ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी असं वापरा ऑक्सिमीटर

ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी असं वापरा ऑक्सिमीटर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि रूग्णालयातील रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सध्या अनेक जण घरीच आयसोलेट होऊन कोरोनाची ट्रिटमेंट घेत आहेत. जर कोरोनाची लक्षणे सौम्य असतील तर घरीच उपचार घेऊन कोरोनावर मात करता येते. आजवर अनेकांनी घरच्या घरी उपचार घेत कोरोनावर मात केलेली आहे. मात्र कोरोना संक्रमण झाल्यावर काही गोष्टींची सतत काळजी घ्यावी लागते. जसं की दिवसभरात तीन वेळा शरीराचे तापमान तपासणे आणि दिवसभरात कमीत कमी पाच ते सहा वेळा ऑक्सिजनची पातळी आणि ह्रदयाचे ठोके मोजणे. अशा वेळी घरातच थर्मामीटर,ऑक्सिमीटरसारखी उपकरणं असणं फायद्याचं ठरू शकतं. थर्मामीटरचा वापर घरात केला जातत असल्यामुळे त्याबद्दल अनेकांना माहीत असतं. मात्र ऑक्सिमीटर वापरण्याची प्रत्येकाल सवय असेलच असं नाही. लक्षात ठेवा ऑक्सिमीटर हे उपकरण वेदनारहित असून ते देखील घरी वापरणे अगदी सोयीचे आहे.  मात्र जर तुम्हाला ऑक्सिमीटर कसं वापरावं हे माहीत नसेल तर या टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुम्हाला ते वापरताना गैरसोय होणार नाही. 

instagram

पल्स ऑक्सिमीटर म्हणजे काय

पल्स ऑक्सिमीटर हे एक छोटेसे वैद्यकीय उपकरण आहे. सध्या कोणत्याही मेडिकल अथवा केमिस्टकडे  तुम्हाला ते सहज मिळू शकते. एखाद्या चिमट्याप्रमाणे असलेल्या या उपकरणातून तुम्ही शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजू शकता. हे उपकरण डिजिटल असल्यामुळे बोटांमध्ये अडकवल्यावर या उपकरणावर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि ह्रदयाचे ठोके दिसू लागतात.  ऑक्सिमीटर ऑन केल्यावर त्यातून त्वचेवर एक डीम लाईट जाते. ज्यामुळे त्वचेखालील रक्तातील पेशींच्या हालचाली  आणि रंग डिटेक्ट केला जातो. ऑक्सिमीटर रक्तपेशींच्या रंगावरून ऑक्सिजनची पातळी मोजते.

ADVERTISEMENT

ऑक्सिमीटर बोटात ठेवल्यावर जर ९५ ते १०० पर्यंत आकडे येत असतील तर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात आहे असं समजा. मात्र जर ऑक्सिमीटर ९२ च्या खालील आकडे दाखवत असेल तर तुम्हाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. या उपकरणात तुम्हाला तुमच्या ह्रदयाचे ठोके मोजता येतात. साधारणपणे पौढ व्यक्तीचे ठोके मिनीटाला  ६० ते १०० इतके असतात. एखाद्या खेळाडू अथवा फिटनेस प्रिय व्यक्तीचे ठोके यापेक्षा कमी असू शकतात. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी ऑक्सिमीटरने तुमचे आरोग्य तपासू शकता. मात्र लक्षात ठेवा ऑक्सिमीटर कसे वापरावे हे तुम्हाला यासाठी माहीत असायला हवं. नाहीतर ऑक्सिमीटर योग्य पद्धतीने न वापरल्यास तुमच्या शरीरातील ऑक्सिजनच्या रिडिंगमध्ये बदल होऊ शकतो. यासाठीच याबाबत देण्यात आलेल्या गाईडलाईन्सची मदत घ्यायला हवी. 

instagram

घरच्या घरी अशी करा चेक तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची लेवल –

घरी ऑक्सिमीटर वापरताना या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. 

ADVERTISEMENT
  • घरी ऑक्सिमीटरने ऑक्सिजन चेक करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या हाताची बोटे स्वच्छ करा. तुमच्या हाताच्या बोटांवरील नखांवर नेलपॉलिश असता कामा नये.
  • कारण ऑक्सिमीटर सेंसरद्वारे  काम करते जर तुमच्या बोटावर काही लागलं असेल तर तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाही. 
  • तुमचे हात जर थंड पडले असतील तर ते एकमेकांवर रगडून हातांना ऊब द्या आणि मगच ऑक्सिजन तपासा.
  • ऑक्सिमीटर वापरण्यासाठी ते ऑन कराआणि हाताच्या मधल्या बोटावर अथवा तर्जनीवर ते अडकवा. ऑक्सिमीटर लावल्यावर हाताची बोटे अथवा हात सरळच ठेवा. वाकवल्यास योग्य परिणाम मिळणार नाही. 
  • ऑक्सिमीटर तुम्ही दोन्ही हाताच्या बोटांवर लावून ऑक्सिजन तपासू शकता. मात्र ज्या हाताने तुम्ही जास्त काम करता त्या हातावर लावल्यास जास्त चांगले ठरेल. 
  • बोटात ऑक्सिमीटर ठेवल्यावर काही सेंकद भरभर आकडे बदलू लागतील. मात्र थोडावेळ वाट पाहा आणि आकडे स्थिर झाल्यावर ते मोजा. स्थिर झालेला आकडा योग्य परिणाम असू शकते.
  • दिवसभरात कमीत कमी चार ते पाच वेळा ऑक्सिजनची पातळी तपासणं गरजेचं आहे. ऑक्सिजनचे रेटिंग वहीवर नोंदवा आणि सर्वात शेवटी डॉक्टरांना मेसेज करा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

कोरोना काळात महिलांचे आरोग्य, स्वास्थ्य जपण्यासाठी काही सोप्या टिप्स

कोरोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत

ADVERTISEMENT

मासिक पाळी सुरु असताना महिलांनी घ्यावी का कोरोना लस, जाणून घ्या तज्ञ्जांचा सल्ला

03 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT