ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
नवीन वर्षात अभिनेता ह्रतिक रोशन शिकत आहे ही गोष्ट, शेअर केला व्हिडिओ

नवीन वर्षात अभिनेता ह्रतिक रोशन शिकत आहे ही गोष्ट, शेअर केला व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशन त्याच्या सक्षम अभिनय, अफलातून डान्स, जबरदस्त अॅक्शनसाठी प्रसिद्ध आहे. एवढंच नाही दिवसेंदिवस स्वतःला अधिक अपडेट करण्यासाठी तो सतत काहीतरी नवीन शिकत असतो. आता 2021 चं स्वागत करत त्याने एक नवीन कौशल्य आत्मसात केलं आहे. ज्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. जाणून घेऊया ह्रितिक रोशन या नवीन वर्षी असं कोणतं स्किल शिकून घेत आहे.

नेमकं काय शिकत आहे ह्रतिक रोशन

ह्रतिकच्या चाहत्यांना हे ऐकून नक्कीच आश्चर्य आणि आनंद होईल कारण…नवीन वर्षासाठी ह्रतिक चक्क ड्रोन चालवण्यास शिकत आहे. आजकाल एरिअल व्हुवसाठी ड्रोन कॅमेराचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र ड्रोन कॅमरा म्हणजे काही साधा कॅमेरा नाही. कारण तो वापरण्यासाठी त्याचं तंत्रशुद्ध ज्ञान आत्मसात करावं लागतं. ह्रतिक नवीन वर्षी हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यान शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आणि त्याचे काही मित्र एका लॉनवर झोपलेले आहेत. ज्यात तो त्याच्या मित्रांसोबत ड्रोन कॅमेऱ्याने स्वतःचा  आणि मित्रांचा सेल्फी घेताना दिसत आहे. ह्रितिकने या व्हिडिओसोबत शेअर केलं आहे की, “2021 मध्ये या नवीन स्किलसोबत प्रवेश”

ह्रतिकच्या डान्सचे जगभरात चाहते

ह्रतिक रोशन एक प्रतिभावंत कलाकार आहे. त्यामुळे अभिनय कौशल्यासोबतच तो अनेक नवनवीन गोष्टी शिकून स्वतःला अधिक सक्षम करत असतो. त्याच्या डान्सचे चाहते जगभरात आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने त्याचा पहिला आणि ब्लॉकब्लस्टर चित्रपट कहो ना प्यार हैच्या  एक पल का जीना  या गाण्यावर डान्स केला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी असलेल्या एका पार्टीमध्ये गायक मिका सिंहसोबत त्याने गाणं गात आणि डान्स करत असलेला एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मिका सिंहने गिटारदेखील वाजवली होती. 

ADVERTISEMENT

Instagram

ह्रतिक रोशनचे आगामी चित्रपट

ह्रतिक लवकरच विक्रम वेधामध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खानदेखील असेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री करत आहेत. हे दोघांनी आधी याच नावाच्या तमिळ चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात त्याचा डबल रोल असणार आहे. ह्रतिकआधी या चित्रपटात आमिर खान असण्याची चर्चा होती. मात्र आता या चित्रपटात ह्रतिकने या चितपटात काम करण्यास तयारी दाखवली आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी तो त्याचा चित्रपट नाईट मॅनेजरचे काम आधी पूर्ण करणार आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याचप्रमाणे तो सिद्धार्थ आनंदच्या फायटर्स आणि वॉर 2 या चित्रपटांमध्येही झळकण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी ह्रतिक रोशन सुपर 30 आणि वॉर या दोन चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला होता. ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धूमाकूळ घातला होता. ह्रतिकच्या वॉरने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता लॉकडाऊननंतर डबघाईला आलेल्या चित्रपटसृष्टीला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी सर्वच दिग्दर्शक आणि स्टार्सनी कंबर कसली आहे. ह्रतिक रोशन बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्यामुळे येत्या काळात ह्रितिकचा आणखी एक सुपरहिट चित्रपट चाहत्यांना मिळावी अशी आशा आहे. ज्यामुळे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतूरतेने वाट पाहत आहेत. 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

बॉलीवूडचे सुपरहिट चित्रपट जे पाहिल्यावर वाटतं लग्न असावं तर असं

एकेकाळी बॉलीवूडमध्ये खूप चर्चा झाली होती या लव्ह ट्रॅंगल्सची

या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख

ADVERTISEMENT
03 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT