ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
पंधरा वर्षांनी पुन्हा भेटायला येणार लोकप्रिय सुपरहिरो, क्रिश 4 ची घोषणा

पंधरा वर्षांनी पुन्हा भेटायला येणार लोकप्रिय सुपरहिरो, क्रिश 4 ची घोषणा

बॉलीवूडचा सुपरस्टार ह्रतिक रोशनने क्रिश सुपरहिरोच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात भारतीय सुपरहिरोची एक वेगळी छाप निर्माण केली. आता ह्रतिक त्याच्या चाहत्यांना एक जबरदस्त सरप्राईझ देण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच क्रिश (Krrish) सिरिजला पंधरा वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने ह्रतिकने चाहत्यांसमोर क्रिश 4 ची घोषणा केली आहे. म्हणजेच या सिरिजच्या पुढच्या भागातून पुन्हा एकदा क्रिश सुपरहिरो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा ऐकल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच धूम निर्माण झाली आहे. जाणून घ्या क्रिश 4 कसा असेल आणि कधी प्रदर्शित होईल.

नवा क्रिश नेमका कसा असेल

क्रिश चित्रपटाच्या पुढील सिक्वलची घोषणा होताच चाहत्यांनी आपल्या नव्या भारतीय सुपरहिरोबाबत अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे. पंधरा वर्षांनंतर आता नवा सुपरहिरो नेमका कसा असेल याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. ह्रतिकने या पोस्टमध्ये जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये क्रिश चेहऱ्यावरून मास्क काढून फेकून देताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की या नव्या रूपात क्रिश मास्क शिवाय प्रेक्षकांसमोर येणार आहे. कदातिच यावेळी क्रिशचे एखादे अनोखे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. या व्हिडिओसोबत ह्रतिकने शेअर केलं आहे की, “भूत काळात जे होणार होते ते होऊन गेले, आता पाहुया भविष्य काळ काय घेऊन येत आहे”

पंधरा वर्षांपासून क्रिशने प्रेक्षकांना लावले आहे वेड

अभिनेत्रा ह्रतिक रोशनच्या साईफाई फिल्मने पंधरा वर्षांपूर्वी 23 जून 2006ला क्रिश सिरिजचा पहिला चित्रपट कोई मिल गया चित्रपट प्रदर्शित केला होता. त्यामुळे पंधरा वर्षांनंतर चाहत्यांना काहीतरी खास देण्याची ह्रतिकची इच्छा आहे. अनेक दिवसांपासून क्रिशचा पुढील भाग प्रदर्शित होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आता ह्रतिकने या चर्चांवर क्रिश 4 ची घोषणा करत शिक्कामोर्तब केलं आहे. क्रिश हा ह्रतिक रोशनचा सर्वात पहिला सायन्स फिक्शन चित्रपट होता. ज्याचं नाव होतं कोई मिल गया. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचे वडील राकेश रोशन यांनी केलं होतं. शिवाय या चित्रपटात त्याच्यासोबत प्रिती झिंटा आणि रेखा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पुढे या सिरिजचे क्रिश 2, क्रिश 3  हे  भाग प्रदर्शित झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिरिजच्या चौथ्या भागात कृष्णा म्हणजेच क्रिश त्याचे वडील रोहीत मेहरा यांना पुन्हा परत आणणार आहे. त्यामुळे या चित्रपटात टाईम ट्रॅव्हल दाखवण्यात येणार आहे. शिवाय या चित्रपटात आता आणखी काही सुपर व्हिलन असण्याची शक्यता आहे. काहींच्या मते या चित्रपटात ह्रतिक रोशनच्या चार भूमिका असण्याची शक्यता आहे. शिवाय कदाचित यामध्ये एक वुमन सुपरहिरो देखील दाखवली जाणार आहे. थोडक्यात क्रिश 4 एक सुपर अॅक्शन आणमि बिग बजेट चित्रपट असणार आहे. त्यामुळे चाहते आता क्रिशनचा नवा चेहरा आणि स्पेशल इफेक्ट पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक झाले आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

‘बिग बॉस मराठी 3′ चे दरवाजे उघडणार आणि एकच आवाज घुमणार!

या कारणामुळे शहनाज गिल होऊ लागली आहे ट्रोल

आमीर खानला साकारायचा आहे विश्वनाथन आनंद, लवकरच येणार बायोपिक

ADVERTISEMENT
23 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT