बॉलीवूडचा अॅक्शन हिरो ह्रतिक रोशन आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ह्रतिक ‘बैंग बैंग’ आणि ‘वॉर’ दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत हा त्याचा तिसरा चित्रपट करत आहे. मागच्या वर्षी ह्रतिक आणि सिद्धार्थचा वॉर बॉक्सऑफिसवर तुफान चालला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीचा एरिअर अॅक्शन ड्रामा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एवढंच नाही या चित्रपटाचं बजेट इतकं आहे की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट यंदा बॉलीवूडचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे.
नेमकं किती आहे फायटरचं बजेट
फायटरचं नेमकं बजेट किती याबद्दल सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्रतिक आणि दीपिकाचा फायटर अंदाजे 250 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या बिग बजेट चित्रपटात इंटरनॅशनल लेवलचे अॅक्शन सीन असण्याची शक्यता आहे. चित्रपट देशभक्तीवर आधारित असणार आहे. चित्रपटात हाय लेवलचे अॅक्शन सीन तर असणारच आहेत शिवाव ह्रतिक आणि दीपिकाचा ऑनस्क्रिन रोमांसही पाहता येणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
ह्रतिकने वाढदिवशी केलं होतं जाहीर
ह्रतिक रोशनचा दहा जानेवारीला वाढदिवस होता त्यावेळी त्याने या चित्रपटाची घोषणा केली. त्याने एक मोशन पिक्चर शेअर केलं होतं ज्यामधून असा मेसेज देण्यात आला होता की, “दुनिया में मिल जायेंगे आशिक कई, पर वतन से हसीन सनम नही होता, हिरों मे सिमटकर सोने से लिपटकर मरते है कई, पर तिरंगे से खुबसुरत कफन नही होता ” यावरून हा चित्रपट देशावरील प्रेम आणि शहीदांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आहे असं वाटतं. यासोबतच ह्रतिकने हा चित्रपट या वर्षी 30 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे असं ही शेअर केलं होतं. ज्यामुळे लवकरच प्रेक्षकांना अद्भूत आणि भव्य दिव्य अॅक्शनसह हा चित्रपट सिनेमागृहात पाहता येणार आहे.
ह्रतिकच्या फायटर ठरणार का या वर्षीचा सुपरहिट –
सिद्धार्थ आनंदसोबत ह्रतिकने आतापर्यंत दोन अॅक्शनपट केले आहेत बैंग बैंग आणि वॉर आणि या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला बैंग बैंग नाई अॅंड डेचा रिमेक होता. ज्यात ह्रतिक आणि कैतरिना कैफ यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 180 कोटींची कमाई केली होती. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉरमध्ये ह्रतिक आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. ज्यामुळे चित्रपट अॅक्शनने पूरेपुर भरलेला होता. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर इतका चालला की त्याने जवळजवळ 300 कोटींची कमाई केली होती. अर्थातच आता फायटरचं बजेटच 250 कोटींच्या घरात असेल तर हा चित्रपट बॉक्सऑफिसवर काय धुमाकूळ घालणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.यासोबतच ह्रतिकने क्रिश 4 चं शूटिंगही सुरू केलं आहे. ज्यामुळे चाहते या वर्षी ह्रतिककडून सुपरहिट चित्रपटांची अपेक्षा करत आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड होणार जॅकी श्रॉफची ऑनस्क्रीन बहीण
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन