाण्यात भिजवून ठेवा.केशराचा रंग पाण्यात उतरायला हवा.
- आता भिजवलेले बदाम सोलून ते चांगले वाटून घ्या. मिक्सीमध्ये कमीत कमी पाणी घालून ते वाटल्यानंतर चाळणीतून चाळून घ्या.
- तयार क्रिममध्ये भिजवलेले केशर घालून त्यामध्ये ॲलोवेरा जेल घालून ते एकत्र करुन घ्या. तुमचे तयार क्रिम चेहऱ्याला लावा.
केशर मॉश्चरायझर
केशर हे संपूर्ण शरीराच्या त्वचेसाठीही चांगली आहे. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्हाला मॉश्चरायझर म्हणून देखील करता येईल.
साहित्य:
ॲलोवेरा जेल, केशर
कृती :
- ॲलोवेरा जेल एका भांड्यात घेऊन तुम्ही त्यामध्ये काही केशराच्या काड्या घाला. केशराच्या काड्यांचा रंग उतरण्यासाठी तुम्ही ती जेल चांगली फेटून घ्या.
- त्यामुळे केशराचा रंग चांगला त्यामध्ये उतरतो. असे क्रिम तुम्ही मस्त मॉश्चरायझर म्हणून वापरु शकता.
- केशऱ मॉश्चरायझरच्या नियमित वापरामुळे तुमची त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत मिळते. त्यामुळे असे मॉश्चरायझर नक्की बनवा.
केशर फेसपॅक
केशऱाचा उपयोग करुन तुम्हाला छान फेशिअल करायचे असेल तर तुम्ही त्यापासून फेसपॅक बनवू शकता. केशरापासून फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही नेमके काय करायला हवे ते देखील बनवू शकता.हे फेसपॅक कसे बनवायचे ते देखील जाणून घेऊया
साहित्य: केशराच्या काड्या, कच्चे दूध, बेसन
कृती:
- थोडेसे केसर दूध घेऊन त्यामध्ये केशराच्या काड्या घाला. केशराचा रंग उतरला की, त्यामध्ये बेसन घालून त्याचा एक छान पॅक बनवून घ्या.
- हा पॅक चेहऱ्याला लावा आणि सुकेपर्यंत ठेवा. या पॅकमुळे त्वचेवरील पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते.
- आता केशराचा असा उपयोग करुन तुम्ही नक्कीच तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
आता केशराचा असा उपयोग करुन तुम्ही नक्कीच तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.