ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
तांदळाच्या पाण्याचा उपयोग

तांदळाच्या पाण्यापासून तयार करा होमपेड पॅक, मिळवा सुंदर त्वचा आणि केस

 तांदळाच्या पाण्याचे उपयोग या आधीही आपण पाहिले आहेत. तांदूळ धुतलेले आणि भात शिजवलेले पाणी फेकून न देता त्याच पाण्याचा वापर करुन तुम्हाला अनेक फायदे मिळवता येतात. तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात.  ज्यामुळे त्वचा आणि केसांना चमक मिळण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर त्वचेच्या अन्य काही समस्याही दूर होण्यास मदत मदत मिळते. तांदूळाचे पाण्यापासून तुम्ही वेगवेगळे फेसपॅक आणि हेअर पॅक बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळण्यास मदत मिळेल. जाणून घेऊया असेच काही सोपे आणि होममेड तांदुळापासून बनलेले फेसपॅक

 तांदूळ आणि मुलतानी फेसपॅक

जर तुमच्या त्वचेवर अतिरिक्त तेल असेल तर तुमच्यासाठी हा पॅक उत्तम आहे.  हा फेसपॅक तुमची त्वचा अजिबात कोरडी करत नाही. यासाठी तुम्ही तांदूळ धुतलेले पाणी घ्यायचे आहे. तुम्ही भात शिजवलेले पाणी देखील घेऊ शकता. एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घेऊन त्यामध्ये तांदळाचे पाणी घ्यायचे आहे. त्याची एक जाड पेस्ट तयार करुन ती चेहऱ्यावर लावायची आहे. हा फेसपॅक लावून तो वाळेपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तो कोमट पाण्याने काढायचा आहे. असे केल्यामुळे चेहरा स्वच्छ होतो. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून एकदा करा. तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल आणि त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. 

तांदूळ स्क्रब

तांदळाचे पाणी काढून घेतल्यावर त्यामध्येच थोडे तांदूळ घालून चांगले वाटून घ्या. त्यामध्ये व्हिटॅमिन E घालून तुम्हाला ते एकत्र करायचे आहे. असे केल्यामुळे त्वचा डॅमेज होत नाही. शिवाय त्वचेला आलेला अतिरिक्त कोरडेपणादेखील कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे असा स्क्रब तयार करा. पण हा स्क्रब वापरताना तुम्ही तो जास्त चोळणार नाही याची खात्री करा. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होण्यास मदत मिळेल. 

घनदाट केसांसाठी वापरा तांदूळाचे पाणी (Benefits Of Rice Water For Hair In Marathi)

ADVERTISEMENT

तांदळाचे पाणी, केशर आणि ॲलोजेल क्रिम

केशर आणि तांदूळ याचे मिश्रण

जर तुम्ही एखादे नाईट रुटीन फॉलो करायचा विचार करत असाल तर तुम्हाला तांदळाचे पाणी, केशर आणि ॲलोवेरा जेल एकत्र करुन त्याची एक क्रिम करुन घ्यायची आहे. केशर आणि तांदाळाचे पाणी यामुळे त्वचा अधिक स्वच्छ होते. त्वचेवरील डाग कमी होतात आणि कांती उजळलेली दिसून येते. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास हा प्रयोग करुन पाहा. याचे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही. रात्रीच्या वेळी अगदी पातळ असा थर चेहऱ्याला लावून तुम्ही तसाच रात्रभर ठेवू शकता. 

तांदळाचे पाण्याचे कंडिशनर

केसांसाठीही तांदळाचे पाणी हे चांगले आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिजलेल्या भाताचे पाणी काढून त्याचा उपयोग करुन स्काल्प चोळू शकता. स्काल्प चोळून घ्या. त्यामुळे स्काल्पमध्ये अडकलेली घाण निघण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर त्यामुळे केसांना चमक देखील चांगली मिळते. यामध्ये तुम्ही रिठा घातला की, त्याचा उपयोग तुम्हाला हेअर क्लिन्झर म्हणून देखील करता येतो. 

आता तांदळाच्या पाण्यापासून तुम्ही अशापद्धतीने मस्त होममेड पॅक आणि हेअर पॅक देखील बनवू शकता.  

घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो (Homemade Face Serum)

ADVERTISEMENT
26 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT