चित्रपटांना नकार देणे हे काही स्टार्ससाठी नवे नाही. त्यातल्या त्यात असे स्टार्स ज्यांची बॉलीवूडमध्ये चलती आहे ते तर अगदी हमखास नावारुपाला आल्यानंतर चित्रपट नाकारतात. चित्रपट नाकारण्यामागे स्टार्सची अनेक कारणे असतात काही कारणांचा शोध लागतो तर काही कारणं कधीही समोर येत नाही. ऋतिक रोशननेही त्याच्या करिअरच्या सुरुवातीला काही चित्रपटांना नकार दिला आहे. त्याने अशा 5 चित्रपटांना नकार दिला जे चित्रपट दुसऱ्या कलाकारांच्या अभिनयामुळे सुपरडुपर हिट झाले. ऋतिकने नाकारलेले असे 5 चित्रपट कोणते ते आपण पाहुयात
बच्चन कुटुंबियांना कोरोना, देशभरातून केली जातेय प्रार्थना
दिल चाहता है
दिल चाहता है हा चित्रपट अनेकांच्या फार जवळचा आहे. मैत्री आणि प्रेम यावर आधारीत असा हा चित्रपट आजही अनेकांच्या आवडीचा आहे. दिल चाहता है हा चित्रपट 2001 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात आमीर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान दिसले होते. यामध्ये अक्षय खन्नाने सिद्धार्थची भूमिका साकारली होती. सिद्धार्थची ही भूमिका ऋतिकला विचारात घेऊनच लिहिण्यात आली होती. पण या भूमिकेसाठी त्याने नकार दिला. त्यानंतर ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेकला या भूमिकेसाठी विचारण्यास आले त्यानेही नकार दिल्यानंतर ही भूमिका आमीर खानला विचारण्यात आली. पण आमीरने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आकाशची भूमिका करण्याची इच्छा दाखवली. त्यामुळे आमीरकडे आकाशचा रोल गेला आणि सगळ्यात शेवटी अक्षय खन्नाकडे सिद्धार्थचा. पण हा चित्रपट त्या काळातील सुपर डुपर हिट चित्रपट ठरला.
बंटी और बबली
अभिषेक आणि राणी मुखर्जीच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले ते या चित्रपटापासूनच. अभिषेकच्या आधी या चित्रपटातील बंटीच्या रोलसाठी ऋतिक रोशनला विचारण्यात आले होते. पण त्याने या आधी आलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटाचा धसका घेऊन हा चित्रपट नाकारला असे सांगितले जाते. आता साहजिकच हा रोल दुसऱ्या अभिनेत्याला विचारण्यात आला. बंटीचा रोल अभिषेक बच्चनने स्विकारला. त्यामुळे हा चित्रपटही हिट झाला.अभिषेकला या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.
रंग दे बसंती
रंग दे बसंती हा चित्रपट सुपर डुपर हिट झाला. मल्टी स्टारर असा हा चित्रपट पुन्हा एकदा आमीर खानने स्विकारुन त्याला एका वेगळ्या पातळीवर नेले. मस्ती की पाठशाला हे गाणं तर आजही अनेक ठिकाणी लावलं जातं. या चित्रपटातील आमीरच्या नाही तर कोणत्या तरी दुसऱ्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. पण ऋतिकला आमीरच्या रोलमध्ये जास्त इंटरेस्ट होता असे कळते म्हणूनच त्याने ती भूमिका नाकारली.
अभिनेता कार्तिक आयर्नने केला एक मोठा खुलासा, लवकरच करणार लग्न
मै हूँ ना
शाहरुख खानचा मै हूँ ना हा चित्रपट म्हणजे एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता. या चित्रपटात शाहरुखच्या लहान भावाची भूमिका ऋतिक रोशनला देण्यात आली होती. पण ऋतिकने या चित्रपटातील लहान भावाची भूमिका करायला नकार दिला. त्यामुळे हा रोल शेवटी झायेद खानला देण्यात आला.झायेद खान या रोलमुळे चांगलाच नावारुपाला आला.
स्वदेस
शाहरुख खानला स्वदेश या चित्रपटासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सामाजिक भान जपणारा हा चित्रपट सगळ्यात आधी ऋतिक रोशनला ऑफर करण्यात आला होता. पण त्याने हा रोल करण्यासाठी नकार दिल्यानंतर हा रोल शाहरुखला ऑफर करण्यात आला. या चित्रपटासाठी त्याने का नकार दिला हे कारणही गुलदस्त्यात राहिले.
हे 5 हिट चित्रपट ऋतिकने नाकारले. पण दुसऱ्या अभिनेत्यांमुळेही हे चित्रपट हिट झाले.
KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल